Saturday, July 29, 2023

वास्तवतेच्या नावाखाली स्वत:च्या व्यथा मांडू नका : म. भा. चव्हाण



29/7/23

पुणे : काव्य प्रकारातील गझल ही सम्राज्ञी आहे. तिला सन्मानानेच वागविले पाहिजे. लिखाण निर्भयतेने करा पण वास्तवतेच्या नावाखाली स्वत:च्या व्यथा मांडू नका, असा सल्ला ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी कवी, गझलकार यांना दिला.

ज्येष्ठ गझलकार चव्हाण यांच्या लेखनप्रवासाला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे त्यांचा आज (दि. 29) जाहीर सत्कार करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गझलकार भूषण कटककर यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्षा मैथिली आडकर व्यासपीठावर होत्या.

सत्काराल उत्तर देताना चव्हाण म्हणाले, गझल या प्रातांत मी मिशन म्हणून काम केले. माझ्या लेखन प्रवासाची रंगत-संगत प्रतिष्ठान आणि पुणेकरांनी दखल घेतली ही गोष्ट माझ्या दृष्टीने खूप आनंददायी आहे. या सन्मानाबद्दल मी पुणेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. 

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले. 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रित गझलकारांचे मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात रेखा कुलकर्णी, तनुजा चव्हाण, कामिनी केंभावी, वैजयंती विंझे-आपटे, अजय जोशी, वैशाली माळी, उर्मिला वाणी, स्वाती यादव, सुजाता पवार, वर्षा कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे यांनी आषयपूर्ण गझल सादर करून रसिकांची दाद मिळविली.


0 comments:

Post a Comment