Sunday, April 23, 2023

आर्यन्सतर्फे 'अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी' पुस्तकाचे प्रकाशन


मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

24/4/23

पुणे : 'आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी'ने सामान्य लोकांना अर्थसंकल्प कळावा यासाठी, 'अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रस्तावना लाभली आहे. 

नुकताच राष्ट्रीय आणि राज्य अर्थसंकल्प जाहीर झाला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर जे विश्लेषण केले जाते, ते सर्वसामान्यांना फारसे कळतेच असे नाही. केवळ, काय स्वस्त, काय महाग ही माहिती सर्वसामान्यांना समजते. मात्र, हा संपूर्ण अर्थसंकल्प सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. जगजीवन काळेलिखित या पुस्तकामुळे आता सर्वसामान्य लोकांपर्यंत अर्थसंकल्प सोप्या भाषेत पोहोचेल. 

अर्थसंकल्पाचा प्रत्येक व्यक्‍तीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, त्याच्या बचतीवर काय परिणाम होणार, किती आर्थिक भार वाढणार, आणि जाहीर झालेल्या योजना कितपत योग्य आहेत किंवा त्या तळागाळापर्यंत पोहोचतील का? याची चर्चा कुठं होताना दिसत नाही. हाच उद्देश ठेवून पुस्तकाचे निर्माते, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि पुस्तकाचे प्रकाशक श्री. मनोहर जगताप यांनी अर्थसंकल्पाचं सोप्या भाषेत विश्लेषण करण्यासाठी हे पुस्तक तयार केलं आहे. या अर्थसंकल्पाचं सोप्या भाषेत विश्लेषण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं यासाठी हे पुस्तक विनामूल्य ठेवण्यात आलं आहे.

'अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी' या पुस्तकाचं प्रकाशन २३ एप्रिल, २०२३ रोजी पुण्यात झालं, कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment