Tuesday, April 18, 2023

जनवाडी यंग सर्कलतर्फे सर्वांसाठी दावत-ए -इफ्तार


पुणे : यंग सर्कल"* आणी इरशाद खान, मोसिन बागवान, इरफ़ान शेख, रियाज पिरजादे, शानूर बागवान, इमरान शेख, शाहरुख़ शेख, मनसूर बागवान, शोहेब शेख आणी समद शेख यांच्य वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,

छत्रपती शिवाजी नगर मधील जनवाड़ी - गोखले नगर भागात सर्व जाती धर्माचे लोक राहतात, या भागात होणारे पैगंबर जयंती, गणेश उत्सव, अंबेडकर जयंती, छ. शिवाजी महाराज जयंती, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिवस, रमजान ईद तसेच सर्व धर्माचे आणी भारतीय सण व उत्सव हि एकत्रित पने साजरी केले जातात, या दावत - ए - इफ्तार साठी प्रमुख्याने पुणे शहर अप्पर पोलिस आयुक्त मा. रंजन कुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त मा. शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त मा.श्रीमती आरती बनसोडे,,, तसेच चतुर्श्रूंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे,,  सहायक पोलिस निरीक्षक कोळी सर, गायकवाड सर, कोंद्रे सर, बसवराज माळी सर आणी पोलिस उप निरीक्षक टेमगिरे आदि अधिकारी आणी कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते, 

या वेळी अप्पर पोलिस आयुक्त मा. रंजन कुमार शर्मा यांनी पोलिस प्रशासन नेहमी तुमच्या मदती साठी आहे, अशीच सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन आनंदाने सर्व सन उत्सव साजरे करायला हवे, असे म्हणत सर्वांना रमाजन ईद च्या आणी डॉ. बाबासाहेब अंबेडकर जयंतीच्या शुभेच्या दिल्या,,

तसेच या भागातील आणी पुणे शहरातील विविध पक्षाचे मान्यवर नेते आणी पदाधिकारी हे या इफ्तार पार्टीमुळे एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले, राष्ट्रवादी कोंग्रेस चे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते निलेश निकम, नगरसेवक उदय महाले, अध्यक्ष प्रदीप देशमुख, तसेच कोंग्रेस चे नगरसेवक दत्ता बहिरट, जावेद नीलगर भाजपा चे नगरसेवक आदित्य माळवे, गणेश बगाड़े, विनोद धोत्रे, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दात, बहुजन मुक्ति पार्टी चे वैशालीताई राक्षे, शिवसेने चे प्रवीण डोंगरे, मनसे चे शंकर पवार, आकाश धोत्रे, आणी सर्व पक्षातील पदाधिकारी आणी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते,,

या भागात नेहमी जातीय सलोखा आणी एकोपा बघावयास मिळतो, कोणतेही सामाजिक कार्य असो किंवा धार्मिक कार्य या भागातील राहणारे स्थानिक रहिवाशी एकत्रित पने आणी आंनदाने साजरी करतात,, याचाच एक भाग म्हणजे हि इफ्तार पार्टी,,

यावेळी  जनवाड़ी मस्जिद ट्रस्टचे रशीद शेख नवयान बुद्ध विहाराचे मिलिंद शीतोळे, संजय सर मोतलिंग,, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अल्ताफ पिरजादे, आणी भागातील महम्मद बागवान, मोहन जाधव, असलम मिरजकर, सूरज पिंगले, युसूफ शेख, शशिकांत जगताप, आयुब भाई शेख बनसोडे, विकास सारनाथ, सलीम मुल्ला आणी इतर बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते,,, 

सदर इफ्तार पार्टीत *हम सब एक है* चा नारा देत सर्वांनी एक मेकांना शुभेच्छा दिल्या, आणी रोजा इफ्तार नंतर जेवनाचा अस्वाद घेतला.

0 comments:

Post a Comment