महाराष्ट्रीय
कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर करंडक नाटिका स्पर्धेचे
पारितोषिक वितरण
पुणे : बाल
कलाकारांच्या आव्वाज कुणाचा, हिप हिप हुर्ये अन्
भारत माता की जय अशा जल्लोषाने भरत नाट्य मंदिर आज
दणाणले. निमित्त होते
ते महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर आंतर
शालेय नाटिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे.
भालबा केळकर करंडक
नाटिका स्पर्धेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी
विद्यालयाच्या ‘वन्दे मातरम्' नाटिकेने
प्रथम क्रमांक पटकावित भालबा करंडक जिंकला आहे. भारतीय विद्याभवनाच्या सुलोचना
नातू मंदिराने सादर केलेल्या ‘आजीची दंतकथा' या नाटिकेला द्वितीय क्रमांकाचा कृष्णदेव मुळगुंद
करंडक तर आकांक्षा बालरंग भूमीच्या ‘काकुचं बाळ' या नाटिकेला तृतीय क्रमांकासाठी राजाभाऊ नातू
करंडक मिळाला आहे. नाविन्यूपर्ण व कल्पक सादरीकरणासाठी नानासाहेब शिरगोपीकर करंडक
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नऱ्हेच्या ‘यज्ञकर्मी' या नाटिकेने पटकाविला आहे. पारितोषिक वितरण
समारंभापूर्वी पारितोषिक प्राप्त नाटिकांचे सादरीकरण झाले.
पारितोषिक वितरण
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांच्या हस्ते
झाले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज्चे संचालक मकरंद
केळकर, महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परिक्षक सौरभ पारखे, सुनीता गुणे रंगमंचावर होते.
अभिनय आणि
कलागुणांना वाव मिळावा म्हणून मेहतन घेणाऱ्या शिक्षकांचे, मुलांमध्ये कलागुण सातत्याने जागृत ठेवणाऱ्या
पालकांचे आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून अध्यक्षीय
मनोगत व्यक्त करताना शरद कुंटे म्हणाले, समाजामधील प्रत्येक
चांगली गोष्ट टिकविण्यासाठी मोठे कार्य करावे लागते. स्पर्धेच्या माध्यमातून
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी हे कार्य सातत्याने करीत आहे.
परिक्षकांच्या वतीने
बोलताना सौरभ पारखे म्हणाले, तंत्राच्या आहारी न
जाता अभिनयावर लक्ष केंद्रीत करावे, मुलांना त्यांच्या
वयाच्या अनुषंगाने भूमिका द्याव्यात याचा विचार शिक्षक, लेखक आणि दिग्दर्शकांनी आवर्जून करावा. नाटक करणे
म्हणजे व्यक्तीमत्त्व विकास आहे. शारीरिक आणि बौद्धिक विकासही नाटकाच्या
माध्यमातून होतो. वाचिक अभिनयाप्रमाणेच कायिक अभिनयासाठी पारितोषिक दिले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मकरंद केळकर यांनी
मनोगत व्यक्त केले. प्रकाश पारखी म्हणाले, बालनाट्यातील
पुरुषोत्तम करंकड म्हणून भालबा केळकर करंडक स्पर्धा ओळखली जाते. बालनाट्य लिहिताना
लेखकाने आपण कोणत्या वयोगटासाठी लिखाण करतो आहोत याचे भान ठेवावे.
उपस्थितांचे स्वागत
महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर यांनी केले. संस्थेचे सचिव ॲड. राजन
ठाकूरदेसाई यांनी निकाल जाहीर केला. सूत्रसंचालन अवंती लोहकरे यांनी तर आभार
अभिजित देशपांडे यांनी मानले.
https://saglamproxy.com
ReplyDeletemetin2 proxy
proxy satın al
knight online proxy
mobil proxy satın al
QOH