इंडो यूएस भागीदारी व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या सहकार्याने आयोजन
13/1/2023
पुणे, दि. १३ जानेवारी: ‘भारतीय उच्च शिक्षणाचे धोरण व परिवर्तन’ या विषयावर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘हायर एज्युकेटर्स फाउंडेशन’ तर्फे २१ ते २३ जानेवारी दरम्यान पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात केले आहे. ही कार्यशाळा हॉटेल शेरेटन येथे होणार आहे. २२ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि संगणज्ञ तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या उपस्थित उद्घाटन होणार आहे.
‘हायर एज्युकेटर्स फाउंडेशन’ ही भारतीय विद्यापीठे, यांची संघटना आहे. यामध्ये भारतातील नामवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. याची कल्पना साडे तीन वर्षांपूर्वी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी मांडली होती. अशी माहिती आयआयटी कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सजंय धांडे यांनी सांगितले की, भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेने गेल्या अर्ध्या शतकात खूप मोठा पल्ला गाठला आहे. परंतू अॅाप्लिकेशन, संशोधन आणि विकास, परीक्षा प्रणाली सारख्या धूसर क्षेत्रात सुधारणा बाकी आहेत. उच्च शिक्षणातील सर्वोत्तम पध्दतींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यूएसए आणि इतर देशातील भारतीय वंशाचे उच्च शिक्षक आणि संशोधक व भारतातील आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्र आणण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ तयार करणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. या उपक्रमास असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि यूएस मधील भारतीय डायस्पोरा सक्रियपणे पाठिंबा देत आहेत.
भारतातील आणि जगभरातील शिक्षणतज्ज्ञ यांच्यात संवादाद्वारे भारतातील उच्च शिक्षणातील परिवर्तनाला उत्प्रेरित करणे हे कार्यशाळेचे ध्येय आहे. तसेच भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेचे हरवलेले वैभव परत आणण्यासाठी शिक्षणतज्ञांचा सामूहिक विचारांचा उपयोग करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा, धोरणकर्ते आणि भारतीय शिक्षणतज्ज्ञ यांच्यातील सहकार्याचा उपयोग करून भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनासाठी सर्वोत्तम उपाय शोधण्याची इच्छा व्यक्त केली.
आयोजित कार्यशाळेत देश विदेशातील नामवंत मान्यवर, विचारवंत आणि धोरणकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेचे भारतीय कोअरग्रूपचे अध्यक्ष प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत. तसेच यूएस येथील वर्माट युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमेला हे या कार्यशाळेचे अमेरिका कोअर ग्रुपचे अध्यक्ष आहेत. पद्मभूषण डॉ. विजय भटकर व पद्मश्री डॉ. संजय धांडे यासारखे दिग्गज व राहुल कराड यासारखे शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती मिशनला पुढे नेण्यासाठी सहभागी होत आहेत. भारतातील काही खाजगी विद्यापीठांमधील जवळपास १०० कुलगुरू या कार्यशाळेचा भाग बनतील.
या संदर्भातील प्रथम कार्यशाळा यूएसए येथील वॉशिंग्टनमध्ये १६ व १७ जून २०२२ रोजी भरविण्यात आली होती. या देशातील बर्यारच शिक्षण तज्ज्ञांनी व यूएसए मधील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी उपस्थिती दर्शविली होती.
भारतातील सर्व खाजगी विद्यापीठांमध्ये सहयोगात्मक स्पर्धात्मकता आणणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. निरोगी आणि निःस्वार्थ स्पर्धेच्या मानसिकतेसह भारतीय खाजगी विद्यापीठांची एकूण परिसंस्था मजबूत करणे आहे. आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंंद पांडे, डॉ. सुब्बाराव, डॉ. खरात, कार्यशाळेचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ.प्रसाद खांडेकर, व लिबरल आर्ट्स च्या प्रमुख डॉ. प्रिती जोशी उपस्थित होते.य उच्च शिक्षणाचे धोरण व परिवर्तन’ यावर कार्यशाळा २१ पासून
इंडो यूएस भागीदारी व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या सहकार्याने आयोजन
13/1/2023
पुणे, दि. १३ जानेवारी: ‘भारतीय उच्च शिक्षणाचे धोरण व परिवर्तन’ या विषयावर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘हायर एज्युकेटर्स फाउंडेशन’ तर्फे २१ ते २३ जानेवारी दरम्यान पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात केले आहे. ही कार्यशाळा हॉटेल शेरेटन येथे होणार आहे. २२ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि संगणज्ञ तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या उपस्थित उद्घाटन होणार आहे.
‘हायर एज्युकेटर्स फाउंडेशन’ ही भारतीय विद्यापीठे, यांची संघटना आहे. यामध्ये भारतातील नामवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. याची कल्पना साडे तीन वर्षांपूर्वी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी मांडली होती. अशी माहिती आयआयटी कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सजंय धांडे यांनी सांगितले की, भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेने गेल्या अर्ध्या शतकात खूप मोठा पल्ला गाठला आहे. परंतू अॅाप्लिकेशन, संशोधन आणि विकास, परीक्षा प्रणाली सारख्या धूसर क्षेत्रात सुधारणा बाकी आहेत. उच्च शिक्षणातील सर्वोत्तम पध्दतींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यूएसए आणि इतर देशातील भारतीय वंशाचे उच्च शिक्षक आणि संशोधक व भारतातील आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्र आणण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ तयार करणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. या उपक्रमास असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि यूएस मधील भारतीय डायस्पोरा सक्रियपणे पाठिंबा देत आहेत.
भारतातील आणि जगभरातील शिक्षणतज्ज्ञ यांच्यात संवादाद्वारे भारतातील उच्च शिक्षणातील परिवर्तनाला उत्प्रेरित करणे हे कार्यशाळेचे ध्येय आहे. तसेच भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेचे हरवलेले वैभव परत आणण्यासाठी शिक्षणतज्ञांचा सामूहिक विचारांचा उपयोग करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा, धोरणकर्ते आणि भारतीय शिक्षणतज्ज्ञ यांच्यातील सहकार्याचा उपयोग करून भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनासाठी सर्वोत्तम उपाय शोधण्याची इच्छा व्यक्त केली.
आयोजित कार्यशाळेत देश विदेशातील नामवंत मान्यवर, विचारवंत आणि धोरणकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेचे भारतीय कोअरग्रूपचे अध्यक्ष प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत. तसेच यूएस येथील वर्माट युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमेला हे या कार्यशाळेचे अमेरिका कोअर ग्रुपचे अध्यक्ष आहेत. पद्मभूषण डॉ. विजय भटकर व पद्मश्री डॉ. संजय धांडे यासारखे दिग्गज व राहुल कराड यासारखे शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती मिशनला पुढे नेण्यासाठी सहभागी होत आहेत. भारतातील काही खाजगी विद्यापीठांमधील जवळपास १०० कुलगुरू या कार्यशाळेचा भाग बनतील.
या संदर्भातील प्रथम कार्यशाळा यूएसए येथील वॉशिंग्टनमध्ये १६ व १७ जून २०२२ रोजी भरविण्यात आली होती. या देशातील बर्यारच शिक्षण तज्ज्ञांनी व यूएसए मधील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी उपस्थिती दर्शविली होती.
भारतातील सर्व खाजगी विद्यापीठांमध्ये सहयोगात्मक स्पर्धात्मकता आणणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. निरोगी आणि निःस्वार्थ स्पर्धेच्या मानसिकतेसह भारतीय खाजगी विद्यापीठांची एकूण परिसंस्था मजबूत करणे आहे. आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंंद पांडे, डॉ. सुब्बाराव, डॉ. खरात, कार्यशाळेचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ.प्रसाद खांडेकर, व लिबरल आर्ट्स च्या प्रमुख डॉ. प्रिती जोशी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment