पुणेः जर्नी : अस्पायरिंग टू इंस्पायरिंग पर्व
२०२२ हा कार्यक्रम पुणे सिंबायोसिस महाविद्यालय, विमाननगर येथे
रविवारी दिमाखात संपन्न झाला
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्कॉलर्स ट्री
एडू केयर प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टीम एजू
थॉनने ही खंबीर साथ दिली. ह्या कार्यक्रमाला दत्ता चितळे, विन कनेक्ट, माईंड लॅन्सर च्या प्रतिनिधी मिथिल
भंडारे, डॉ प्रतीक मुणगेकर, डायस, बिग ब्रेन ब्रिलीयन्स नॉलेज हब, पलिंगोच्या सौ भावना गुप्ता, शोटोकान कराटे स्पोर्ट्स असोसिएशनचे खेळाडू व स्वयंसेवक आणि सागर
लोखंडे ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
ऑनलाइन जनसंपर्कासाठी ब्रँड मेकर आर डी, माध्यम संयोजक म्हणून स्टे फिचर्ड आणि
मराठी माध्यम प्रायोजक म्हणून समृद्ध व्यापार ह्यांनी विशेष जवाबदारी पार पाडली. सेलिब्रेशन
पार्टनर म्हणून आलेल्या सौ स्वाती चौधरी ह्यांच्या अमर बेकर्स च्या केक
ने कार्यक्रमात चवदार रंगत भरली.
प्रत्येक वेळी समाज लोकप्रिय लोकांना , उच्च पदावरील लोकांना विशेष सन्मान प्रदान करत असतो ,पण त्यांना ह्या पदापर्यंत पोहचवणाऱ्या
शिक्षक, मार्गदर्शक ,प्रशिक्षक ह्यांचं योगदान तितकं
कोणाच्या लक्षात राहत नाही, प्रत्येक
थरातील प्रत्येक प्रकारच्या शिक्षकाचा ,मार्गदर्शकाचा सन्मान व्हावा
म्हणून सौ सरवजीत किराड ह्यांच्या
मनात आलेली ह्या सोहळ्याची संकल्पना
त्यांच्या सोबत असलेल्या श्वेता पंकज आणि इतर सहकाऱ्यांनी पुढे नेण्याचं
ठरवलं. ४ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाइन माध्यमातून ह्या कार्यक्रमाचे पहिले पर्व
दिमाखात पार पडले.
तिथून सुरवात झाल्यावर अजून काही प्रेरणादायी
प्रवासाच्या कहाण्या लोकांपुढे प्रत्यक्ष याव्यात ह्यासाठी ह्या सोहळ्याचा घाट
घालण्यात आला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती जेष्ठ कायदे सल्लागार
, हाय कोर्ट
मेडिएटर ऍड सौ प्रफुल्ल पोतदार ,भीम
बटालियन संघटनेच्या ऍड आम्रपाली धिवार ,लखनौ मधून आलेल्या डॉ रेणू सिंग ,सौ दीपा कालिया जेष्ठ
छायाचित्रकार राम झोंड उपस्थित होते. आपला
वेळ हा आपला गुरू आहे हे ऍड प्रफुल्ल पोतदार ह्यांनी अत्यंत साध्या सहज सोप्या
भाषेत लोकांसमोर मांडले तसेच आयोजकांचे कौतुक केले.
जेष्ठ छायाचित्रकार राम झोंड सरांनी ५०
वर्षाच्या कारकिर्दीसाठी विशेष सन्मान स्वीकारताना कृतज्ञता व्यक्त केली तसेच फोटोग्राफी
क्षेत्रासाठी साधना किती महत्वाची आहे ह्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमात टेड
एक्स ह्या व्याख्यानमालेमध्ये एका लक्षवेधी विषयावर बोलणाऱ्या समुपदेशक जसप्रिया
गंढोक, निधी मिथिल
भंडारे, ३०० हुन अधिक
मानद डॉक्टरेट मिळवणारे डॉ प्रतीक मुणगेकर, शिक्षकांवर विशेष कविता सादर करणाऱ्या सरिता दास भट्टाचार्य ह्यांची
भाषणे लक्षवेधी ठरली.
तसेच अमित मोहिले ह्यांनी फुटपाथ स्कुल, रोमल सुराणा ह्यांनी अध्यात्मावर आणि
शिक्षणावर, तसेच
सेजल रे ह्यांनी ह्यांच्या फेसबुकवरील तारे जमीन पर ह्या चळवळी बद्दल नव्याने
प्रकाश टाकला. कार्यक्रमात रंगत टिकुन राहावी ह्यासाठी सागर लोखंडे ह्यांचे व शोटोकान कराटे संघटनेच्या
स्वयंसेवकांनी एक दिमाखदार सादरीकरण करून आत्मरक्षण किती गरजेचे आहे ते
लोकांपर्यंत पोहचवले. अद्रिका पाल,
वेदिका किराड ह्यांनी ह्यादरम्यान आपल्या भाषणाने व सादरीकरणाने
सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सुभाष गोयल, पूना कॉलेजचे डॉ शाकिर शेख, ब्रेन वर्ल्ड च्या रेशु अग्रवाल, सौ प्रीती दाबाडे, डीसकोर्सेसच्या डॉ पूर्णिमा कुलकर्णी यांनी
आवर्जुन हजेरी लावली व आपला प्रवास लोकांपर्यंत पोहचवला .
या कार्यक्रमात डायास आणि बिग ब्रेन ब्रिलीयन्स
नॉलेज हबच्या विशेष पुरस्काराने प्रचेतन पोतदार आणि त्यांचे संकेतस्थळ स्टे फिचर्ड, माध्यम सल्लागार अक्षय कांबळे, भावना गुप्ता ह्यांचे पॅलिंगो, सरवजीत
किराड यांचे स्कॉलर्स ट्री, दत्तात्रय
परळकर आणि त्यांचे साप्ताहिक समृद्ध व्यापार, चित्रपट समीक्षक नील देशपांडे, हर्षदा पोतदार भावे,
एमसोलुट यांना गौरविण्यात आले. डॉ. पूर्णिमा कुलकर्णी यांच्या
वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष केक देखील आयोजकांच्या वतीने कापण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सौ सरवजीत
किराड ह्यांच्या सोबत सौ श्वेता पंकज , सौ भावना गुप्ता ,
प्रचेतन पोतदार ,अक्षय
कांबळे , निधी मिथिल
भंडारे ,डॉ प्रतीक
मुणगेकर ह्यांनी परिश्रम घेतले . त्यांना स्कॉलर्स ट्री च्या कर्मचारी वर्गाची , शोटोकान कराटे असोसिएशनचे प्रशिक्षक , विद्यार्थी व सहकारी ,नील देशपांडे ,दत्ता चितळे ओंकार राखुंडे, दीपेश किराड , रजनीश कुमार पंकज ह्यांची समर्थ साथ
लाभली
आमच्या पुढील कार्यक्रमाची घोषणा लवकरच होईल. प्रायोजकांची, माध्यमांची, सहकाऱ्यांची
अशीच साथ मिळत राहिली तर अशाच नवनवीन
संकल्पना आम्ही प्रस्तुत करत राहू, असे सौ सरवजीत किराड, सौ भावना गुप्ता, सौ श्वेता पंकज ह्यांनी माध्यमांच्या
प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले.
0 comments:
Post a Comment