पुणे – आर्मड फोर्सेस मल्टी सर्विस
को-ऑपरेटीव्ह सोसायटीची स्थापना दिनांक 18 सप्टेंबर 1972 रोजी काही सेवानिवृत्त
सेनाधिका-यानी एकत्र मिळून केली. भारताच्या तिन्ही सेनादलामधील अधिकारी आणि
अधिकारेतर वृंदगण जे त्यांच्या तरुणपणीय निवृत्त होत. अशांना एक पर्यायी व्यवसाय
मिळावा हाच त्या मागचा प्राथमिक उददेश होता. कारण, त्याकाळी मिळणारे निवृत्ती वेतन हे अत्यल्प होते.
अफेक्सो लिमिटेडने आपल्या व्यवसायाची सुरुवात टेल्कोच्या स्टाफ बसेस कंटीन आणि हाउसकिपींग सर्विसेस चालवायला घेऊन केली. टेल्को व्यवस्थापनाने अफेक्सोला या बाबतीत मदत केली. यानंतर आम्ही आमचा सिक्युरीटी, हाउसकिपींग आणि परिवहनाचा व्यवसाय पुणे शिरवळ य रत्नागिरी मध्ये वाढवला, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष ले.कर्नल (नि) सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की 2005 पासून पिंपरीमध्ये आमच्याकडे इंडीयन
ऑईल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL) या
वर्गीय पेट्रोलपंप आहे. 2021 मध्ये त्यात CNG पंपाची भरही प्रबली विविध सोयींनी युक्त असे बहुउद्देशीय
शौर्यश्री सुविधा हॉल्स आणि लॉन्स वडगाव बुद्रुक येथे आहेत. अफेक्सोच्या तसेच इतर
खाजगी सिक्युरीटी गार्ड्स एजन्सीच्या सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी
महाराष्ट्र राज्याच्या होमगार्ड विभागातर्फे मान्यता दिलेली "अफेक्सो
प्रशिक्षण संस्था" सुध्दा आहे.
या संस्थेची वार्षिक उलाढाल 120 कोटींच्यावर आहे. आजमितीस सुमारे 2000 हुन अधिक सेवानिवृत्त सैनिक आणि असैनिक कर्मचारी या संस्थेत काम करत आहेत. अफेक्सो लिमिटेड सदैव एका आदर्श सहकारी संस्थेचे गुणविशेष आणि सुसंस्कृतपणा पालन करण्यास कटीबध्द आहे. 50 वर्षापूर्वी सेवानिवृत्त सेनाधिका-यांनी लावलेल्या आणि प्रेरक सेवानिवृत्त सैनिक व असैनिक सहका-यांनी साथ दिलेल्या "एकमेवादितिय" अशा या छोटया सहकारी रोपटयाचे रुपांतर आता गगनाला गवसणी घालु पहाणा-या एका डेरेदार वृक्षामध्ये झाले आहे. अफेक्सो भविष्यात आपला व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील, असे सुरेश शिदे म्हणाले.
0 comments:
Post a Comment