Tuesday, August 30, 2022

सॅमसंगकडून Galaxy Z Flip4 व अन्य माॅडेल्स बाजारात

30/8/2022

पुणे : भारतातील सर्वात विश्वासू कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आज भारतात नवीनतम Galaxy Z मालिका लॉन्च केली. चौथ्या पिढीतील फोल्डेबल्स, Galaxy Z Fold4 आणि Galaxy Z Flip4 आता ऑनलाइन प्री-बुकिंगसाठी आणि देशभरातील किरकोळ स्टोअर खुले आहेत.

सॅमसंगमध्ये, आम्ही ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी सतत नेहमी नावीन्यपूर्णतेच्या मर्यादा शोधत असतो. आमची नवीनतम Galaxy Z मालिका त्याचीच साक्ष आहे. आता, त्याच्या फोर्थ जनरेशन मध्ये, Galaxy Z मालिका उत्पादकता आणि स्व-अभिव्यक्ती या दोन्हीसाठी अत्यंत आधुनिक साधनांनी युक्त आहे.

Galaxy Z Fold4 हा सॅमसंगच्या स्मार्टफोन नवकल्पनाचा परिणाम आहे. हे दमदार स्मार्टफोन फ्लॅगशिप कॅमेरा, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि सर्व नवीन डिझाइनसह सुसज्ज असून, Galaxy Z Fold4 हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. Galaxy Z Flip4 चे क्लॅमशेल डिझाइन, कॉम्पॅक्ट रचना आणि स्मार्टलुक एक अद्वितीय अनुभव देते आणि त्याचा फ्लेक्सकॅम हँड्स-फ्री व्हिडिओ शूट करण्यास सक्षम करते. अशा अतुलनीय आणि दमदार मोबाइल विशिष्ट्यसह एक आगळा वेगळा अनुभवांसह, आमची नवीनतम वर्तणूक बदलणारी Galaxy Z मालिका वापरकर्त्यांच्या त्यांच्या स्मार्टफोनशी संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणेल,” असे सॅमसंग इंडियाचे मोबाइल बिझनेसचे महाव्यवस्थापक अक्षय गुप्ता म्हणाले.

1 comments:

  1. Anonymous28/3/23

    Yurtdışına kargo göndermek için inceleyebilirsiniz: yurtdışı kargo

    ReplyDelete