Thursday, July 14, 2022

सॅमसंगच्या गॅलक्सी M13 सिरीजची विक्री 23 जुलैपासून

Aditya Babbar, Head, Marketing
4/7/2022

पुणेः भारतातील सर्वांत मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंगने आज गॅलक्सी M13 5G आणि गॅलक्सी M13 च्या शुभारंभाची घोषणा केली. प्रसिद्ध गॅलक्सी M सिरीजमधील अद्ययावत एडिशन्समध्ये अत्यंत उत्तम शैली आणि जन- एमझेड ग्राहकांच्या आकांक्षा व गरजांची पूर्तता करण्याची हमी असलेला अनुभव उपलब्ध केले गेले आहेत. गॅलक्सी M सिरीज हा भारतातील सॅमसंगच्या सर्वाधिक प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँडसपैकी एक आहे आणि 2019 मध्ये शुभारंभ झाल्यापासून देशामध्ये त्याचे 4.2 कोटींहून अधिक युनिटस विकले गेले आहेत, असे काउंटरपॉईंट रिसर्चमध्ये समोर आले आहे.

आपल्या ग्राहकांच्या जीवनाच्या स्तरामध्ये वाढ करण्याबद्दलची सॅमसंगची कटिबद्धता म्हणून 2019 मध्ये भारतात गॅलक्सी M सिरीजचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून गॅलक्सी M सिरीजला लाखोंचे प्रेम मिळाले आहे. ह्या मॉन्स्टरच्या वारशाला पुढे नेताना आम्ही भारतामध्ये गॅलक्सी M13 सिरीजचा शुभारंभ करत आहोत. 5G क्रांतीच्या दिशेने पाऊल उचलताना गॅलक्सी M13 5G मध्ये 11 5G बँडची सुविधा असेल व त्यामुळे ग्राहक भविष्यासाठी सज्ज होतील. ह्या सेग्मेंटमध्ये ऑटो डेटा स्विचिंग, रॅम प्लससह 12GB रॅम प्रचंड आणि 6000mAh बॅटरी अशा आघाडीच्या वैशिष्ट्यांसह गॅलक्सी M13 सिरीज मोर दॅन मॉन्स्टरअसे प्रदर्शन देण्यास सज्ज आहे,” असे आदित्य बब्बर, वरिष्ठ संचालक आणि प्रमुख, मोबाईल मार्केटिंग, म्हणाले.

मॉन्स्टरपेक्षाही अधिक मोठे प्रदर्शन

गॅलक्सी M13 5G ला डिमेन्सिटी 700 प्रोसेसरचे सहाय्य आहे व तो 2.2GHz पर्यंत वेग घेऊ शकतो. विस्तारित प्रदर्शनासाठी, सहमपणे मल्टीटास्क करण्यासाठी, सुलभ app नेव्हीगेशन आणि अडथळ्यांशिवाय गेमिंग करण्यासाठी गॅलक्सी M13 सिरीजमध्ये रॅम प्लसमध्ये 12GB इतकी रॅम मिळते. वैशिष्ट्यपूर्ण रॅम प्लस सोल्युशनमुळे युजर आवश्यकतेनुसार रॅम साईज वाढवू शकतो. ग्राहकांना स्टोरेज जागेचीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण गॅलक्सी M13 सिरीजमध्ये 1 TB इतके एक्स्पांडेबल स्टोरेज मिळते.

मॉन्स्टर कनेक्टिव्हिटीहून अधिक

गॅलक्सी M13 5G त्यातील 11 5G बँडस सहाय्यासह आपल्याला कधीही व कुठेही कनेक्ट होण्यासाठी मद्त् मिळते. क्रांतीकारी 5G कनेक्टिव्हिटीमुळे अधिक वेगाने डाउनलोडस होण्यासाठी मदत मिळते व अधिक स्मूठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे आपण भविष्यासाठी सज्ज होता. गॅलक्सी M13 सिरीजमध्ये सेग्मेंटमधील पहिलेच ऑटो डेटा स्विचिंग मिळते. ह्या नावीन्यपूर्ण घटकासह प्रायमरी SIM नेटवर्क नसलेल्या जागेमध्ये असूनही युजर्स सेकंडरी SIM चा डेटा वापरून कॉल्स करू किंवा घेऊ शकतात.

मॉन्स्टर पॉवरपेक्षा जास्त

गॅलक्सी M13 मध्ये प्रचंड अशी 6000mAh बॅटरी येते ज्यामध्ये काळजी घेतली गेली आहे की, आपल्याला नेहमीच पॉवर मिळत राहील. दोन्ही मॉडेल्स बॉक्समध्ये 15W एडाप्टीव्ह फास्ट चार्जरसह येतात. भविष्यासाठी सज्ज असलेल्या स्मार्टफोन्समध्ये एडाप्टीव्ह पॉवर बचतीचा मोडसुद्धा आहे ज्यामुळे आपण आपल्या युसेजनुसार जुळवून घेऊ शकता व बॅटरी 50% पेक्षा कमी झाल्यास आपोआप पॉवर सेव्हिंग मोडमध्ये स्विच केले जाते. गॅलक्सी M13 सिरीजमधील AI पॉवर मॅनेजमेंट तीन दिवसांमध्ये वापरले गेले नसतील तर apps ना स्लीप मोडमध्ये टाकते व जर आपण महिनाभर ते वापरले नाहीत, तर त्यांना डीप स्लीप मोडमध्ये नेते.

मॉन्स्टर डिस्प्लेपेक्षाही जास्त

गॅलक्सी M13 5G मध्ये प्रचंड मोठा 6.5’’ LCD डिस्प्ले आहे व 90Hz रिफ्रेश रेट आहे तर गॅलक्सी M13 मध्ये 6.6’’ पूर्ण HD+ LCD डिस्प्ले आहे ज्यामधून आकर्षक असा बघण्याचा अनुभव मिळतो. ह्या मोठ्या स्क्रीनमुळे तंत्रज्ञानाची आवद असलेल्या जन -झेडच्या युजर्सना सहजपणे त्यांच्या सोशल मीडीया फीडवर नजर टाकत पुढे जाता येते. कोणतीही अडचण न येता बिंज- वॉचर्स त्यांच्या आवडत्या कंटेंटचा आनंद सहजपणे घेऊ शकतात. नवीन मिनिमम बेझेल डिझाईनमुळे तेथील प्रत्येक मिनिएलचा बघण्याचा अनुभव अतिशय मोठा होतो.

मॉन्स्टर 50MP कॅमेराहून अधिक

गॅलक्सी M13 सिरीजमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह दर्जेदार फोटो घेण्याची खात्री मिळते. गॅलक्सी M13 मध्ये 5MP अल्ट्रा- वाईड लेन्स व डेप्थ लेन्सही मिळते ज्यामुळे उच्च दर्जाचे फोटोज आणि पोर्ट्रेटस घेता येतात.

मॉन्स्टर सुरक्षिततेच्याही पुढे

गॅलक्सी M13 सिरीजला सॅमसंग नॉक्स ह्या कर्नल लेव्हलद्वारे सुरक्षित केले गेलेले आहे. हे एक मल्टीलेयर असलेले सेक्युरिटी सोल्युशन आहे जे आपल्या स्मार्टफोनची संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवते. त्यामध्ये प्रायव्हसी डॅशबोर्ड, स्मार्ट अँटी ट्रॅकिंग आणि सेंसर इंडिकेटर्ससह प्रायव्हेसी व सुरक्षितेशी संबंधित फीचर्स आहेत.

मॉन्स्टर डिझाईनच्या पुढे

गॅलक्सी M13 सिरीजमध्ये थक्क करणारे मिडनाईट ब्ल्यू, एक्वा ग्रीन आणि स्टारडस्ट ब्राऊनासे तीन रंग मिळतात. हे पातळ आणि शैलीदार डिझाईन ग्राहकांना उच्च दर्जाचा प्रिमियम अनुभव देते.

मेमरी व्हेरिएंटस, दर आणि उपलब्धता

गॅलक्सी M13 5G चा दर 4GB+64GB व्हेरिएंटसाठी रू. 13999 इतका आहे तर 6GB+128GB व्हेरिएंटसाठी रू. 15999 आहे तर गॅलक्सी M13 4GB+64GB व्हेरिएंटसह रू. 11999 ला उपलब्ध आहे व 6GB+128GB व्हेरिएंटसह त्याची किंमत रू. 13999 आहे. तसेच, विशेष शुभारंभ ऑफर म्हणून आयसीआयसीआय बँक कार्ड युजर्सना रू. 1000 इतक्या थेट सवलतीचा लाभ घेता येऊ शकेल. गॅलक्सी M13 5G आणि गॅलक्सी M13 हे Samsung.com, अमेझॉन आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये 23 जुलैपासून उपलब्ध असतील.

0 comments:

Post a Comment