Friday, July 29, 2022
राममूर्ती यांचे आत्मचरित्र बिल्डिंग ड्रीम्स प्रकाशित
(
पुणे - वासुदेवन राममूर्ती अध्यक्ष एमेरिटस–व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि) यांनी आज आपले बिल्डिंग ड्रीम्स हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाचे अधिकृत अनावरण त्यांची आई थंगम मूर्ति यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी त्यांने सर्व जुने-नवे व्यावसायिक भागीदार, मित्र, सहकारी आणि कुटुंब आणि 1000 हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. बिल्डिंग ड्रीम्स हे वासुदेवन राममूर्ती यांचे जीवनचरित्र आहे. ज्यात त्यांचा परिवर्तनासाठी घेतलेला ध्यास, ध्येयपूर्तीच्या वाटेवर नेणारा आणि स्वप्न सत्यात उतरविण्यास प्रोत्साहित करणारा जीवनप्रवास आढळतो.
या पुस्तकात त्यांच्या जीवनातील घटनांबद्दलचा एक मनोरंजक आणि प्रेरणादायी प्रवास वाचावयास मिळतो. एक व्यक्ती म्हणून घडताना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेली मूल्ये, शिकवण, जीवन दृष्टीकोन याद्वारे त्यांचे व्यक्तिचित्र उलगडत जाते. पुस्तकात त्यांचा संघर्ष, आव्हाने, आपल्या भूमिकेवर ठाम राहून अडथळे आणि कठीण प्रसंगांवर कशा प्रकारे मात केली, याचा सविस्तर उल्लेख आढळतो. एक लाख रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या संस्थेचा आज हजार कोटींचा समूह बनण्याचा प्रवास आणि दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची टीम यांचे सविस्तर वर्णन पुस्तकात दिलेले आहे.
जुन्या पिढीतील उद्योजकाची कहाणी, त्यांचा संघर्ष आणि त्याची यशोगाथा जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. यावेळी बोलताना वासुदेवन राममूर्ती म्हणाले, “माझा आजवरचा जीवनप्रवास, अनुभव, आव्हाने, ध्येयपूर्ती आदी सर्वांसमोर मांडण्याची उत्सुकता होती आणि करोनाकाळात लॉकडाऊन कालावधीत मला ही संधी मिळाली. माझ्या अनुभवांचे मुद्दे टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून जे सुरू झाले, ते पूर्ण पुस्तकात रूपांतरित झाले. मला आशा आहे की हे नवीन पुस्तक नवोदित उद्योजकांना त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शक ठरेल आणि निश्चितच मदत करेल.”
हे पुस्तक अमेझॉन आणि देशभरातील पुस्तकांच्या दुकानांवर उपलब्ध असेल, याची किंमत आहे 700 रुपए आणि ब्लॅक अँड व्हाईट कॉपीसाठी रु.500/.
Subscribe to:
Post Comments (Atom)
https://saglamproxy.com
ReplyDeletemetin2 proxy
proxy satın al
knight online proxy
mobil proxy satın al
CCG