Friday, July 29, 2022

श्री बालाजी युनिव्हर्सिटी, बॉश दरम्यान सामंजस्य करार

29/7/2022 पुणे : श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (SBUP) उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आणि बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (BGSW) यांनी अभ्यासक्रमाची रचना वाढविण्यासाठी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये क्षमता निर्माण करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. SBUP ही भारतातील पहिली व्यवस्थापन संस्था आहे जिच्यासोबत बॉश या स्वरूपाचा सामंजस्य करार करत आहे. बॉशने ज्या इतर सर्व संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे त्यात प्रामुख्याने IIT, NIIT, IISC सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या धोरणात्मक युतीच्या घोषणेसह, दोन्ही संस्था, SBUP च्या विद्यार्थ्यांना SAP च्या कार्यक्षेत्रा मध्ये प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि इंटर्नशिपद्वारे उद्योग-सज्ज करण्यासाठी, एकत्र येतील. या सामंजस्य करारावर अमित श्रीवास्तव - अभियांत्रिकी केंद्र प्रमुख, BGSW, पुणे आणि डॉ. एस बी आगासे, कुलसचिव, श्री बालाजी विद्यापीठ, पुणे यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, शैक्षणिक सदस्यांच्या, प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर ५ वर्षांच्या कालावधीसाठी स्वाक्षरी करण्यात आली. अमित श्रीवास्तव – अभियांत्रिकी केंद्र प्रमुख, बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्या बद्दल बोलताना म्हणाले, “तंत्रज्ञान आणि सेवांच्या जागतिक पुरवठादारांपैकी एक म्हणून आम्ही उदयोन्मुख तंत्रज्ञानातील उद्योग-तयार व्यावसायिक तयार करण्याच्या उद्देशाने आम्ही व्यवसायानंसोबत आणि संस्थांसोबत काम करत आहोत. श्री बालाजी युनिव्हर्सिटी, पुणे हे व्यवस्थापन, संगणक ऍप्लिकेशन्स आणि टेक्नॉलॉजीज मधील उच्च शिक्षण कार्यक्रम ऑफर करणार्या प्रतिष्ठित भागीदारांपैकी एक आहे. या युतीद्वारे, आम्ही व्यावसायिकांच्या भविष्यातील बॅचला व्यवसायांसाठी, विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची आशा करतो. डॉ. बिजू जी. पिल्लई, वरिष्ठ संचालक आयटी आणि प्रवेश, डीन फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, श्री बालाजी विद्यापीठ, पुणे म्हणाले, “आयटी क्षेत्रात बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज सारख्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्थेसोबत भागीदारी स्थापित होणे ही आमच्या विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासात एक महत्वाची प्रगती आहे. आम्ही उद्योग तज्ज्ञांद्वारे आमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची आणि मार्गदर्शन करण्याची अपेक्षा करतो, तसेच त्यांचे ज्ञान आमच्या प्राध्यापकांसोबत सामायिक करत आम्हाला आयटी क्षेत्रातील उद्योग-तयार व्यावसायिकांची पुढील पिढी उद्योगांपर्यंत पोहोचविण्यात मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे.”

0 comments:

Post a Comment