Thursday, July 21, 2022

सिंजेंटा इंडिया तर्फे 10,000 किमी ड्रोन यात्रा सुरू

* 13 राज्यांतील शेतकर्यां मध्ये ड्रोनद्वारे फवारणीबाबत जागरूकता निर्माण करणार * सिंजेंटा तर्फे जगातील पहिल्या बायोडायव्हर्सिटी मॉनिटरिंग तंत्रज्ञानाची घोषणा * ग्रोवर अॅतप ते ड्रोन्स,कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाला मिळणार चालना 22/7/2022 पुणे : सिंजेंटा इंडिया ने शुक्रवारी एका अनोख्या बायोडायव्हर्सिटी सेन्सर प्रकल्प,जगातील पहिल्या बायोडायव्हर्सिटी मॉनिटरिंग तंत्रज्ञानाची घोषणा केली. ज्यामध्ये संपूर्ण जगातील जैवविविधता मोजमापांच्या अचूकतेला गती देण्याच्या उद्दिष्टांसह जैवविविधता डाटाचा पाठपुरावा व आदान-प्रदान करणे शक्य होईल. जागतिक पातळीवर कृषी समस्या सोडविण्यासाठी या मेक इन इंडिया अभिनव उपक्रमाची घोषणा सिंजेंटा इंडियाचे कंट्री हेड व व्यवस्थापकीय संचालक सुशिल कुमार आणि सिंजेंटा समुहाचे चीफ इन्फॉर्मेशन व डिजिटल ऑफिसर फिरोज शेख यांनी केली. या दोघांच्या नेतृत्वामध्ये भारतातील पहिल्या ड्रोन यात्रेचा फ्लॅगऑफ करण्यात आला. ही यात्रा 10,000 किमीचा प्रवास करून सुमारे 10,000 शेतकर्यांनपर्यंत पोहचत ड्रोनच्या माध्यमातून फवारणीबाबत जागरूकता निर्माण करेल. ही यात्रा 13 राज्यांत प्रवास करणार असून शेतकर्यांरना ड्रोनच्या वापराबाबत प्रबोधन करेल. सिंजेंटा ही पहिली खासगी कंपनी आहे,जिला भारत सरकारच्या सेंट्रल इनसेक्टीसाईड बोर्डकडून पीकांवर आपले उत्पादन असलेल्या अमितसरच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर करून बुरशीजन्य संसर्ग, ब्लास्ट आणि शीथ ब्लाईट यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. सुशिल कुमार म्हणाले की,ड्रोनचा आणि इतर तंत्रज्ञान आधारित अभिनव संकल्पनांचा वापर हा भारतीय शेतकर्यां ना त्यांचे उत्पादन सुधारण्यासाठी,नफा वाढविण्यासाठी आणि अधिक शाश्वरतपणे वाढण्यास मदत करण्याच्या आमच्या वचनबध्दतेनुसार आहे. भारतात आमच्या अस्तित्वाच्या 94 वर्षांपासून अभिनवतेमध्ये आम्ही अग्रेसर राहिले आहोत आणि भारतीय शेतकर्यांचना दर्जेदार पीक संरक्षण,उत्पादने,बियाणे आणि सोल्युशन्स प्रदान केले आहेत,जी संपूर्णपणे भारतात उत्पादित केली जातात. कुमार पुढे म्हणाले की, आमचा विश्वा स आहे की, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीसारख्या सर्वोत्कृष्ट श्रेणीतील संशोधन संस्थांसोबत भागीदारी करून कृषी क्षेत्रात परिवर्तनासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना ओळखून त्या व्यापक प्रमाणात विकसित करू शकू. संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील या भागीदारीद्वारे आम्ही कृषी क्षेत्रात परिवर्तनासाठी तरूण प्रतिभा आणू इच्छितो,ज्यामुळे जगभरातील शेतकरी शाश्वहत पर्यावरणाबरोबरच आपले उत्पादन वाढविण्यास सक्षम होतील. फिरोज शेख म्हणाले की, बायोडायव्हर्सिटी सेन्सर प्रकल्पासाठी सिंजेंटा इंडिया ही आयआयटी रोपर व फ्राऊनहॉवर इन्स्टिट्युटसोबत काम करीत आहेत. बायोडायव्हर्सिटी प्रकल्पाच्या प्रारंभिक टप्प्यात शेतात आणि सभोवताली कीटकांचे जीवन ओळखण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे निरोगी कृषी जैव परिसंस्थेसाठी योगदान देणार्याख कीटकांच्या लोकसंख्येचा चांगल्या प्रकारे मागोवा घेता येईल व मोजमाप करता येईल. पुढील काळात इतर आदिवास शोधण्यासाठी या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याची आम्हाला आशा आहे. आमचा पहिला प्रोटोटाईप हा मार्च 2022 पासून कार्यान्वित आहे. 2022 मध्ये आम्ही छोट्या संख्येने सेन्सर प्रोटोटाईप्समध्ये सुधारणा सुरू ठेऊ. त्याचबरोबर कृत्रिम बुध्दिमत्तेमध्ये आणखी विकास करणे सुरू ठेऊ. 2023 मध्ये पहिला सेंन्सर नेटवर्क पायलट प्रोजेक्ट काही निवडक देशांमध्ये कार्यान्वित करण्याची आम्हाला आशा आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरावर सिंजेंटा ग्रुपचे सातत्याने केंद्रित असलेले लक्ष्य अधोरेखित करत शेख पुढे म्हणाले की, किफायतशीर, सौर उर्जेवर चालणारी अत्याधुनिक मोशन कॅप्चरिंग सिस्टिम ही कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) आणि मशिन लर्निंग अल्गोरिदम्सवर आधारित असेल. स्वयंचलितपणे, स्वायत्तपणे, विश्वांसार्हपणे सर्व हालचाल करणार्याध प्रजाती ओळखण्यासाठी व त्यांचे प्रमाण निश्चि्त करण्यासाठी याचा उपयोग होईल. सिंजेंटा ग्लोबल तर्फे आयआयटी रोपर आयहब - अवध बरोबर सहकार्याची घोषणा करण्यात आली. कृषी क्षेत्रातील जागतिक व स्थानिक समस्या सोडविण्यासाठी उत्पादनांचा विकास व व्यापारीकरण करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू इच्छितो अशी माहिती शेख यांनी दिली. आयआयटी रोपरचे सहयोगी अधिष्ठाता (संशोधन व विकास) तसेच डीएसटी टेक्नोलॉजी इनोव्हेशन हब - अवध (अॅकग्रीकल्चर अॅिन्ड वॉटर टेक्नोलॉजी हब) चे सहयोगी प्राध्यापक व एक्सपिरिमेंटल न्युक्लिअर फिजिक्स डीन पुष्पेंद्र सिंग म्हणाले की,शेती समुदायासाठी तांत्रिक उपाय विकसित करून योगदान देण्यासाठी सिंजेंटाबरोबर भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आयआयटी रोपर आणि सिंजेंटा भविष्यातील इंटर्नशिप कार्यक्रमांमध्ये,संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि भारतातील उत्पादकांच्या समस्यांचा शोध घेण्यासाठी एकत्रितपणे काम करतील. इतर भारत केंद्रित नवकल्पनांची रूपरेषा सांगत श्री.कुमार यांनी घोेषणा केली की,सिंजेंटा इंडिया लवकरच ग्रोवर अॅ्प सादर करेल,जे कापूस,गहू,भाजीपाला,तांदूळ आणि मका यांसह 9 पीकांसाठी डिजिटल अॅ ग्रोनॉमी सल्ला देईल. हे एक अनोखे अॅ प आहे जे लहान जागा असलेल्या शेतकर्यांॅना सक्षम करेल. कुमार यांनी माहिती दिली की, ग्रोवर अॅेपमध्ये पेरणीची तारीख, लागवडीची पध्दत, साहित्य,मातीच्या पोषणाची स्थिती, हवामान आधारित सल्ला किंवा सूचना, पोषणाबाबत शिफारशी, प्रतिमा आधारित रोगनिदान मॉडेल आणि शेतकरी त्यांचा अनुभव आणि प्रश्नव सांगून तज्ञांमार्फत प्रश्नां ची उत्तरे मिळवू शकतील अशा कम्युनिटी प्लॅटफॉर्म,या सर्व गोष्टींवर आधारित वैयक्तिकृत क्रॉप कॅलेंडरचा समावेश असेल. प्रत्येक पीकाला त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर विशिष्ट हवामानाची आवश्यकता असल्याने क्रॉपस्ट्रेस व स्ट्रेस इंडिकेटर मॉडेल उपग्रह प्रतिमा समाविष्ट करून हे अॅवप विकसित करण्यात येत आहे. या अॅमपमध्ये पिकांच्या वाढीचा टप्पा व त्यासाठी असलेल्या आवश्यक हवामानाची माहिती देत सध्याच्या हवामान परिस्थितीशी तुलना करेल. यामध्ये कीड आणि रोगांपासून वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृषी रसायनांच्या फवारणीबाबत शिफारशी असतील. फिरोज शेख म्हणाले की,आम्ही संशोधन व विकासावर दरवर्षी 1.4 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करत आहोत आणि आमच्याकडे जगभरात संशोधन व विकासामध्ये सुमारे 6500 कर्मचारी कार्यरत आहेत.आमच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे नाविन्यपूर्ण आणि प्रगतशील परिवर्तनाच्या नवकल्पना विकसित करणे जे जगभरातील शेतकर्यां ना उत्पादन वाढविण्यास सक्षम बनवेल तसेच जैवसंवर्धनासह पर्यावरणीय शाश्वशतता वाढवेल.

0 comments:

Post a Comment