पुणे: जागतिक दर्जाचे सलून लिवो आता पुणेकरांसाठी कोरगाव पार्क येथील होटेल वेस्टिनमध्ये सुरू करण्यात आले असून, प्रणिता बावेजा आपल्या अनुभवी, कुशल व्यावसायिकांच्या टीमसह या लक्झरी ब्रँडचे नेतृत्व करत आहेत, यात युक्रेनची हेअरस्टाईलिस्ट मिला पारखीना आणि यूएसएमधील जेसन बी यांचा देखील समावेश आहे, त्यांना २० वर्षांहून अधिक अनुभव आहे.
मिलाकडे युरोपियन टेक्निक आणि भारतीय लुक यांची उत्तम सांगड घालण्याची अनोखी कला असुन आपल्या अनुभवाद्वारे भारतीय पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही कश्या प्रकार उत्कुष्ट लुक देते येईल याची समज आहे, आणि तीला १० वर्षांहून अधिक अनुभव आहे. जेसन आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभवी असुन तो तरुणांची गरज समजून घेतो आणि त्याच्या ग्राहकांना त्यांच्या पर्सॅनॅलिटीप्रमाणे आवडीप्रमाणे हेयरस्टाईल देतो, तो स्त्री आणि पुरुष दोघांसाठी योग्य रंग, कट आणि केसांच्या टॅटू कलेमध्ये उत्कृष्ट आहे, लिवो सलॅान आपल्या सर्व ग्राहकांना एक अनोखा आणि अतुलनीय अनुभव देण्याचे वचन देते.
या लॉंचला पुण्यातील ख्यातनाम व्यक्तींनी हजेरी लावली होती ज्यात विविध क्षेत्रातील नामवंत, मान्यवर व्यक्तींचा समावेश होता. लिवो म्हणजे मऊपणा, पॉलिश करणे, वाढवणे किंवा उन्नत करणे आणि वेस्टिन मधील हे आकर्षक सलॉन आपल्या ग्राहकांना असाच अनुभव देते. लिवोची स्थापना २०१० मध्ये झाली असुन त्याचे प्रमुख आउटलेट एनसीआर गुडगाव येथे आहे. त्यांनी वर्षानुवर्षे आपला कार्याविस्तार केला असुन, ते डब्ल्यू-गोवा, रॅफल्स उदयपूर, कोर्टीयार्ड बाय मॅरियट, अरावली (एनसीआर फरीदाबाद) यासारख्या प्रमुख ठिकाणी उपस्थीत आहेत. त्यांना मिळालेल्या यशा नंतर पुढेही ते असाच कार्यविस्तार करत राहतील. पुढील काही महिन्यांत दर ४५ दिवसांनी लिवो स्पा आणि सलून भारतभर उघडले जातील.
२००५ मध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर, प्रणिताने ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये एक तरुण उद्योजक म्हणून पहिले पाऊल टाकले, ती तिच्या कौटुंबिक व्यवसायात सीओओ, ट्रॅव्हल सर्व्हिसेस इंटरनॅशनल (टीएसआय) म्हणून कार्यरत झाली आणि ऑफलाइन व्यवसायात ऑनलाइन बदल घडवून आणले. कंपनीचा महसूल अनेक पटींनी वाढवण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली, जी अखेरीस यात्रा डॉट कॉम ने विकत घेतली. तिने २०२० मध्ये लिवो स्पालॉन चा पदभार स्वीकारला आणि तिच्या व्यवसायाचा विकास आणि व्यवस्थापन कौशल्यांचा प्रभावीपणे वापर केला, परिणामी कोविडचा प्रभाव असतानाही व्यवसायाला संपूर्ण वळण मिळाले. लेवो ने तिच्या नेतृत्वाखाली भारतातील एक आघाडीचा लक्झरी ब्रँड बनून उद्योगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय नावांशी संबंध जोडून मोठी उंची गाठली आहे. प्रणिताने लिवोचा विस्तार केला आहे आणि 2 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्तरावर पोहचण्यात ती यशस्वी झाली आहे.
वेस्टिन, कोरेगाव पार्क येथे लिवो सलॉन आणि स्पाच्या शानदार लॉन्च प्रसंगी बोलताना, लिओच्या प्रमुख आणि एमडी प्रणिता बवेजा म्हणाल्या, “महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे शहर असण्यासोबतच पुणे हे अतिशय
उत्साही, सांस्कृतिक आणि फॅशनेबल आहे. मला नेहमीच इथल्या लोकांसाठी लक्झरीच्या दृष्टीने काहीतरी खास बनवायचे होते आणि यासाठी वेस्टिन, पुण्यापेक्षा चांगले ठिकाण नाही. आम्ही एक भव्य संकल्पना तयार करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि मला विश्वास आहे की आम्ही येथील लोकांशी चांगला संपर्क प्रस्थापित करू शकू.
लिवो मध्ये ग्राहकांना वन-स्टॉप शॉप स्पा आणि सलूनचा अनुभव मिळेल. मेक-अप, डर्मिटोलॉजिस्ट, नेल आर्ट, आय-लॅश एक्स्टेंशन, मायक्रो-ब्लेडिंग, हेयर आणि सेमी पर्मनंट मेक-अप यासारख्या इतर संबंधित सेवांचा आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव येथे मिळेल. लिवो मध्ये उच्च प्रशिक्षित, अनुभवी स्टायलिस्ट, टेक्निशीयन्स, डॉक्टर आणि थेरपिस्टची टीम आहे.
या लॉन्चला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला पहिल्यांदाच सौंदर्य आणि तंत्रज्ञानाचा समन्वय अनुभवायला मिळेल. आम्ही सादर करत आहोत एक ‘थ्री डी हेअर व्हर्च्युअल ट्राय ऑन’ जो तुम्हाला हेअर कट करण्याआधिच तो तुमच्या केसांवर कसा दिसेल याची रिअल टाइम झलक दाखवेल.”
या असोसिएशनबद्दल बोलताना, द वेस्टिन, पुणेचे जीएम सुदीप म्हणाले, वेस्टिनच्या सिग्नेचर हेवनली स्पासोबत भागीदारीत लिवो “ स्पालॉन” लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला वाटते की स्पा म्हणजे केवळ सुविधा, उपचार आणि उत्पादने नाही तर ही मनशांतीसाठी एकांतात राहण्याची, रिलॅक्स करण्याची जागा आहे. लिवो सोबतच्या पार्टनरशीद्वारे आम्ही वेलनसची वचनबद्धता दर्शवते, वेस्टिन आणि लिवो स्पॅलॉनचा स्वर्ग सुख देणारा हा स्पा तुम्हास सौंदर्याच्या अनुभवासोबतच मन आणि शरीर ताजेतवाने करण्यास मदत करेल.”
लिवोला त्यांची उत्पादने, सेवा आणि प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा प्रदान
करणारी टिम अद्वितीय बनवते - अनुभवी स्टायलिस्ट आणि थेरपिस्टची अत्यंत
सक्षम टीम ज्यांना सौंदर्य उद्योगात ४०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव
आहे. - जगभरातील आघाडीच्या कंपन्या आणि उत्पादनांच्या ब्रँड द्वारे टिमसाठी नियमित
प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. - ग्राहकांच्या त्वचा संबंधित गरजा पूर्ण
करणारी वैद्यकीय व्यावसायिकांची टीम उपलब्ध आहे.
0 comments:
Post a Comment