Saturday, May 21, 2022

जीप इंडियाचे नवीन मॅडेल मेरिडियन बाजारात दाखल

21/5/2022

पुणे: जीपची बहुप्रतीक्षित नवीन जीप मेरिडियन ही एसयुव्ही रु..२९.९० लाख रुपयांच्या विशेष प्रारंभिक किमतीत दाखल करण्यात आली आहे. एसयूव्ही सेगमेंटचा आणखी विस्तार आणण्यासाठी ही नवी एसयुव्ही डिझाइन करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त जागतिक दर्जाच्या अनेक सुविधा यात असून, ती भारतीय  ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन, डिझाइन करण्यात आली असून पारंपरिक एसयुव्हीचा अनुभव देणारी आहे.

जीप मेरिडियनची रचना प्रिमियम एसयूव्ही सेगमेंटची व्याख्या बदलणारया जीप ग्रँड चेरोकीपासून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. सर्वाधिक वेग आणि सर्वोत्तम पॉवर-टू-वेट गुणोत्तरासह विविध वैशिष्ट्ये यासाठी ही एसयुव्ही ओळखली जाते.

अत्यंत सक्षम आणि वेगवान अशी ही एसयुव्ही अवघ्या १०.८ सेकंदात ०-१०० किमी/तास वेगाने जाऊ शकते आणि ताशी १९८किमी इतका वेग गाठू शकते.

जीप मेरिडियन दाखल करताना, जीप ब्रँड इंडियाचे प्रमुख निपुण जे. महाजन म्हणाले, " जीप ब्रँडचा विश्वास आहे की भारतीय ग्राहकांनी अधिक अत्याधुनिक जीप मेरिडियनचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. या सेगमेंटचा अधिक विस्तार करण्यासाठी आणि शक्तिशाली, अत्याधुनिक, आरामदायी एसयुव्हीच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय देण्यासाठी आम्ही या एसयुव्हीची किंमत अगदी किफायतशीर ठेवली आहे. या किंमतीवरून आमचा हा उद्देश्य स्पष्ट होतो.

जीप मेरिडियन साहस आणि अत्याधुनिकतेचे अनोखे मिश्रण आहे. तिच्या वैशिष्ट्यांचे माध्यमासह सर्वच स्तरावर खूप कौतुक झाले आहे. आता ग्राहकही जीप मेरिडियनचा अनुभव घेऊ शकतात. विविध स्तरातील ग्राहकांना आकर्षित करणे आणि जीप लाइफचा अनुभव घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय देणे हे जीप मेरिडियनचे उद्दिष्ट आहे. नवीन जीप मेरिडियनला मिळत असलेल्या प्रतिसादाने जीप इंडियाला आनंद वाटत आहे. जूनच्या सुरुवातीला मेड-इन-इंडिया आणि मेड-फॉर-इंडियाअशा जीप मेरिडियनची डिलिव्हरी सुरू करण्याचा कंपनीचा विचार  आहे.

अभियांत्रिकी/ इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरः

या सेगमेंटसाठी प्रथमच देण्यात आलेला स्वतंत्र फ्रंट आणि रियर सस्पेंशन सेटअप या नवीन जीप मेरिडियनमध्ये आहे. नवीन जीप मेरिडियन फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग आणि हायड्रॉलिक रिबाउंड स्टॉपरने सुसज्ज आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी प्रवासाचा अनुभव येतो.  ड्रायव्हिंगही आनंददायी होते. २.२ एनएम इतका सर्वात कमी पार्किंग टॉर्क आणि ४.३ एनएम डायनॅमिक टॉर्कमुळे स्टीयरिंगवर उत्तम नियंत्रण ठेवणे सुलभ होते. ५.७ मीटर इतका कमी रेडियस असल्याने शहरातही ड्रायव्हिंग करणे अगदी आरामदायी होते. जीपचा अस्सल डीएनए कायम ठेवणारी अनेक वैशिष्ट्ये यात आहेत. त्यामुळे या एसयुव्हीची कार्यक्षमता वाढते.

ट्रिम्स आणि पॉवरट्रेन ः

प्रवाशांना आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी या सेगमेंटच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश असलेली जीप मेरिडियन लिमिटेडआणि लिमिटेड (ओ) अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. लिमिटेड आणि लिमिटेड (ओ) दोन्ही ४x२ फ्रंट-व्हील ड्राइव्हसह उपलब्ध असून सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचाही पर्याय आहे. लिमिटेड (ओ) प्रकारात ४x४ ऑल-व्हील ड्राइव्हसह नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनदेखील उपलब्ध आहे.

 

जीप मेरिडियनमध्ये  २.०-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. ३७५० आरपीएमवर १२५ किलोवॅट (१७०एचपी) आणि  १७५०-२, ५०० आरपीएम दरम्यान उपलब्ध जास्तीत जास्त ३५० एनएम टॉर्क निर्माण करते.

 

डी-सेगमेंटमधील सर्वात इंधन-कार्यक्षम एसयूव्हींपैकी एक जीप मेरिडियन असून प्रतिलिटर १६.२किमी (एआरएआय प्रमाणित) अॅव्हरेज देते.

डिझाइन आणि आरामदायीपणा

कारमधील प्रवाशांना पूर्ण आराम मिळावा यासाठी, यातील पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत ९४०मिमी आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत ७८० मिमी जागा देण्यात आली आहे. त्यामुळे जीप मेरिडियन हे या सेगमेंटमधील सर्वात प्रशस्त वाहन ठरते.

जीप मेरिडियन या एसयूव्हीमध्ये तीन आसन रांगा आहेत.   यात पाच लोकबसल्यानंतर ४८१ लिटर बूट स्पेस राहते तर सर्व सात जागा व्यापल्यावर १७० लिटर बूट स्पेस उरते. दुसऱ्या रांगेतील वन-टच फोल्ड-अँड-टंबल सीट्समुळे  आणि ८०डिग्री दरवाजा उघडण्याच्या तरतुदींमुळे प्रवाशांना सहजतेने आत-बाहेर करण्यास मदत होते.

या कारमध्ये सर्वोत्तम कूलिंगचा अनुभव येतो. या सेगमेंटमधील अन्य स्पर्धकांपेक्षा यात ३० टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने कूलिंग होते. मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम,  थर्ड-रो एसी इव्हपोरेटर युनिट आणि थर्मो-अकॉस्टिक केबिन इन्सुलेशनमुळे प्रवास सुखाचा होतो.

जीप मेरिडियनमध्ये एम्पेरॅडॉर ब्राउन लेदर सीट्स, कंट्रोल्ससह थर्ड-रो कूलिंग, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, डायमंड कट ड्युअल-टोन १८-इंच अलॉय व्हील आणि इतर अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. जीप मेरिडियन, कनेक्टिव्हिटी आणि आघाडीची इन्फोटेनमेंट वैशिष्ट्ये देणारया (यू कनेक्ट ५) UConnect5 ने सुसज्ज आहे. 

आता जीप इंडियाच्या वेबसाइटवर (jeep-india.com) आणि भारतभरातील जीप डीलरशिप्समध्ये ५०,००० रुपयांच्या अल्प डाउन पेमेंटसह नवीन जीप मेरिडियनचे बुकिंगसाठी सुरू असून, जूनमध्ये ग्राहकांना तिचे वितरण सुरू होईल.

Wednesday, May 18, 2022

प्रीमियम लिवो सलॉन आता पुण्यातील होटेल वेस्टिनमध्ये

19/5/2022

पुणे:  जागतिक दर्जाचे सलून लिवो आता पुणेकरांसाठी कोरगाव पार्क येथील होटेल वेस्टिनमध्ये सुरू करण्यात आले असून, प्रणिता बावेजा आपल्या अनुभवी, कुशल व्यावसायिकांच्या टीमसह या लक्झरी ब्रँडचे नेतृत्व करत आहेत, यात युक्रेनची हेअरस्टाईलिस्ट मिला पारखीना आणि यूएसएमधील जेसन बी यांचा देखील समावेश आहे, त्यांना २० वर्षांहून अधिक अनुभव आहे.

मिलाकडे युरोपियन टेक्निक आणि भारतीय लुक यांची उत्तम सांगड घालण्याची अनोखी कला असुन आपल्या अनुभवाद्वारे भारतीय पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही कश्या प्रकार उत्कुष्ट लुक देते येईल याची समज आहे, आणि तीला १० वर्षांहून अधिक अनुभव आहे. जेसन आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभवी असुन तो तरुणांची गरज समजून घेतो आणि त्याच्या ग्राहकांना त्यांच्या पर्सॅनॅलिटीप्रमाणे आवडीप्रमाणे हेयरस्टाईल देतो, तो स्त्री आणि पुरुष दोघांसाठी योग्य रंग, कट आणि केसांच्या टॅटू कलेमध्ये उत्कृष्ट आहे, लिवो सलॅान आपल्या सर्व ग्राहकांना एक अनोखा आणि अतुलनीय अनुभव देण्याचे वचन देते.

या लॉंचला पुण्यातील ख्यातनाम व्यक्तींनी हजेरी लावली होती ज्यात विविध क्षेत्रातील नामवंत, मान्यवर व्यक्तींचा समावेश होता. लिवो   म्हणजे मऊपणा, पॉलिश करणे, वाढवणे किंवा उन्नत करणे आणि वेस्टिन मधील हे आकर्षक सलॉन आपल्या ग्राहकांना असाच अनुभव देते. लिवोची स्थापना २०१० मध्ये झाली असुन त्याचे प्रमुख आउटलेट एनसीआर गुडगाव येथे आहे. त्यांनी वर्षानुवर्षे आपला कार्याविस्तार केला असुन, ते डब्ल्यू-गोवा, रॅफल्स उदयपूर, कोर्टीयार्ड बाय मॅरियट, अरावली (एनसीआर फरीदाबाद) यासारख्या प्रमुख ठिकाणी उपस्थीत आहेत. त्यांना मिळालेल्या यशा नंतर पुढेही ते असाच कार्यविस्तार करत राहतील. पुढील काही महिन्यांत दर ४५ दिवसांनी  लिवो   स्पा आणि सलून भारतभर उघडले जातील.

२००५ मध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर, प्रणिताने ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये एक तरुण उद्योजक म्हणून पहिले पाऊल टाकले, ती तिच्या कौटुंबिक व्यवसायात सीओओ, ट्रॅव्हल सर्व्हिसेस इंटरनॅशनल (टीएसआय) म्हणून कार्यरत झाली आणि ऑफलाइन व्यवसायात ऑनलाइन बदल घडवून आणले. कंपनीचा महसूल अनेक पटींनी वाढवण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली, जी अखेरीस यात्रा डॉट कॉम ने विकत घेतली. तिने २०२० मध्ये  लिवो स्पालॉन  चा पदभार स्वीकारला आणि तिच्या व्यवसायाचा विकास आणि व्यवस्थापन कौशल्यांचा प्रभावीपणे वापर केला, परिणामी कोविडचा प्रभाव असतानाही व्यवसायाला संपूर्ण वळण मिळाले. लेवो ने तिच्या नेतृत्वाखाली भारतातील एक आघाडीचा लक्झरी ब्रँड बनून उद्योगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय नावांशी संबंध जोडून मोठी उंची गाठली आहे. प्रणिताने  लिवोचा विस्तार केला आहे आणि 2 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्तरावर पोहचण्यात ती यशस्वी झाली आहे.

वेस्टिन, कोरेगाव पार्क येथे लिवो सलॉन आणि स्पाच्या शानदार लॉन्च प्रसंगी बोलताना, लिओच्या प्रमुख आणि एमडी प्रणिता बवेजा म्हणाल्या, “महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे शहर असण्यासोबतच पुणे हे अतिशय

उत्साही, सांस्कृतिक आणि फॅशनेबल आहे. मला नेहमीच इथल्या लोकांसाठी लक्झरीच्या दृष्टीने काहीतरी खास बनवायचे होते आणि यासाठी वेस्टिन, पुण्यापेक्षा चांगले ठिकाण नाही. आम्ही एक भव्य संकल्पना तयार करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि मला विश्वास आहे की आम्ही येथील लोकांशी चांगला संपर्क प्रस्थापित करू शकू.

लिवो  मध्ये ग्राहकांना वन-स्टॉप शॉप स्पा आणि सलूनचा अनुभव मिळेल. मेक-अप, डर्मिटोलॉजिस्ट, नेल आर्ट, आय-लॅश एक्स्टेंशन, मायक्रो-ब्लेडिंग, हेयर आणि सेमी पर्मनंट मेक-अप यासारख्या इतर संबंधित सेवांचा आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव येथे मिळेल. लिवो  मध्ये उच्च प्रशिक्षित, अनुभवी स्टायलिस्ट, टेक्निशीयन्स, डॉक्टर आणि थेरपिस्टची टीम आहे.

या लॉन्चला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला पहिल्यांदाच सौंदर्य आणि तंत्रज्ञानाचा समन्वय अनुभवायला मिळेल. आम्ही सादर करत आहोत एक थ्री डी हेअर व्हर्च्युअल ट्राय ऑनजो तुम्हाला हेअर कट करण्याआधिच तो तुमच्या केसांवर कसा दिसेल याची रिअल टाइम झलक दाखवेल.”  

या असोसिएशनबद्दल बोलताना, द वेस्टिन, पुणेचे जीएम सुदीप म्हणालेवेस्टिनच्या सिग्नेचर हेवनली स्पासोबत भागीदारीत  लिवो  “ स्पालॉनलाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला वाटते की स्पा म्हणजे केवळ सुविधा, उपचार आणि उत्पादने नाही तर ही मनशांतीसाठी एकांतात राहण्याची, रिलॅक्स करण्याची जागा आहे.  लिवो   सोबतच्या पार्टनरशीद्वारे आम्ही वेलनसची वचनबद्धता दर्शवते, वेस्टिन आणि  लिवो स्पॅलॉनचा स्वर्ग सुख देणारा हा स्पा तुम्हास सौंदर्याच्या अनुभवासोबतच मन आणि शरीर ताजेतवाने करण्यास मदत करेल.

लिवोला त्यांची उत्पादने, सेवा आणि प्रत्येक वेळी उत्कृष्ट सेवा प्रदान करणारी टिम अद्वितीय बनवते - अनुभवी स्टायलिस्ट आणि थेरपिस्टची अत्यंत सक्षम टीम ज्यांना सौंदर्य उद्योगात ४०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे. - जगभरातील आघाडीच्या कंपन्या आणि उत्पादनांच्या ब्रँड द्वारे टिमसाठी नियमित प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. - ग्राहकांच्या त्वचा संबंधित गरजा पूर्ण करणारी वैद्यकीय व्यावसायिकांची टीम उपलब्ध आहे.