पुणेः प्राचीन
काळापासून आजतागायत जगातील अनेक संस्कृती व परंपरांमध्ये ज्याने आपला प्रभाव कायम
ठेवला आहे असे सोने केवळ मौल्यवान धातू नाही तर सुख, समृद्धी, शुभ व
पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. अलंकारांबरोबरीनेच गुंतवणुकीतही सोन्याचा मान
कायम पहिला असतो. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने भारतातील ज्वेलरी ब्रँड, टाटा समूहातील तनिष्क प्रस्तुत करत आहे एक अनोखा
विचार, ज्यामध्ये हातांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले
आहे.यंदा अक्षय तृतीयेला आमच्या हातांनी घडवलेली अद्भुत कला अनुभवा, बांगड्यांचे विशाल कलेक्शन कलाईमध्ये!
तनिष्कतर्फे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या
मूल्यावर २०% पर्यंतची सूट दिली जात आहे. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीपुरती लागू
राहील.
बांगड्यांचे नवनवीन ट्रेंड्स डोळ्यासमोर ठेवून आणि
हातांद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सुख-समृद्धीचा सन्मान करत तनिष्क सादर करत आहे
- 'कलाई' ज्यामध्ये
आहेत १८ ते २२ कॅरेट सोन्यामध्ये घडवलेली अद्भुत डिझाइन्स आणि कलात्मक कुशल
कारिगरी.
अनेक वेगवेगळ्या
प्रकारची ही डिझाइन्स वेगवेगळ्या परंपरांपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहेत
- घेरू फिनिशच्या साऊथ स्टाईल बांगड्या, स्टॅम्प
वर्क आणि एनेमेलिंगसारख्या पारंपरिक कारिगरीने बनवलेल्या अँटिक बांगड्या, चंद्राचे आकार आणि फुले, प्राचीन वास्तुकलेमध्ये आढळणारे घुमट, मोत्यांचा गुच्छ असलेले स्टेटमेंट पीस, राजस्थानची शान दर्शवणाऱ्या टेक्सचर्ड शीट्स, एनेमेल, पिरोई
यासारख्या कलांचा सुंदर संगम असे अनेक प्रकार यामध्ये आहेत.
तनिष्कने केलेल्या
एका ग्राहक संशोधनानुसार सोन्याच्या किमती वाढल्याने या सणासुदीच्या काळात
सोन्याच्या खरेदीचा उत्साह कमी होण्याची शक्यता नाही कारण बहुतांश ग्राहकांनी
सोन्याच्या किमती वाढलेल्या असताना देखील सोने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली
आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींना नियंत्रणात राखत, तनिष्कने
नुकताच हाय-लाईट्स हा प्लॅटफॉर्म
सादर केला आहे, ज्याठिकाणी
तोच लुक आणि तोच फील पण कमी किमतींमध्ये देणारे, वजनाला
अतिशय हलके दागिने उपलब्ध आहेत.
तनिष्कने डिझाईन
रिकन्स्ट्रक्शनसारख्या विस्तृत उत्पादन अभियांत्रिकी प्रक्रिया, अभिनव तंत्रज्ञान आणि अधिक मजबूत असलेल्या
सोन्याच्या मिश्र धातूचा उपयोग करत दागिन्यांच्या वजनात १५ ते २५ टक्क्यांची घट
करण्यात यश मिळवले आहे.
अक्षय तृतीयेसाठी
सोन्याच्या नाण्यांची खरेदी करणे ग्राहकांसाठी खूपच सहजसोपे व सुविधाजनक व्हावे
यासाठी तनिष्कने '२४के एक्स्प्रेस' ही
गोल्ड कॉइन एटीएम देखील सुरु केली आहेत. '२४के
एक्स्प्रेस' गोल्ड कॉइन एटीएम सुविधा निवडक शहरांमध्ये
तनिष्कच्या प्रमुख दुकानांमध्ये उपलब्ध असणार आहे.
टायटन कंपनी
लिमिटेडमध्ये तनिष्कचे कॅटेगरी, मार्केटिंग अँड
रिटेलचे उपाध्यक्ष श्री. अरुण नारायण यांनी सांगितले, "दोन वर्षांनंतर अक्षय तृतीया साजरी होणार, याचा प्रचंड उत्साह आणि आनंद ग्राहकांमध्ये
पाहायला मिळत आहे. आमच्या स्टोर्समध्ये हा उत्साह ठळकपणे दिसून येत आहे, तसेच आमच्या ग्राहक सर्वेक्षणातही ५४% ग्राहकांनी
अक्षय तृतीयेला दागिने खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे.
कलाई या कलेक्शनमध्ये १५० पेक्षा जास्त डिझाइन्स आहेत, जी विविध कारिगरी व कलांचा वापर करून घडवण्यात
आली आहेत, नक्काशी, जाली कट, क्लोज्ड सेटिंग, स्टॅम्प
वर्क, फिलग्री आणि इतर अनेक कला यामध्ये पाहायला
मिळतात. नवनिर्माण करण्याची, प्रेम, स्नेह व्यक्त करण्याची, पोषण करण्याची आणि आशीर्वाद देण्याची शक्ती
असलेल्या हातांना अलंकारांनी सुशोभित व सन्मानित करण्यासाठी आम्ही हे कलेक्शन सादर
करत आहोत."
'कलाई' कलेक्शन
निवडक तनिष्क स्टोर्समध्ये आणि तनिष्कची ई-कॉमर्स सक्षम वेबसाईट https://www.tanishq.co.in/akshaya-tritiya वर उपलब्ध आहे.
0 comments:
Post a Comment