Thursday, April 7, 2022

अध्यात्म, विज्ञानाची सांगड घालावीः राज्यपाल कोश्यारी

4/4/2022

पुणे:  राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. भगवदगीतेमध्येसुद्धा ही शिकवण दिली आहे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या एकत्रिकरणातून शिक्षण प्रदान करावे. असे झाल्यास स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्याप्रमाणे २१ व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल, असे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. 

माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टडिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबागपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती घुमटाचा विश्वार्पणश्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवनाचा लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होतेयावेळी राज्यपाल यांच्या हस्ते श्रीमद भगवद्गीतेच्या सव्वा लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.

यावेळी संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकरएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराडकार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराडएमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराडप्रा. स्वाती चाटे कराडडॉ. सुचित्रा नागरे- कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. आर. एम चिटणीस आणि डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, की जीवनामध्ये साधऩा
महत्वाची आहे. अधिक साधना केल्यास त्याचे योग्य फळ मिळते. आज लोक श्रीमंतांचे नाही
, तर संतांचे पाय धरतात. कारण संत साधनेमध्ये मग्न असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात मग्न रहावे. डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती संदेश देत आहेत, तर दुसरीकडे या यज्ञाच्या रक्षणासाठी धर्नुधारी अर्जुनाची गरज आहे. सर्व धर्माचा सार शांती हा आहे. साधू-संतांच्या त्यागाने भारतीय संस्कृती अमर आहे. नव्या युगात विज्ञान आणि आध्यात्माचा योग व्हावा. सदाचाराचे शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. धर्माचे तत्व सांगणारा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भगवदगीता ज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून भारत विश्वगुरू बनेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणातसुद्धा अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,“ अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा आज जगाला अर्पण करत आहोत. जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी पाहिले होते, ते सत्यात उतरण्याची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला साथ देत एमआयटी ग्रुप श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा प्रती वाटप केल्या आहेत.

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “ शिक्षण पद्धतीमध्ये जागतिक शांततेचा अभ्यासक्रम अंतर्भाव व्हावा. या वास्तूच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश देईल. वसाहतवादी मानसिकता बदलण्याची गरज आहे. इंडियाचे नाव बदलून भारत करण्याची भावना आहे. स्वतंत्रता दिवस हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा व्हावा. धर्म, जात, पैसे हे लोकशाहीचे सर्वात मोठे शत्रू आहेत.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले,“ हिंदु संस्कृती आणि वेदांमध्ये मानव कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. हिंदू धर्माचे सार गीतेमध्ये आहे. पुरुषार्थ, कामार्थ, मोक्षार्थ आणि अर्थ या यशस्वी जीवनासाठी महत्वाच्या बाबी आहेत. प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.

1 comments:

  1. Gambling.com offers probably the most up-to-date info on legal online playing in every state. You could want to examine our devoted US online playing laws page and examine local laws before diving into the action on certainly one of our online playing sites. The lack of knowledge on school pupil gamblers from around the world suggests that this is an area ripe for rigorous research to be undertaken. Jim "Mattress Mack" McIngvale, of Houston, left, stands near a stack of mattresses he was making a gift of|gifting away} in Atlantic City N.J., Tuesday, Nov. 1, 2022. A prolific gambler with a knack for attention-getting bets stands to win practically $75 million if the Houston Astros win the World Series, together with what sports books bet365 say could be the biggest payout on a single legal sports guess in U.S. historical past.

    ReplyDelete