27/4/2022
पुणेः पुणे शहरात आज
प्रथमच टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टम-एम्ब्रियोस्कोप मशीनची सुरूवात डीपीयू आयव्हीएफ
ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटर मध्ये सुरूवात करण्यात आली.
पुण्यातील पहिल्या अशा टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टम- एम्ब्रियोस्कोपी मशीनचे उद्घाटन भारतातील प्रसिध्द अशा कम्प्युटर
शास्त्रज्ञ असलेल्या पद्मभुषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्ष्कार विजेते डॉ.विजय
भाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या केंद्रामध्ये
प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपयोगी असे उपचार उपलब्ध असून यामुळे आयव्हीएफ
लॅब आणि अत्याधुनिक अशा ३ डी एन्डोस्कोपी ऑपरेटिंग सिस्टममुळे गर्भधारणेची शक्यता
अधिक प्रमाणात वाढू शकेल. टाईम लॅप्स इमेजिंग टेक्नॉलॉजीमुळे गर्भधारणेची शक्यता ही
अतिशय सुरक्षितरीत्या आणि कार्यक्षमतेने वाढते.
या कार्यक्रमाला
उपस्थित मान्यवरांमध्ये डीपीयूचे ट्रस्टी आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील, आयव्हीएफ सेंटरच्या
प्रमुख डॉ. सुनीता तांदूळवाडकर, पद्मश्री, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते डॉ.विजय
भाटकर, डीपीयूचे कुलगुरू डॉ. पी डी पाटील आणि डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ पुण्याचे
प्र-कुलगुरू डॉ. एन जे पवार यांचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून
डॉ. डी वाय पाटील ग्रुपने नेहमीच आपल्या वचनबद्धतेने आणि सातत्याने सर्वोत्कष्ट गुणवत्तेचे प्रशिक्षण आणि
आरोग्यसेवा देण्यात आपले नांव कमावले आहे. १९९६ मध्ये डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल
ॲन्ड सिसर्च सेंटरची पुण्यात स्थापना करण्यात आली. हे केंद्र म्हणजे राज्यातील
सर्वांत मोठे खासगी क्षेत्रातील प्रशिक्षण आणि संशोधन करणारे हॉस्पिटल असून ते ८
लाख २७ हजार ७०८ चौरस फुटांवर पसरलेले आहे.
कुलगुरू डॉ. पी डी
पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल ने आरोग्य सुविधा आणि त्यांच्या विशेष सेवा
या एकाच छताखाली समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यांनी
नैतिकता आणि पारदर्शक व्यवहारासाठी आपले नाव कमावले आहे . त्यांच्या सर्वोत्कृष्ट सुविधा आणि सेवांमुळे शहरातील अन्य
रुग्णालयांच्या तुलनेत हे हॉस्पिटल अजोड ठरले
आहे.
डॉ. सुनीता
तांदुळवाडकर या मेडिकल डायरेक्टर आणि चीफ ऑफ डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी
सेंटरच्या प्रमुख असून त्यांच्या अनेक दशकांच्या अनुभवाचा उपयोग करून तसेच असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्निक्स (एआरटी)चा
लाभ होत आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम
करणार्या तज्ञ डॉक्टर तसेच डॉ. राजेंद्र शितोळे आणि डॉ. बुशरा खान यांच्या कार्यकुशलतेमुळे दररोज अनेक लोकांच्या
जीवनात प्रकाशज्योत तेवत आहे.
या उद्घाटन
कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करतांना डीपीयू चे कुलगुरू मा. डॉ. पी डी पाटील यांनी सांगितले “ पुनरुत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक
अशा टाईम लॅप्स इमेजिंग ने युक्त अशा पुण्यातील पहिल्या
एम्ब्रियोस्कोप मशीनची सुरूवात करतांना आम्हाला
आनंद होत आहे. हे केंद्र अनुभव, कौशल्य आणि
तंत्रज्ञानावर आधारीत असून आमच्या अनुभवी
डॉक्टरांच्या टीममुळे वैद्यकीय क्षेत्रातील कुशलता आणि वैयक्तिक उपचारांची सर्वोत्कृष्ट गुणवत्ता रुग्णांना
उपलब्ध होत आहे. डीपीयूमध्ये आम्ही नेहमीच सर्वोत्कृष्टता
प्राप्त करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील असतो.”
डॉ. डी वाय पाटील
विद्यापीठ सोसायटीच्या प्रो. चॅन्सेलर डॉ. भाग्यश्री पाटील यांनी सांगितले “डीपीयू
आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटर कडून रुग्णांना लक्षपूर्वक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा व उपकरणांचा वापर
करून गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणारा हा एक अनोखा
उपक्रम आहे, पुण्यातील पहिल्याच अनोख्या अशा टाईम लॅप्स इमेजिंगमुळे हे केंद्र वैद्यकीय क्षेत्रातील
आघाडीचे केंद्र बनेल आणि त्यामुळे सकारात्मक बदल घडून येतील.”
यावेळी बोलताना
पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार विजेते डॉ. विजय भाटकर यांनी सांगितले की “ वैद्यकशास्त्रामध्ये नेहमीच नावीन्यपूर्ण
तंत्रज्ञान येत असते. जेणेकरून समाजावर सकारात्मक परिणाम घडत
असतात. दी टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टममुळे जनन दर
मोठ्या प्रमाणावर वाढून गरोदरपणातील नुकसान कमी करणे शक्य होते. वैद्यकशास्त्राने नेहमीच तंत्रज्ञानाशी
सांगड घालून आजकाल अनेक अशा गोष्टी केल्या आहेत,
ज्या पूर्वी अशक्य होत्या आणि तंत्रज्ञानामुळे आजकाल काहीच अशक्य नाही. मी डीपीयू
आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटर तसेच अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान अंमलात आणून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल आणल्याबद्दल
डीपीयूचे अभिनंदन करतो.”
केंद्रातर्फे अंमलात
आणल्या जाणार्या अनेक तंत्रज्ञानांपैकी असिस्टेड हॅचिंग ऑफ ब्लास्टोसिस्टमुळे अधिकतर परिणाम साध्य होणे, नो-टच
क्लोज्ड आयसीएसआय चेंबर, स्पिंडल इमेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून आयसीएसआय
करता अधिकतर गर्भधारणेची शक्यता अशा अनेक
तंत्रज्ञानांचा समावेश आहे. डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटरमध्ये वारंवार गर्भधारणा न होणे, सातत्याने गर्भपात होणे आणि वयाने अधिक असलेल्या जोडप्यांसाठी टाईम लॅप्स इमेजिंग
सिस्टम- एम्ब्रियोस्कोपचा वापर करून नॉन इन्व्हेझिव्ह
प्रीइम्प्लिमेंटेशन जेनेटिक टेस्टिंग (नीपीजीटी) मुळे सर्वोत्कृष्ट ब्लास्टोसिस्टची निवड करून अंमलबजावणीचा दर वाढवून गर्भपाताचे
प्रमाण कमी करणे शक्य होते. टाईम लॅप्स इमेजिंग
सिस्टम चा वापर करून ९० टक्के यशाचा दर मिळवणे शक्य होते.
टाईम लॅप्स तंत्रज्ञानामुळे
वाट पाहण्याचा वेळ आणि कल्चर काळासाठीचा ताण कमी होऊन जलद तपासणी होऊ शकते. टाईम
लॅप्सचा वापर करून कल्चरला त्रास न होता आणि
सातत्याने इमेज मिळवणे शक्य झाल्यानंतर अधिक सकारात्मक पध्दतीने निवड प्रक्रिया
करणे सोपे जाते.
डीपीयू आयव्हीएफ
ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटरमध्ये जगभरातील रुग्णंकरता त्यांच्या मोठ्या अनुभवामुळे आणि
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. हॉस्पिटलकडे अतिशय जटील अशा शस्त्रक्रिया
करण्याचे कौशल्य उपलब्ध असून यांत महत्त्वपूर्ण अवयवांचे रोपण जसे किडनी, यकृत, डोळे आणि हृदय यांचा
समावेश आहे. जूनपासून त्यांच्यामार्फत फुप्फुसांचे रोपण ही सुरू करण्याची योजना
आखण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment