Thursday, April 28, 2022

अक्षयतृतीयेला तनिष्कचे बांगड्यांचे विशाल कलेक्शन

पुणेः प्राचीन काळापासून आजतागायत जगातील अनेक संस्कृती व परंपरांमध्ये ज्याने आपला प्रभाव कायम ठेवला आहे असे सोने  केवळ मौल्यवान धातू नाही तर सुखसमृद्धीशुभ व पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. अलंकारांबरोबरीनेच गुंतवणुकीतही सोन्याचा मान कायम पहिला असतो. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने भारतातील ज्वेलरी ब्रँडटाटा समूहातील तनिष्क प्रस्तुत करत आहे एक अनोखा विचारज्यामध्ये हातांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.यंदा अक्षय तृतीयेला आमच्या हातांनी घडवलेली अद्भुत कला अनुभवाबांगड्यांचे विशाल कलेक्शन कलाईमध्ये! तनिष्कतर्फे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मूल्यावर २०% पर्यंतची सूट दिली जात आहे. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीपुरती लागू राहील.

बांगड्यांचे  नवनवीन ट्रेंड्स डोळ्यासमोर ठेवून आणि हातांद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सुख-समृद्धीचा सन्मान करत तनिष्क सादर करत आहे - 'कलाईज्यामध्ये आहेत १८ ते २२ कॅरेट सोन्यामध्ये घडवलेली अद्भुत डिझाइन्स आणि कलात्मक कुशल कारिगरी.

अनेक वेगवेगळ्या प्रकारची ही डिझाइन्स वेगवेगळ्या परंपरांपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहेत - घेरू फिनिशच्या साऊथ स्टाईल बांगड्यास्टॅम्प वर्क आणि एनेमेलिंगसारख्या पारंपरिक कारिगरीने बनवलेल्या अँटिक बांगड्याचंद्राचे आकार आणि फुलेप्राचीन वास्तुकलेमध्ये आढळणारे घुमटमोत्यांचा गुच्छ असलेले स्टेटमेंट पीसराजस्थानची शान दर्शवणाऱ्या टेक्सचर्ड शीट्सएनेमेलपिरोई यासारख्या कलांचा सुंदर संगम असे अनेक प्रकार यामध्ये आहेत.

तनिष्कने केलेल्या एका ग्राहक संशोधनानुसार सोन्याच्या किमती वाढल्याने या सणासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीचा उत्साह कमी होण्याची शक्यता नाही कारण बहुतांश ग्राहकांनी सोन्याच्या किमती वाढलेल्या असताना देखील सोने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींना नियंत्रणात राखततनिष्कने नुकताच हाय-लाईट्स हा प्लॅटफॉर्म
सादर केला आहे
ज्याठिकाणी तोच लुक आणि तोच फील पण कमी किमतींमध्ये देणारेवजनाला अतिशय हलके दागिने उपलब्ध आहेत. 

तनिष्कने डिझाईन रिकन्स्ट्रक्शनसारख्या विस्तृत उत्पादन अभियांत्रिकी प्रक्रियाअभिनव तंत्रज्ञान आणि अधिक मजबूत असलेल्या सोन्याच्या मिश्र धातूचा उपयोग करत दागिन्यांच्या वजनात १५ ते २५ टक्क्यांची घट करण्यात यश मिळवले आहे.

अक्षय तृतीयेसाठी सोन्याच्या नाण्यांची खरेदी करणे ग्राहकांसाठी खूपच सहजसोपे व सुविधाजनक व्हावे यासाठी तनिष्कने '२४के एक्स्प्रेसही गोल्ड कॉइन एटीएम देखील सुरु केली आहेत.  '२४के एक्स्प्रेसगोल्ड कॉइन एटीएम सुविधा निवडक शहरांमध्ये तनिष्कच्या प्रमुख दुकानांमध्ये उपलब्ध असणार आहे.

टायटन कंपनी लिमिटेडमध्ये तनिष्कचे कॅटेगरीमार्केटिंग अँड रिटेलचे उपाध्यक्ष श्री. अरुण नारायण यांनी सांगितले, "दोन वर्षांनंतर अक्षय तृतीया साजरी होणारयाचा प्रचंड उत्साह आणि आनंद ग्राहकांमध्ये पाहायला मिळत आहे. आमच्या स्टोर्समध्ये हा उत्साह ठळकपणे दिसून येत आहेतसेच आमच्या ग्राहक सर्वेक्षणातही ५४% ग्राहकांनी अक्षय तृतीयेला दागिने खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे. 

कलाई या कलेक्शनमध्ये १५० पेक्षा जास्त डिझाइन्स आहेतजी विविध कारिगरी व कलांचा वापर करून घडवण्यात आली आहेतनक्काशीजाली कटक्लोज्ड सेटिंगस्टॅम्प वर्कफिलग्री आणि इतर अनेक कला यामध्ये पाहायला मिळतात. नवनिर्माण करण्याचीप्रेमस्नेह व्यक्त करण्याचीपोषण करण्याची आणि आशीर्वाद देण्याची शक्ती असलेल्या हातांना अलंकारांनी सुशोभित व सन्मानित करण्यासाठी आम्ही हे कलेक्शन सादर करत आहोत." 

'कलाईकलेक्शन निवडक तनिष्क स्टोर्समध्ये आणि तनिष्कची ई-कॉमर्स सक्षम वेबसाईट https://www.tanishq.co.in/akshaya-tritiya वर उपलब्ध आहे.

 


डीपीयू आयव्हीएफमध्ये टाईम-लॅप्स इमेजिंग एम्ब्रियोस्कोप

27/4/2022

पुणेः पुणे शहरात आज प्रथमच टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टम-एम्ब्रियोस्कोप मशीनची सुरूवात डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटर मध्ये सुरूवात करण्यात आली. पुण्यातील पहिल्या अशा टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टम- एम्ब्रियोस्कोपी मशीनचे उद्घाटन भारतातील प्रसिध्द अशा कम्प्युटर शास्त्रज्ञ असलेल्या पद्मभुषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्ष्कार विजेते डॉ.विजय भाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपयोगी असे उपचार उपलब्ध असून यामुळे आयव्हीएफ लॅब आणि अत्याधुनिक अशा ३ डी एन्डोस्कोपी ऑपरेटिंग सिस्टममुळे गर्भधारणेची शक्यता अधिक प्रमाणात वाढू शकेल. टाईम लॅप्स इमेजिंग टेक्नॉलॉजीमुळे गर्भधारणेची शक्यता ही अतिशय सुरक्षितरीत्या आणि कार्यक्षमतेने वाढते.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये डीपीयूचे ट्रस्टी आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील, आयव्हीएफ सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनीता तांदूळवाडकर, पद्मश्री, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते डॉ.विजय भाटकर, डीपीयूचे कुलगुरू डॉ. पी डी पाटील आणि डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ पुण्याचे प्र-कुलगुरू डॉ. एन जे पवार यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. डी वाय पाटील ग्रुपने नेहमीच आपल्या वचनबद्धतेने आणि सातत्याने सर्वोत्कष्ट गुणवत्तेचे प्रशिक्षण आणि आरोग्यसेवा देण्यात आपले नांव कमावले आहे. १९९६ मध्ये डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल ॲन्ड सिसर्च सेंटरची पुण्यात स्थापना करण्यात आली. हे केंद्र म्हणजे राज्यातील सर्वांत मोठे खासगी क्षेत्रातील प्रशिक्षण आणि संशोधन करणारे हॉस्पिटल असून ते ८ लाख २७ हजार ७०८ चौरस फुटांवर पसरलेले आहे.

कुलगुरू डॉ. पी डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल ने आरोग्य सुविधा आणि त्यांच्या विशेष सेवा या एकाच छताखाली समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यांनी नैतिकता आणि पारदर्शक व्यवहारासाठी आपले नाव कमावले आहे . त्यांच्या सर्वोत्कृष्ट सुविधा आणि सेवांमुळे शहरातील अन्य रुग्णालयांच्या तुलनेत हे हॉस्पिटल अजोड ठरले आहे.

डॉ. सुनीता तांदुळवाडकर या मेडिकल डायरेक्टर आणि चीफ ऑफ डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटरच्या प्रमुख असून त्यांच्या अनेक दशकांच्या अनुभवाचा उपयोग करून तसेच असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्निक्स (एआरटी)चा लाभ होत आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार्‍या तज्ञ डॉक्टर तसेच डॉ. राजेंद्र शितोळे आणि डॉ. बुशरा खान यांच्या कार्यकुशलतेमुळे दररोज अनेक लोकांच्या जीवनात प्रकाशज्योत तेवत आहे.

या उद्घाटन कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करतांना डीपीयू चे कुलगुरू मा. डॉ. पी डी पाटील यांनी सांगितले पुनरुत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक अशा टाईम लॅप्स इमेजिंग ने युक्त अशा पुण्यातील पहिल्या एम्ब्रियोस्कोप मशीनची सुरूवात करतांना आम्हाला आनंद होत आहे. हे केंद्र अनुभव, कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारीत असून आमच्या अनुभवी डॉक्टरांच्या टीममुळे वैद्यकीय क्षेत्रातील कुशलता आणि वैयक्तिक उपचारांची सर्वोत्कृष्ट गुणवत्ता रुग्णांना उपलब्ध होत आहे. डीपीयूमध्ये आम्ही नेहमीच सर्वोत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील असतो.

डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या प्रो. चॅन्सेलर डॉ. भाग्यश्री पाटील यांनी सांगितले डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटर कडून रुग्णांना लक्षपूर्वक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा व उपकरणांचा वापर करून गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणारा हा एक अनोखा उपक्रम आहे, पुण्यातील पहिल्याच अनोख्या अशा टाईम लॅप्स इमेजिंगमुळे हे केंद्र वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीचे केंद्र बनेल आणि त्यामुळे सकारात्मक बदल घडून येतील.

यावेळी बोलताना पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार विजेते डॉ. विजय भाटकर यांनी सांगितले की वैद्यकशास्त्रामध्ये नेहमीच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान येत असते. जेणेकरून समाजावर सकारात्मक परिणाम घडत असतात. दी टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टममुळे जनन दर मोठ्या प्रमाणावर वाढून गरोदरपणातील नुकसान कमी करणे शक्य होते. वैद्यकशास्त्राने नेहमीच तंत्रज्ञानाशी सांगड घालून आजकाल अनेक अशा गोष्टी केल्या आहेत, ज्या पूर्वी अशक्य होत्या आणि तंत्रज्ञानामुळे आजकाल काहीच अशक्य नाही. मी डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटर तसेच अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान अंमलात आणून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल आणल्याबद्दल डीपीयूचे अभिनंदन करतो.

केंद्रातर्फे अंमलात आणल्या जाणार्‍या अनेक तंत्रज्ञानांपैकी असिस्टेड हॅचिंग ऑफ ब्लास्टोसिस्टमुळे अधिकतर परिणाम साध्य होणे,  नो-टच क्लोज्ड आयसीएसआय चेंबर, स्पिंडल इमेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून आयसीएसआय करता अधिकतर गर्भधारणेची शक्यता अशा अनेक तंत्रज्ञानांचा समावेश आहे. डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटरमध्ये वारंवार गर्भधारणा न होणे, सातत्याने गर्भपात होणे आणि वयाने अधिक असलेल्या जोडप्यांसाठी टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टम- एम्ब्रियोस्कोपचा वापर करून नॉन इन्व्हेझिव्ह प्रीइम्प्लिमेंटेशन जेनेटिक टेस्टिंग (नीपीजीटी) मुळे सर्वोत्कृष्ट ब्लास्टोसिस्टची निवड करून अंमलबजावणीचा दर वाढवून गर्भपाताचे प्रमाण कमी करणे शक्य होते. टाईम लॅप्स इमेजिंग सिस्टम चा वापर करून ९० टक्के यशाचा दर मिळवणे शक्य होते.

टाईम लॅप्स तंत्रज्ञानामुळे वाट पाहण्याचा वेळ आणि कल्चर काळासाठीचा ताण कमी होऊन जलद तपासणी होऊ शकते. टाईम लॅप्सचा वापर करून कल्चरला त्रास न होता आणि सातत्याने इमेज मिळवणे शक्य झाल्यानंतर अधिक सकारात्मक पध्दतीने निवड प्रक्रिया करणे सोपे जाते.

डीपीयू आयव्हीएफ ॲन्ड एन्डोस्कोपी सेंटरमध्ये जगभरातील रुग्णंकरता त्यांच्या मोठ्या अनुभवामुळे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. हॉस्पिटलकडे अतिशय जटील अशा शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य उपलब्ध असून यांत महत्त्वपूर्ण अवयवांचे रोपण जसे किडनी, यकृत, डोळे आणि हृदय यांचा समावेश आहे. जूनपासून त्यांच्यामार्फत फुप्फुसांचे रोपण ही सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.

Saturday, April 23, 2022

PNG Jewelers launches De Beers Code of Origin

24/4/2022

PUNE: The consumers of the future are changing and a new generation of socially and environmentally active consumers are emerging who want to increasingly associate with products and brands that have strong values focused around people and bettering the planet. To cater to such consumers, De Beers launched their trusted diamond program - Code of Origin at PNG Jewelers, a 189-year-old jewellery brand across their stores in Maharastra& Goa.

The De Beers Code of Origin is a trusted source programme that reflects De Beers’ deep commitment to social and environmental responsibility, so the consumer can be proud of where the diamonds come from. The De Beers Code of Origin is proof that the diamonds are natural and conflict free and were discovered by De Beers in Botswana, Canada, Namibia or South Africa where they have helped provide jobs, education, healthcare and wildlife conservation.

Each piece of jewelry comes with a 12-digit code beginning with the letters DBM engraved on it. The code, that can also be viewed on the De Beers Code of Origin card accompanying each piece of jewellery, also offers a guarantee to buyers that the diamonds in their jewelry are 100% natural, traceable, sustainably sourced.

“PNG Jewelers is a legacy that has stood for trust, commitment and purity over the last two centuries. We constantly strive to bring offerings that reinforce our values and benefit our customers. Our association with the De Beers Group is very valuable to us and we feel honored to launch the new ‘Code of Origin’ programme at 15 of our stores across Maharashtra and Goa! Offering authentic natural diamond jewellery in 0.08 carats and below with a guarantee of ethical and sustainable practices is an added benefit to our consumers. We look forward to our longstanding relationship with the brand.”said Dr. Saurabh Gadgil, Chairman and Managing Director, PNG Jewelers.

“What the De Beers Code of Origin envisions for Indian consumers is to provide complete transparency about the source and journey of their diamond jewelry through our trusted retailer partners. The De Beers Code of Origin guarantee will make them feel good about owning and wearing a De Beers diamond because they have been sourced by a company committed to carbon neutrality, a company that has helped educate young girls around the world, is ethical and sources diamonds that are natural and exquisitely beautiful. By purchasing a jewelry piece with a De Beers Code of Origin inscription, consumers themselves are contributing to our 2030 Building Forever mission to make the world a better place,” said Sachin Jain, Managing Director, De Beers India.

The De Beers Code of Origin is part of the larger vision of the brand for a better future through 12 sustainable goals based around leading ethical practices across industry; partnering for thriving communities; protecting the natural world; and accelerating equal opportunity.

गेरा डेव्हलपमेंट्सच्या चाइल्डसेन्ट्रिक होम्सचे उद्घाटन

23/4/2022

पुणे: गेरा डेव्हलपमेंट्स, रिअल इस्टेट व्यवसायाचे प्रणेते आणि नावीन्यपूर्ण चाइल्डसेंट्रिक होम्ससह प्रीमियम व्यावसायिक आणि निवासी प्रकल्पांचे पुरस्कार विजेते निर्माते, पुणे, गोवा आणि कॅलिफोर्निया मीटचे उद्घाटन सत्र यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.

यावेळी चॅम्पियन' मालिकामाजी भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद, मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक, भारत राष्ट्रीय बॅडमिंटन संघासह चाइल्डसेन्ट्रिक होम इव्हेंट यात सहभागी होते. गेरा डेव्हलपमेंट्सने चाइल्डसेंट्रिक होम्स या संकल्पनेचा पायंडा पाडला आहे, ज्याने रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन श्रेणी स्थापना केली आहे, तेथील रहिवाशांना प्रीमियम घर आणि पायाभूत सुविधा प्रदान केल्या आहेत आणि मुलांसाठी सुरक्षितता, सुविधा, मजा आणि विकास सुनिश्चित केला आहे.

गेराजचा क्रांतिकारी आणि उत्तम यशस्वी उत्पादन लाइन, चाइल्डसेंट्रिक होम्सचा अविभाज्य भाग बनवणाऱ्या बाल-अनुकूल शिक्षण अकादमी सादर करणे आणि त्यांचा प्रचार करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. संकल्पनेवर आधारित प्रकल्पांना ग्राहकांचा अपवादात्मक प्रतिसाद लाभला आहे तसेच नामवंत सेलिब्रिटी अॅम्बेसेडरकडूनही त्याची प्रशंसा झाली आहे.

गेरा डेव्हलपमेंट्सने या वर्षी मीट द चॅम्पियनइव्हेंटचे आयोजन करण्यासाठी ऑफलाइन फॉरमॅटमध्ये प्रवेश केला आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या 'गेराज वर्ल्ड ऑफ जॉय' ग्राहकांच्या उपस्थितीने या मालिकेची एकूण उत्सुकता दिसून आली. गेरा डेव्हलपमेंट्सने आयोजित केलेला असा शेवटचा ग्राहक-केंद्रित कार्यक्रम नोव्हेंबर 2019 मध्ये शंकर, एहसान आणि लॉय यांच्या मैफिलीद्वारे होता. २०२१-२२मध्ये गेरा क्लब आऊटडो - गेरा चा ग्राहकांसाठी खास लॉयल्टी कार्यक्रम द्वारे प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर, प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्यासोबत स्टार-स्टडेड व्हर्च्युअल कार्यक्रमाचे साक्षीदार होते.

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाविषयी बोलताना, गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक  रोहित गेरा म्हणाले, “आम्ही आमच्या बहुप्रतिक्षित मीट द चॅम्पियन इव्हेंटचे आयोजन करताना रोमांचित आहोत, जो खूप यशस्वी ठरला आहे. २०२२मध्ये थेट इव्हेंट आयोजित करण्यास सक्षम असणे हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत नक्कीच अधिक रोमांचक आहे. आणि जेव्हा हा कार्यक्रम  पुलेला गोपीचंद सारख्या प्रेरणादायी चॅम्पियन्सने भरलेला असतो, तेव्हा तो एक स्मॅशिंग हिट ठरेल. हा कार्यक्रम आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट उत्पादन प्रदान करण्याच्या आमची नवकल्पना आणि उत्कटतेचा आनंददायी उत्सव आहे आणि मुलांना वाढण्यास मदत करण्याच्या व्हिजनशी आमची बांधिलकी आहे.  पुलेला गोपीचंद यांच्यासोबत उद्घाटन सत्रात सहभागी होणे हा आम्हाला खूप अभिमान वाटला. आमच्या संकल्पनेवर आधारित प्रकल्पावरील त्यांचा पाठिंबा आणि विश्वास आम्हाला खूप पुढे नेईल.”

गेराच्या चाइल्डसेंट्रिक होम्स प्रकल्पांना पुण्यातील आमच्या ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रोत्साहन मिळत आहे. आमचा नवीनतम चाइल्डसेंट्रिक प्रकल्प काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. आमच्या ग्राहकांना चाइल्डसेंट्रिक® होम्स च्या सर्व अकादमी आणि विविध उपक्रमांचा अनुभव घेताना अतिशय आनंद होत आहे.

गेरा डेव्हलपमेंट्सने रहिवाशांच्या अगदी दारात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विविध तज्ञ आणि त्यांच्या अकादमींसोबत सहकार्य केले आहे, जे त्यांना नृत्य, गायन, पोहणे, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट इत्यादी पर्याय उपलब्ध करून देतील. गेरा यांनी कोणतीही कसर सोडली नाही. मुलांना विविध क्षेत्रात उच्च-गुणवत्तेचे कोचिंग अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे जेणेकरून मुलांना त्यांची आवड शोधता येईल आणि त्यांना त्या क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळेल. या संकल्पनेचे सौंदर्य म्हणजे विकासातच सुविधा दिल्या जातात.

आपला आनंद व्यक्त करताना, पुलेला गोपीचंद म्हणाले, “चाइल्डसेंट्रिक होम्सही एक अभिनव संकल्पना आहे, ती मुलांना त्यांची आवड निवडण्याचे स्वातंत्र्य देते. गेराच्या बालविकासाभिमुख दृष्टीचा एक भाग असल्याने मला प्रचंड आनंद मिळतो. यामुळे मी तरुण बॅडमिंटनपटूंच्या जवळ जाईन आणि पुण्यातील नवोदित प्रतिभा ओळखू शकेन. गेरा डेव्हलपमेंट्सचा वारसा आणि या पुरस्कार विजेत्या संकल्पनेत महेश भूपती, अनिल कुंबळे, बायचुंग भुतिया, शंकर महादेवन, दीपा कर्माकर आणि श्यामक दावर यासारख्या दिग्गजांशी निगडीत असणे हा खरोखर माझा विशेषाधिकार आहे.

चाइल्डसेंट्रिक होम्स ही संकल्पना नाविन्यपूर्ण आहे आणि आजच्या तरुण घर खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करून आणि जगण्याचा एक नवीन मार्ग सक्षम करून बदलत्या काळाची गरज दर्शवते. एक बहुआयामी राहण्याची जागा जी मुलाला कला, क्रीडा, नृत्य, संगीत इ. निवडण्याची आणि विकसित करण्याची परवानगी देते, ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक पालकांना त्यांच्या लहान मुलांसोबत काम करणार्या पालकांना किंवा कुटुंब, राहणीमान सुरू करण्याची योजना आखण्यासाठी त्यांच्या मुला-लक्ष्यित ऑफर करायची असते. न्यूक्लियर फॉरमॅट अंतर्गत आणि त्यांच्या मुलांना आणि स्वतःला शिकण्याची आणि वाढण्याची सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देणे. याआधी कधीही न पाहिलेले गृहनिर्माण समाधान प्रवास आणि समन्वयातील अडचणी वजा पर्यायांची श्रेणी देते.

Sunday, April 10, 2022

राष्ट्रीय पॅराजलतरण स्पर्धेत देवांशू रेवतकरला कांस्य

राष्ट्रीय पॅराजलतरण स्पर्धेत देवांशू रेवतकरला कांस्य

11/4/2022

पुणेः राजस्थानमधील उदयपूर येथे राष्ट्रीय पॅरा-ऑलिम्पिक जलतरण समितीच्या वतीने नारायण सेवा संस्थान येथे २१ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण अजिंक्यपद स्पर्धा २४ ते २७ मार्च २२ ह्या कालावधीमध्ये घेण्यात आल्या होत्या. देशभरातून २३ राज्यातील ४०० पेक्षा जास्त  पॅरा-जलतरण स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यात १४ श्रेणीतील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पद्मभुषण देवेंद्र झांजरिया, मेजर ध्यानचंद खेलचंद्र, कृष्णा नागर, ह्यांची मुख्य उपस्थिती होती. महाराष्ट्रच्या संघाने ३८६ अंक मिळवून विजेतेपद मिळविले व महाराष्ट्रातील खेळाडूंने घवघवीत यश संपादित केले. पुण्याचा देवांशू उल्हास रेवतकर हा एस १४ श्रेणीतील ऑटिस्टिक जलतरण खेळाडू असून हा ह्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सर्व तृतीय आला व त्याने कांस्य पदक पटकाविले.

२०० मीटर फ्री स्टाईल अंतर केवळ ८ मिनिटे व ५६ सेकंद मध्ये पूर्ण केले. २०१५ पासून देवांशूला जलतरण थेरपीला सुरवात केली. त्याला पाण्यात आनंद मिळतो व त्याचे मन रमते. देवांशूला जलतरण प्रशिक्षक सौरभ देशपांडे यांचे मार्गदर्शन असून डेक्कन जिमखाना येथील टिळक जलतरण तलाव मध्ये  नियमित सराव करीत असतो.तसेच बाल कल्याण संस्थेचे अभिजित तांबे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

देवांशूने अनेक जिल्हास्तरीय  व राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा मध्ये भाग घेतला व अनेक पुरस्कार मिळवले आहेत. देवांशूने यापूर्वी गोंदिया येथे २०१९ मध्ये झालेल्या ५० मीटर स्टाईल राज्य जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक,लायन्स क्लब पुणे द्वारा आयोजित राज्य स्पर्धेत तिसरा,२०१८ साली बालेवाडी येथे रोटरी क्लब ऑफ चिंचवड राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा,२०१६ साली झालेल्या लायन्स क्लब स्पर्धेत दुसरा,पुणे जिल्हा पातळीवर स्पर्धेत प्रथम,२०२० साली राज्य पॅरा जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. देवांशूची आई-वंदना व वडील-उल्हास रेवतकर यांचे नेहमीच त्याला प्रोत्साहन असते. उल्हास रेवतकर इंडियन पोटॅश लि.कंपनीमध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून काम करतात.

"देवांशूला मी गेल्या आठ वर्षांपासून जलतरण तलावावर प्रशिक्षण देत आलो आहे.डेक्कन जिमखाना येथील टिळक स्वीमिंग टॅन्क वर देवांशू ला आणले.विविध स्पर्धा खेळण्यासाठी मी त्याला प्रोत्साहन देत अस्तक त्या अनुषंगाने नियमित सर्व देत आहे यामुळे त्याचे आरोग्य उत्तम राहते व जीवन आनंदी होते,आत्मविश्वास वाढतो.भविष्यात देवांशू आपल्या देशाचे नावजलटर्न स्पर्धेत जगभरात उज्ज्वल करेल असा मला आत्मविश्वास आहे."

 

परदेशातील चांगलेच ही भावना चुकीचीः डाॅ. पटवर्धन

11/4/2022

पुणे : सध्याच्या काळात असे वातावरण तयार झाले आहे की, परदेशातून येते ते चांगलेच. यामुळे  आपल्यामध्ये आपल्या गोष्टींविषयी कमीपणाची जाणीव निर्माण होते आहे. आपण आपली हजारो वर्षांची परंपरा विसरत चाललोय. परंतु आपण आपली परंपरा विसरून चालणार नाही. लोककला परंपरा आणि संस्कृती सबळ करण्याचे काम गणेशोत्सव मंडळांनी केले आहे आहे. बदलत्या काळानुसार बदललेले कार्यकर्ते बघून आनंद होतो. पुण्याचे सामाजिक नेतृत्व गणेश मंडळांनी केले आहे, असे गौरवोद्गार नॅकचे अध्यक्ष डाॅ.भूषण पटवर्धन यांनी काढले.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे यंदाचा 'साई पुरस्कार' नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा,अमर राव, शंकर निंबाळकर, नरेंद्र व्यास, अमित दासानी, संकेत नंदकुमार ओव्हाळ,  राजू तापकीर, प्रसाद भोयरेकर यावेळी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फळांची परडी, शाल असे पुरस्कराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा १५ वे वर्ष होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, प्रभू श्रीराम हे सामाजिक जीवनाचा आदर्श आहेत त्याचप्रमाणे ज्ञान आणि विज्ञानाचे देखील ते आदर्श आहेत. ज्ञानाशिवाय जगण्याला अर्थ नाही. भारताला सामर्थ्यशाली बनवायचं असेल तर ज्ञानी व्हायला हवे. परंतु आजच्या शिक्षण संस्थामध्ये माहिती मिळते पण शिक्षण संस्थेतील जीवन संस्था हरविली आहे. भूषण गोखले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. पियुष शहा यांनी आभार मानले.

Thursday, April 7, 2022

अध्यात्म, विज्ञानाची सांगड घालावीः राज्यपाल कोश्यारी

4/4/2022

पुणे:  राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. भगवदगीतेमध्येसुद्धा ही शिकवण दिली आहे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या एकत्रिकरणातून शिक्षण प्रदान करावे. असे झाल्यास स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्याप्रमाणे २१ व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल, असे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. 

माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टडिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबागपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती घुमटाचा विश्वार्पणश्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवनाचा लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होतेयावेळी राज्यपाल यांच्या हस्ते श्रीमद भगवद्गीतेच्या सव्वा लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.

यावेळी संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकरएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराडकार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराडएमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराडप्रा. स्वाती चाटे कराडडॉ. सुचित्रा नागरे- कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. आर. एम चिटणीस आणि डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, की जीवनामध्ये साधऩा
महत्वाची आहे. अधिक साधना केल्यास त्याचे योग्य फळ मिळते. आज लोक श्रीमंतांचे नाही
, तर संतांचे पाय धरतात. कारण संत साधनेमध्ये मग्न असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात मग्न रहावे. डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती संदेश देत आहेत, तर दुसरीकडे या यज्ञाच्या रक्षणासाठी धर्नुधारी अर्जुनाची गरज आहे. सर्व धर्माचा सार शांती हा आहे. साधू-संतांच्या त्यागाने भारतीय संस्कृती अमर आहे. नव्या युगात विज्ञान आणि आध्यात्माचा योग व्हावा. सदाचाराचे शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. धर्माचे तत्व सांगणारा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भगवदगीता ज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून भारत विश्वगुरू बनेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणातसुद्धा अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,“ अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा आज जगाला अर्पण करत आहोत. जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी पाहिले होते, ते सत्यात उतरण्याची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला साथ देत एमआयटी ग्रुप श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा प्रती वाटप केल्या आहेत.

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “ शिक्षण पद्धतीमध्ये जागतिक शांततेचा अभ्यासक्रम अंतर्भाव व्हावा. या वास्तूच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश देईल. वसाहतवादी मानसिकता बदलण्याची गरज आहे. इंडियाचे नाव बदलून भारत करण्याची भावना आहे. स्वतंत्रता दिवस हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा व्हावा. धर्म, जात, पैसे हे लोकशाहीचे सर्वात मोठे शत्रू आहेत.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले,“ हिंदु संस्कृती आणि वेदांमध्ये मानव कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. हिंदू धर्माचे सार गीतेमध्ये आहे. पुरुषार्थ, कामार्थ, मोक्षार्थ आणि अर्थ या यशस्वी जीवनासाठी महत्वाच्या बाबी आहेत. प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.