Saturday, March 19, 2022

भारतीच्या विद्यार्थ्यांचे स्वर सुधा महोत्सवात सादरीकरण

19/3/2022

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मंत्रालयाच्या संगीत नाटक अकॅडमी तर्फे आयोजित प्रतिष्ठित 'स्वर सुधा कोरल म्युझिक इंस्ट्रुमेंटल महोत्सवा'त सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. राजस्थानमधील जोधपूर येथे या महोत्सव झाला. देशभरातील कलाकारांनी या तीन दिवसीय महोत्सवात सादरीकरण केले.  संपूर्ण सादरीकरणाचे संयोजन आणि मार्गदर्शन स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांनी केले होते.

संगीत नाटक अकादमीच्या वतीने हा महोत्सव अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु पहिल्यांदाच विद्यापीठांना या महोत्सवात सामील करून घेण्यात आले. देशभरातील केवळ चार विद्यापीठांना या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळाली यामध्ये पुण्यातील भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचा समावेश आहे. 

शारंगधर साठे म्हणाले, की स्कूल ऑफ आर्ट्सच्या परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी चार समूह गीते आणि दोन महाराष्ट्राची लोकगीते सादर केली. स्वर्ग सम संसार हो उच्चतम व्यवहार हो... हे हिंदी गीत तसेच लावणी आणि भक्तिगीत यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये हार्मोनियम, पखावज, ढोलक तसेच आधुनिक वाद्याचा देखील समावेश विद्यार्थ्यांनी केला. यातील गीते डॉ.विजया देव यांनी लिहिली होती तर प्रवीण कासलीकर यांनी ती संगीतबद्ध केली होती.

0 comments:

Post a Comment