Wednesday, March 16, 2022

एएसजी नेत्ररुग्णालय पिंपरी-चिंचवड, पुणेकरांच्या सेवेत

16/3/2022

पुणे : देशातील ख्यातनाम नेत्रोपचार रुग्णालयाची साखळी एएसजी आपल्या विस्ता धोरणांतर्गत पुण्यात दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील चौथी शाखा पुण्यातील पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकाजवळील आर.के.एन बिझनेस सेंटर येथे सुरु करण्यात आली आहे.

या रूग्णालयात मोतीबिंदूलसिक व्हिटीओ रेटोनाआक्युलोप्लास्टी ग्लूकोमा कॉर्नियातिरळेपणा न्युरो ऑप्येल्मॉलॉजी आदी नेत्ररांगांच्या श्रेणींवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध राहणार आहेत. पुणेकरांना या सुविधा रविवारी देखील उपलब्ध असणार आहेत. पुणेमधील प्रकल्पात डोळयाशी निगडीत सर्व आजार जटील शस्त्रकिया निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहेत. गरीब व गरजू रुग्णांसाठी वेळोवेळी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सन २००५ मध्ये डॉ. अरूण सिंधवी आणि डॉ शशांक गंग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजीआय समूहाची मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर काही अनुभवी व तज्ञ डॉक्टरांचा एएसजी समूहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार होत गेला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम नेत्रोपचार सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव न करता समान उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समुहाची स्थापना करण्यात आली.

एएसजीआय समूहाचे १४ राज्यांमधील ३३ शहरांमध्ये ४४ रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामध्ये राजस्थानगुजरातपश्चिम बंगालमध्यप्रदेश उत्तरप्रदेशआसामझारखंडछत्तीसगडजम्मू काश्मिरओडिसाविहार पंजाबमहाराष्टगोवा राज्यांचा सामावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रूग्णालयाची शाखा पूर्व आफ्रिका खंडातील युगांडामधील कंपला येथे गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असून दुसरी शाखा तीन वर्षापूर्वी नेपाळमधील काठमांडु येथे साकारण्यात आली आहे.

एएसजीआय समुहाला आजवर इंटरनेशल अचिव्हास (२००९) उत्कृष्ट सेवेसाठी बेल नेस हेल्थ (२०१०) आणि राजीव गांधी गोल्ड मेडल (२०१४) आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

0 comments:

Post a Comment