15/3/2022
कॉक्लिया पुणे फॉर हियरिंग एंड स्पीच सेंटरकडून मोफत श्रवणशक्ती तपासणी
पुणे: भारतात जन्मजात श्रवणशक्ती कमी असण्याची समस्या ही एक गंभीर समस्या आहे ज्यामध्ये दर १,००० सामान्य जन्मजात मुलांमागे ४ ते ६ बाळांना याचा त्रास होतो, याचा अर्थ भारतात दरवर्षी सुमारे १ लाख मुले श्रवणदोष घेऊन जन्माला येतात. महाराष्ट्राविषयी बोलायचे झाले तर, सुमारे ४५००-५००० जन्मजात श्रवणशक्ती कमी असणारी मुले जन्माला येतात. ३ मार्च हा जागतिक श्रवण दिन असुन कोक्लिया पुणे संपूर्ण मार्च महिनाच श्रवन दिनासारखाच पाळतात, जेथे पालक त्यांच्या नवजात किंवा लहान मुलांना मोफत श्रवण तपासणी चाचणीसाठी पुण्यातील कॉक्लिया पुणे फॉर हियरिंग एंड स्पीच सेंटर येथे आणू शकतात.
श्रवणशक्ती कमी होणे हे एक छुपे अपंगत्व आहे कारण यात मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सामान्य असते. अशा प्रकारे, बहिरेपणाचे निदान होईपर्यंत, मुल ३-४ वर्षेंचे होते जन्मजात श्रवणशक्ती कमी होण्याचा सर्वात मोठा परिणाम भाषा आणि उच्चारच्या विकासावर होतो, कारण मानवी मेंदूची भाषा आणि बोलने शिकण्याची प्रवृत्ती फक्त 6 वर्षांपर्यंत असते. याचा परिणाम जन्मजात बालकांच्या शिक्षणावर, व्यक्तिमत्वावर, संवाद आणि सामाजिक कौशल्यांवरही होतो.श्रवण उपचार न केल्याने बहुतेक वेळा याचा परिणाम शैक्षणिक यशावर होतो ज्यामुळे नंतरच्या आयुष्यात रोजगाराच्या संधी कमी होतात. ज्याचे मोठे भावनिक आणि मानसिक परिणाम होतात जसे की एकटेपणाची भावना,नैराश्य इ. अशाप्रकारे, लहान वयात वेळेत दखल न घेतल्याचा परिणाम केवळ दुर्बल जन्मलेल्या मुलावरच होत नाही तर त्याचा थेट परिणाम कुटुंबावर, समाजावर , राष्ट्रावर होतो.
डॉ. अक्षय वाचासुंदर, ईएनटी सर्जन म्हणाले- “सर्व बाळांची 1 महिन्यापेक्षा कमी वयाच्या श्रवणशक्तीची तपासणी केली पाहिजे. जन्मानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांची तपासणी केली गेली तर उत्तम. ज्यासाठी ओएई (OAE) चाचणी करून घेतली जाते. जर बाळाने ही श्रवण तपासणी उत्तीर्ण केली नाही, तर शक्य तितक्या लवकर पूर्ण श्रवण चाचणी घेणे खूप महत्वाचे आहे, परंतु 3 महिन्यांच्या नंतर नाही. विशिष्ट जोखीम असलेल्या नवजात मुलांसाठी हा सल्ला दिला जातो, उदा., ज्या नवजात बाळांवर ५ दिवसापेक्षा जास्त काळ अतिदक्षता विभागात उपचार केले गेले आहेत किंवा जे वेंटिलेटरवर होते, त्यांची त्वरित तपासणीसाठी करावी. कमी वयात श्रवणशक्ती कमी झाल्याचे आढळल्यास श्रवणयंत्र/कॉक्लियर इम्प्लांट आणि स्पीच थेरपीच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात ज्यामुळे श्रवण अक्षमतेवर मात करण्यात मदत होईल.”
जन्मजात श्रवण कमी असण्याची
सुरुवातीची चिन्हे कोणती आहेत? • बाळ मोठ्या आवाजाने घाबरत नाही • बाळ आवाजाकडे वळत नाही • १ वर्षाच्या
वयापर्यंत 'मामा', 'दादा' असे शब्द बोलता येत नाहीत. • बाळ त्याचे नाव घेतल्यावर आईला
प्रतिसाद देत नाही ,आई बाळाच्या श्रवण समस्येची दखल लवकर घेऊ शकते.
श्रवण कमी झाल्याचा संशय असल्यास काय करावे - • तुमच्या बालरोगतज्ञांना भेट द्या • इएनटी (E.N.T) सर्जनला भेट द्या • ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (BERA), ओटो अकौस्टिक एमिशन (OAE) यांसारख्या श्रवणविषयक चाचण्या करा.
जन्मजात श्रवणशक्ती कमी असल्यावर करावयाचे उपचार: - जन्मजात श्रवणशक्ती कमी असल्यावर करायाचे उपचार हे श्रवण किती कमी आहे याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात श्रवणयंत्रे मध्यम ते थोड्या गंभीर प्रकारांमधील श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांसाठी फायदेशीर आहेत. कॉक्लियर इम्प्लांट ही अलीकडील पद्धत आहे आणि ज्यामुळे कमी श्रवणशक्तीच्या उपचारात क्रांती घडून आली आहे. श्रवण यंत्रे फक्त आवाज वाढवतात तर कॉक्लियर इम्प्लांट्स ऐकण्याची खरी जाणीव देतात आणि कानाचा खराब झालेला भाग पार करून, तुम्हाला ऐकण्यासाठी सक्षम करण्यासाठी विद्युत उत्तेजनाचा वापर करतात. कॉक्लियर इम्प्लांट द्वारे लिप रिडींग न करताच बोलण्यास ऐकण्यास आणि समजण्यास मदत होते. श्रवण विषयक थेरपीसह कॉक्लियर इम्प्लांट मुलांच्या बोलण्याची स्पष्टता देखील सुधारतात.
कॉक्लिया पुणे फॉर हियरिंग एंड स्पीच सेंटर व मोरया हॉस्पिटलचे कार्य- आमच्या केंद्राचे वेगळेपण हे आहे की आम्ही आमच्या संस्थेमध्ये श्रवणदोष असणार्या मुलांचे उपचार आणि पुनर्वसन करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करतो. श्रवण अक्षमता कमी करण्यासाठी एकाच छताखाली काम करणे हे आमचे वैशिष्ट्य आहे. मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने, आमच्या केंद्राने १४० हून अधिक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मोरया हॉस्पिटल एडीआयपी (ADIP) आणि आरबीएसके ( RBSK) सारख्या विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत समाविष्ट केले गेले आहे जे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियांसाठी निधी प्रदान करण्यात मदत करते, अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया मोफत मिळणे सोपे होते. ज्याची किंमत साधारणतः रु. ७०००००/ आहे, जी गंभीर श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांसाठी फायदेशीर आहे.
0 comments:
Post a Comment