17/2/2022
पुणेः मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२२ (व्हर्चुअल) चे आयोजन केले आहे. दरवर्षी, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट भारत आणि परदेशात वैद्यकीय व्यावसायिक, संशोधक आणि पॅरा-मेडिको व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन करते. या परिषदेचा उद्देश मधुमेहावर मात करण्यासाठी अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्य सेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे हा आहे
४ मार्च ला प्रो. निल्स-गोरन लार्सन, (कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट येथील फिजिओलॉजी आणि मेडिसिनसाठी नोबेल पारितोषिक समितीचे अध्यक्ष, कॅरोलिंस्का युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, स्टॉकहोम, स्वीडन येथील वैद्यकीय आणि जैवरसायनशास्त्र आणि जैवभौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख), प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत तर ०६ मार्च रोजी मेयो क्लिनिक हेल्थ सिस्टीम यूएसएच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा वर्के, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
या परिषदेमध्ये रूग्णालयात रक्तातील साखरेचे नियंत्रण, मधुमेह व्यक्तींची काळजी, ग्लूकोजचे प्रमाण, डायबेटीस केअरमध्ये काही नवीन संशोधन, डायबेटीस हार्टफेल्युअर, इंसुलिनपंप, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, आठवड्यातून एकदा इंजेक्शन्स, डायबेटीस व्यवस्थापनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची भूमिका, मधुमेहाचे रिमोट मॉनिटरिंग, मधुमेह रुग्णांची काळजी घेणे या गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे.
यावेळी बोलताना चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे लाल एल. चेलाराम म्हणाले की, “चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट नेहमीच मधुमेह आणि त्यामुळे होणारे विविध विकार टाळण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे मधुमेह व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावरील उपचारांवर सकारात्मक प्रभाव पडेल.”
ते पुढे म्हणाले की, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे या वर्षी दोन नवीन उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत - चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट जे नाविन्यपूर्ण मधुमेह संशोधनासाठी निधी देईल आणि 'क्रॉनिकल ऑफ डायबेटिस रिसर्च अँड प्रॅक्टिस' नावाचे फ्लॅगशिप जर्नल जे ग्राउंडब्रेकिंग संशोधन समोर आणण्यावर लक्ष केंद्रित करेल.
चेलाराम डायबिटीज संस्थेचे सी.ई.ओ.डॉ. उन्नीकृष्णन एजी,म्हणाले की, “ इंटरनॅशनल डायबिटीज समिटला मिळालेला प्रचंड प्रतिसाद मधुमेह काळजी व्यवस्थापनासाठी व्यावहारिक उपायांची गरज अधोरेखित करतो.दरवर्षी, आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेतील सहभाग वाढत आहे. या परिषदेमध्ये भाग घेणारे डॉक्टर आणि संशोधक हे कोविडमध्ये डायबेटीसची काळजी कशी घ्यावी यावर आपला अनुभव सादर करणार आहेत. पॅंडेमिक डायबेटोलॉजी आणि टेलिहेल्थ यांसारखी सत्रे डॉक्टरांना डिजिटल आरोग्य सेवा प्रदान करण्यास सक्षम करून सकारात्मक बदल घडवून आणतील. टाइप १ आणि २ मधुमेहाच्या व्यवस्थापनावरील व्यावहारिक सत्रे हे सुनिश्चित करतात की या ज्ञानाचे आणि संशोधनाचे फायदे ज्यांना मधुमेह आहे त्यांना मदत होईल.”
यावेळी बोलताना चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.(ब्रि) अनिल पी पंडीत म्हणाले की, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट हे अत्याधुनिक सोई सुविधांबरोबर ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम, इन्सुलिन पंप, अॅक्सिडेंट इमर्जन्सी ,ऑर्थोपेडिक, न्युरोसर्जरी व नेत्ररोग यासह विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे. चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा पुरवत असल्यामुळे मधुमेह आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी हे अग्रगण्य इन्स्टिट्यूट आहे. सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन करण्याचा उद्देश मधुमेह तज्ञ मधुमेहामध्ये कशा प्रकारे काळजी घ्यावी तसेच मधुमेहाच्या धोरणाबद्दल समाजाला माहिती द्यावी असा आहे.
0 comments:
Post a Comment