24/2/2022
पुणेः
पुण्यात तब्ब्ल 2 लाख मतदारांनी भाग
घेतलेल्या एका ऑनलाईन स्पर्धेत आदर्श नगरसेविका म्हणून झालेली माझी निवड ही
प्रभागातील केलेल्या लोकोपयोगी कामांची पावती असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष
नगरसेविका मंजूश्री खर्डेकर म्हणाल्या. मी पाचही वर्षी बजेट तरतुदी करताना नागरिकांना
अपेक्षित असलेली कामे केली व त्यामुळेच नागरिकांनी मला भरभरून मतदान केले
असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका
प्रभागातील चार ही नगरसेवकांनी परस्पर समन्वयातून काम केले तर भागाचा विकास सुकर
होतो, असेही त्या म्हणाल्या. फर्ग्यूसन रस्ता व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित
सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी भाजप शहर सरचिटणीस दत्तात्रेय खाडे, नगरसेविक व शहर सरचिटणीस दीपक पोटे,नगरसेविका नीलिमाताई खाडे, ज्योत्स्नाताई एकबोटे, शिवाजीनगर मंडल भाजप अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, कोथरूड मंडल महिला आघाडी अध्यक्ष हर्षदाताई
फरांदे,फर्ग्यूसन रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष
शामराव मारणे, संदीप कुदळे, राजेंद्र गदिया, शंतनू पानसरे,युवा मोर्चा अध्यक्ष
अपूर्व खाडे,विजय आबनावे, तुषार पाटील, मयूर झवेरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
80 च्या दशकात फर्ग्यूसन महाविद्यालय आणि रानडे
इन्स्टिट्युट मध्ये शिकत असताना फर्ग्यूसन रस्त्यावरील आशीर्वाद हॉस्टेल मध्ये
वास्तव्यास होतो आणि फर्ग्यूसन च्या सायकल स्टॅन्ड वर पतित पावन संघटनेच्या बैठका
होत असत, त्यामुळे ह्या रस्त्याशी माझं नातं 40 वर्षे जुनं असून माझी कारकीर्द येथेच फुलली असे
भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले.
या
परिसरातील नागरिक व दुकानदार सातत्याने माझ्या संपर्कात असून त्यांनी याची जाणीव
ठेऊन मंजुश्री यांचा सत्कार केला याबद्दल मी सर्वांचा ऋणी असून मी आपल्या मदतीसाठी
कायम उपलब्ध असल्याचे ही खर्डेकर म्हणाले. खर्डेकर कुटुंबियांशी आमचे अत्यन्त जुने
स्नेहबंध असून हा पूर्णतः घरगुती कार्यक्रम असून यात कोणतेही राजकारण नसल्याचे
संयोजक शामराव मारणे यांनी सांगितले. आमच्या कोणत्याही समस्येच्या सोडवणूकसाठी
खर्डेकर धावून येतात म्हणून मंजुश्री ताईंचा आदर्श नगरसेविका म्हणून निवड
झाल्याबद्दल सत्कार करण्याचे ठरविले असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक
नगरसेवक नीलिमाताई खाडे, ज्योत्स्नाताई
एकबोटे व भाजप सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे यांनी आमच्या समस्या सोडविण्यासाठी कायम
प्रयत्न केले व ते अर्ध्या रात्री सुद्धा आमच्यासाठी उपलब्ध राहिले याबद्दल
त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार करत असल्याचे संदीप
कुदळे म्हणाले. नीलिमाताई खाडे व ज्योत्स्नाताई एकबोटे यांनी देखील यावेळी
उपस्थितांना संबोधित केले. आम्ही सर्व नगरसेवकांनी गुण्यागोविंदाने प्रभागातील
कामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले तसेच सहकारी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर
यांची आदर्श नगरसेविका म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचा सन्मान
केला. शाम मारणे यांनी स्वागत तर संदीप कुदळे यांनी सूत्रसंचालन केले.
0 comments:
Post a Comment