पुणेः पुण्यात अकोही (ACOHI) एशियाच्या
मुख्य कार्यालयातुन भारताच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अल्कलाइन मूवमेंटची
सुरवात केली आहे. मानवी शरीरात 70% पाणी असते आणि म्हणूनच पाणी हा घटक सर्वात आवश्यक बनतो, तरीही या महत्वाच्या घटकाकडे पाहण्याचा दुष्टीकोण आजही मोठ्या प्रमाणात
दुर्लक्षितच आहे.
अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल यांनी पुण्यातील अकोही एशियाच्या मुख्य
सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. ते म्हणाले की, “या नव्या सुरुवातीमुळे हा उद्योग त्या सर्व उत्पादकांना आणि पुरवठादारांना
संधी देईल जे अल्कालाईन वॉटर व्यवसाय करतात. या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत जे अनेक
रोग व आजार बरे करतील असे संशोधकांचे म्हणणे आहे. ज्यामुळे या व्यवसायात मोठी
क्रांती घडेल. याच्या वापरावर भाष्य करताना आम्ही हे सांगू इच्छितो की या पाण्याचे
गुणधर्म पाहता मोठ्या आणि लहान स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट्सपासुन
ते केटरिंग उद्योगापर्यंत प्रत्येकाने हे पाणी वापरावे. त्यांच्या ग्राहकांच्या
फायद्यासाठी हे खात्रीशीर आहे. कोरोना नंतरच्या काळत स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषण याला जास्त महत्व दिले जात आहे जी भविष्याची मोठी गरज
आहे.”
व्हीआरएच एक्वा चे
अध्यक्ष निर्मल हिंदुजा म्हणतात की, “व्हीआरएच एक्वा ही भारतातील पहिली कंपनी आहे
जिला त्यांच्या व्यवसाय प्रक्रियेच्या पडताळणीनंतर अकोही तर्फे विशेष सन्मानित व
पुरस्कृत कलीनरी आईडी देण्यात आला आहे, २०२२ च्या बीओजी पडताळणीनंतर
त्यांना राष्ट्रीय स्तरावर अकोही चेंबरमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहे. ते
अल्कालाईन मशिन्सच्या विक्रीच्या दृष्टीने उद्योगांना सेवा देतात, सर्व्हिसिंग करतात आणि संपूर्ण भारतातील हॉस्पिटैलिटी उद्योगासाठी वार्षिक
मेंटेनेन्स करार करू शकतात व याची खात्री देतात. त्यांच्याकडे एनाजिक ब्रँडच्या
मशीन्सची विस्तृत श्रेणी आहे जी आरोग्यदायी पाणी तयार करते, ज्यांना कँगन वॉटर म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. अकोही चेम्बरच्या कलीनरी
आयडी आणि नॅशनल लिस्टमध्ये स्थान मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्ही उद्योग मानक आणि
अपेक्षांनुसार कामगिरी करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू.”
कलीनरी आयडी आणि
लिस्टींग प्रक्रिया म्हणजे काय?
कलीनरी आयडी ही केवळ
हॉस्पिटैलिटी क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या, सर्विस
कंपन्या, उच्च श्रेणी मानव संसाधन, तारांकित
होटल्स, होटल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारे, तज्ञ लोकांना
व इतर विशिष्ट दर्जाच्या लोकांना दिला जातो ज्यामध्ये फक्त एका वर्षासाठी कागदपत्रे
आणि प्रक्रियांची तरतुद असते. ज्यातून ब्रँडला व इतरांना जावे लागते. पेपर पडताळणी
व कागदपत्री पूर्तता केल्यावर कलीनरी आयडी प्रदान केला जातो, जो शहर, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असतो. याला
हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कोणत्याही ब्रँडसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते व
त्याला हा आयडी दिला जातो. दर वर्षी ब्रांड किंवा उत्पादन कंपनी व इतरांना आपली क़्वालिटी प्रोसेस अकोही समोर ठेवून
व सिद्ध करून ती मानकानुसार असल्यावरच त्यांना पुढील वर्षी लिस्टिंगची परवानगी
मिळते..
कलीनरी आयडी लिस्टींग
(२०२२) ही संपूर्ण एशियातील एक विशेष प्रक्रिया आहे ज्यात व्यक्ती, ब्रँड किंवा कंपनीची सखोल व संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते आणि दर वर्षी
वैशिष्ट्यांची पडताळणी केली जाते. यापूर्वी ही पद्धत्ती उपलब्ध नसल्यामुळे
किंवा जास्त संशोधन, माहिती, पार्श्वभूमी नसल्याने अनेकदा चुकीचे
विक्रेते, लोक आणि उत्पादने हॉस्पिटैलिटी उद्योगाला सेवा देत होते, ज्यामुळे पूर्वी इंडस्ट्रीमधे अनेक नकारात्मक परिणाम
दिसून आले व अनेक फसवणूक झाल्या. परिणामी हॉस्पिटैलिटी ग्राहकांना याचा त्रास सहन
करवा लागला. कलीनरी आयडी आणि लिस्टींग प्रोसेस उद्योगाचा कणा मजबूत करेल आणि या
आंतरराष्ट्रीय प्रक्रियेद्वारे सर्वात आवश्यक उत्पादने आणि विक्रेत्यांना महत्व, दर्जा व ओळख मिळेल. ही प्रक्रिया भारतात व एशियातील हॉस्पिटैलिटी
उद्योगांसाठी आवश्यक सुरक्षितता, व्यापकता आणि गुणवत्तेसाठी बेंचमार्क बनली
आहे. भारत आणि
एशियातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला यामुळे चांगले अल्कलाइन पानी मिळेल
ज्याची नितांत आवश्यकता आहे व त्याची सुरुआत हया
कार्यक्रमानेच झाली ह्यासाठी देशातील अग्रगण्य व मानलेला केटरिंग ब्रान्ड GAC - ग्राण्ड अफेयर केटरिंग यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण जेवण अल्कलाइन ( ११.५ व ९.५ अश्या विशेष अल्कलाइन असलेल्या ) पाण्यात बनवले
व त्यासाठी GAC चे चेयरमैन योगेश
तुरवनकर यांना ही संधी मिळाल्याबद्दल अकोही बोर्ड़ ऑफ गवर्नेन्स चे त्यांनी विशेष
आभार मानले. ह्याच बरोबर GAC ही देशातील व एशियातील पाहिली केटरिंग कंपनी बनली जिने संपूर्ण व्यवस्था
अल्कलाइन पाण्यात केली आहे.
भारतातील हॉस्पिटॅलिटी
इंडस्ट्रीमध्ये तुमचे मूल्यवान उत्पादन सूचीबद्ध ( Listing ) करण्यासाठी व हॉस्पिटैलिटी क्षेत्रात आपले उत्पादन, सर्विसेज तथा आपल्या उत्पादना ची दर्जा व
त्याचे मार्केट वैल्यू व ब्राण्ड पोजीशन करण्यासाठी कृपया secretariat.asia@acohi.org वर तपशील पाठवा व www.acohi.org वर आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या.
0 comments:
Post a Comment