Wednesday, February 16, 2022

शिवजयंतीनिमित्त दि. १९ रोजी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पुणे : कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत सालाबाद प्रमाणे निघणारी मिरवणूक रद्द करुन शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंतीला शनिवारदि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.

स्वराज्यघराण्यांच्या हस्ते मिरवणुकीच्या ऐवजी प्रथेपरंपरे प्रमाणे शनिवारी सकाळी ९ वाजता लालमहाल येथील लालमहालातील जिजाऊ मॅांसाहेब व शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार घालुनजिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलित करुन लालमहाल ते एसएसपीएमएस संस्थेच्या प्रागंणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकापर्यंत वाटचाल करित शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेअशी माहिती समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.  

सोहळ्याचे यंदा १० वे वर्ष आहे. शिवकालीन ऐतिहासिक स्वराज्यघराणीसरसेनापतीसरदारसुभेदारवीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल १०० स्वराज्यरथांचा सहभाग असणारा हा विश्वातील एकमेव “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” आहे. परंतु शासनाने दिलेल्या निर्देशाचा सन्मान राखत यावेळेस मिरवणूक न काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. 

सोहळ्याचे आयोजन समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पायगुडेरवींद्र कंकसंजुभाऊ पासलकरदीपक घुलेनीलेश जेधेशंकर कडूसमीर जाधवरावकिरण देसाईगोपी पवारप्रवीणभैय्या गायकवाडमयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे.

 


0 comments:

Post a Comment