Saturday, January 8, 2022

महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरला ब्राँझपदक

८-१-२०२२ 

पुणे: महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकर हिने ३९ व्या वरिष्ठ आणि २३ वी खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत दोन हजार मीटर शर्यतीत महिलांच्या सिंगल स्कल्समध्ये ब्राँझपदक मिळवले.

रोइंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने आणि आर्मी रोइंग नोड व महाराष्ट्र रोइंग असोसिशनच्या सहयोगाने आर्मी रोइंग नोड येथे ही स्पर्धा सुरू आहे. राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. स्पर्धेचे संयोजन महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर , सचिव संजय वळवी, उपाध्यक्ष नरेन कोठारी, स्मिता यादव यांनी केले. 

या स्पर्धेतील महिलांच्या सिंगल स्कल्समध्ये मध्य प्रदेशच्या खुसप्रीत कौरने ९ मिनिटे ३७.४ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. उत्तर प्रदेशची किरण देवीने ९ मिनिटे ४४.८ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले.  मृण्मयीने ९ मिनिटे ५३.४ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदकाची कमाई केली.

निकाल महिला सिंगल स्कल्स – खुसप्रीत कौर (९ मि. ३७.४ से., मध्य प्रदेश), किरण देवी (९ मि. ४४.८ से., उत्तर प्रदेश), मृण्मयी साळगावकर (९ मि. ५३.४ से., महाराष्ट्र).

डबल स्कल्स – अविनाश कौर किरण (८ मि. २८.० से., हरियाणा), प्रिया देवी एच. तेनदेनथोइ देवी (८ मि. ३९.६ से., मणिपूर), रेष्माकुमारी मिन्झ सोनालिका दास (८ मि. ५४.८ से.)

कॉक्सलेस पेअर – सोनाली स्वैन रितू कुडी (८ मि. ४३.२ से., ओडिसा, ज्योती कुश्वाहा रुक्मणी डांगी (९ मि. ०३.६ से., मध्य प्रदेश), ए. बिमोला चानू वाय. नांदेश्वरी देवी (९ मि. २५.९ से., मणिपूर).

कॉक्सलेस फोर – अर्चा ए., वर्षा के. बी, रोस मारिया, मीनाक्षी वाय. एस. (केरळ, ८ मि. ०३.५ से.), अस्मिता करकेट्टा, झारना हस्ती, दीपिका, मंजुला (ओडिसा, ८ मि.०३.९ से.), तमिल सेल्वी एस., रोस मास्टिका मेरिल, लावण्या नाम्बियार, बागवती आर. (तमिळनाडू, ८ मि. ०४.३ से.)

0 comments:

Post a Comment