Saturday, January 22, 2022

‘पांघरूण'मधील साहवेना अनुराग गाणे प्रदर्शित

23/1/2022

पुणेः काकस्पर्शनटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेल्या 'पांघरूणया चित्रपटातील  'अनोखी गाठआणि 'इलुसा हा देहही दोन सुरेल गाणी यापूर्वी प्रदर्शित झाली आहेत.

या श्रवणीय गाण्यांना संगीतरसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील 'साहवेना अनुरागहे मंत्रमुग्ध करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला केतकी माटेगावकर हिचा सुमधुर आवाज लाभला असून या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत तर हितेश मोडक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे आणि त्यातून नेहमीच एक अनोखा कलाविष्कार चित्रपटप्रेमींसाठी सादर होतो. अशीच सुंदर कलाकृती 'पांघरूण'च्या निमित्ताने पाहायला मिळणारा आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळकोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी अनोखी प्रेमकहाणी आपल्याला 'पांघरूणमध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटातील 'साहवेना अनुरागया गाण्याचे बोल थेट काळजाला भिडणारे आहेत. कला आणि प्रतिभेतून आलेला आवेश या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे. नायिकेच्या मनातील भावनाघालमेल न बोलताही देहबोलीतून व्यक्त होत आहेत. हा सांगितिक खजिना प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

अनेक राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अमोल बावडेकरगौरी इंगवलेरोहित फाळकेविद्याधर जोशीसुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमधुर संगीतभावनिक कथानक यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

0 comments:

Post a Comment