Representational picture |
25/1/2022
पुणे: खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी धनकवडी येथील एका जमिनी बाबत खोटे आरोप करत, धमकावत जागा बळकावण्याचा प्रयत्न केला तसेच याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आणि राज्याच्या विधानसभेची दिशाभूल करत खोटे प्रश्न उपस्थित केल्याचा खळबळजनक आरोप सचिन तावरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
याविषयी बोलताना सचिन तावरे म्हणाले की, विधानसभा सदनाची दिशाभूल करून माझ्या व सिकंदरसिंग ईश्वरसिंग दुधानी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या उद्देशाने विधानसभेत प्रश्न उपस्थित केले आहेत. धनकवडी, पुणे येथे जमीन मिळकत स. नंबर ३७/७ व ३७/१४ मध्ये एकूण २५.३ ९ आर इतकी मिळकत तिच्या पूर्वीच्या मालकाकडून कायदेशीररीत्या दि . १५/०७/२०१७ रोजी नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र .४५३० / २०१७ व ४५३३/२०१७ नुसार खरेदी घेतलेली आहे. खरेदी घेण्यापूर्वी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेली होती तसेच वकिलांकडून शोध अहवाल घेतल्यानंतर सदरी मिळकत खरेदी घेतलेली होती. त्यानुसार सदर मिळकतीचा ७/१२ उताऱ्यास तावरे व दुधानी यांच्या नावाची नोंद झालेली आहे.
सदरची मिळकत ही आमदार भीमराव तापकीर यांचे घरापासून साधारण ५०० मीटरच्या आसपास आहे. सदरची मिळकत ही भीमराव तापकीर यांना त्यांचे घरासाठी हवी होते, असे आम्हाला नुकतेच कळालेलं आहे. परंतु सदरची मिळकत ही मूळ मालकांकडून आम्ही खरेदी घेतल्याने त्याचा द्वेष त्यांचे मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने आम्हाला जाणूनबुजून त्रास देऊन आमची मिळकत बेकायदेशीररीत्या मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे आम्हाला जाणवले आहे.
सदर मिळकतीला असलेले आमचे तारेचे कंपाउंड तोडून टाकलेमुळे व तसेच आम्हाला सदर मिळकतीला पत्र्याचे कंपाउंड करण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळा करून खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी देत असल्यामुळे आम्ही दि . २६/०६/२०२१ रोजी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर यांच्याकडे भीमराव धोंडिबा तापकीर व पूर्ती सहकारी गृहरचना संस्था यांचेविरुद्ध रीतसर तक्रारी अर्ज दाखल केलेला होता.
दरम्यान सदर भीमराव तापकीर आमच्या मिळकतीवर
बेकायदेशीररित्या कब्जा करणार असल्याचे आम्हाला कळाल्याने आम्ही दि . ११/०७/२०२१
रोजी आमच्या मिळकतीचे संरक्षण करणेकामी पत्र्याचे कंपाउंड केले . त्यावेळेस सदर
कंपाउंडचे काम करत असताना आमदार भीमराव तापकीर यांचे चिरंजीव रोहन भीमराव तापकीर
यांनी आमचे काम थांबविण्याचा प्रयत्न करून आमच्याच विरुद्ध खोटी पोलीस तक्रार दाखल
केलेली होती. तदनंतर आमदार भीमराव तापकीर, त्यांचा मुलगा रोहन तापकीर व पूर्ती
सहकारी गृहरचना संस्था हे आमच्या मिळकतीमधील ताबे वहिवाटीस अडथळा निर्माण करत
असल्याने आम्ही पुणे येथील दिवाणी न्यायालययात रे.मू.न .१२४२ / २०२१ असा दावा दाखल
केलेला आहे.
सदर दाव्यामध्ये दि . १०/०८/२०२१ रोजी मा.न्यायालयाने सदर मिळकतीवरील आमच्या ताब्या संदर्भातील फोटोग्राफ्स , कागदपत्रे याची पाहणी करून जागेवर ' जैसे थे ' परिस्थिती ठेवण्याबाबतचा आदेश आमदार भीमराव तापकीर, रोहन तापकीर व पूर्ती सहकारी गृहरचना संस्था यांच्याविरुद्ध कोर्टाने पारित केलेला होता. सदरचा कोर्टाचा आदेश हा आजतागायत अस्तित्वात आहे.
0 comments:
Post a Comment