Saturday, January 22, 2022

एव्हरेस्ट मोहीमः राज्यातील पहिले इंग्रजी पुस्तक प्रकाशित

23/1/2022 

पुणे: उमेश झिरपे लिखितविवेक शिवदे अनुवादित एव्हरेस्ट’ या एव्हरेस्ट शिखरावरील भारतातील सर्वात मोठ्या नागरी मोहिमेची गोष्ट सांगणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन नुकतेच झाले. एव्हरेस्ट: गोष्ट एका ध्यासाची’ या मराठी पुस्तकाच्या यशस्वीततेनंतर समकालीन प्रकाशन प्रकाशितउमेश झिरपे लिखित व विवेक शिवदे अनुवादित एव्हरेस्ट’ या इंग्रजी आवृत्तीचे पुण्यात प्रकाशन करण्यात आले. इंडो शॉटल ऑटो पार्टस प्रा. ली. चे कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र रावव प्रसिद्ध पत्रकार व लेखक सुनंदन लेले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गिरिप्रेमी संस्थेचे संस्थापक आनंद पाळंदेगिरिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष जयंत तुळपुळे व समकालीन प्रकाशनचे आनंद अवधानी व यावेळी उपस्थित होते.

भारतीय गिर्यारोहण क्षेत्राला नवी आयाम देणारीभारतातून एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी झालेली सर्वात मोठी नागरी मोहीम असलेल्या गिरिप्रेमीच्या पुणे- एव्हरेस्ट २०१२’ मोहिमेची गोष्ट सांगणारे एव्हरेस्ट: गोष्ट एका ध्यासाची’ हे मराठी पुस्तक २०१४ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. एव्हरेस्ट विषयावरील हे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव इंग्रजी पुस्तक आहे. या इंग्रजी आवृत्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत घडलेली एव्हरेस्टची गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात मदत होणार आहे. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामचंद्र राव आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, “हे पुस्तक फक्त एव्हरेस्टची गोष्ट सांगणारे पुस्तक नाहीतर काटेकोर नियोजन व अंमलबजावणीउत्कृष्ट सांघिक कामगिरी व तेवढेच कुशल नेतृत्व या गुणांना स्पष्ट करणारी मार्गदर्शक पुस्तिका आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मी या आधी मराठी पूस्तक वाचले आहे. मराठी पुस्तकातील सर्व बारकावेमूळ गोष्टीचा गाथा हा जशास तसा इंग्रजी पुस्तकात आला आहे. यातून अनुवादक विवेकने घेतलेले कष्ट दिसून येतात. एक गिर्यारोहक म्हणून त्याने अगदी मनातून हा अनुवादक केला आहे. इतके सहजसोपे व खिळवून ठेवणारे लिहिणे अतिशय कठीण काम आहे. विवेकने हे काम अतिशय उत्तमपणे केले आहेम्हणून त्याचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते.

सुनंदन लेले यांनी एव्हरेस्ट पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होत आहेयाविषयी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “आता महाराष्ट्राच्या गिर्यारोहकांची एव्हरेस्ट स्टोरी जगभर नेण्यासाठी हे पुस्तक उत्तम माध्यम ठरेल. या पुस्तकात सगळं आहेमोहीम उभा करण्याचा प्रवास तुमच्या डोळ्याच्या कडांना ओलं करेल तर प्रत्यक्ष मोहिमेचा थरार तुम्हाला प्रोत्साहित करेल. हे पुस्तक जगभर घेऊन जाण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल”  समकालीन प्रकाशनचे आनंद अवधानी म्हणाले, “एव्हरेस्ट या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे सीमोल्लंघन आहे. मराठीत प्रकाशित झालेले पुस्तक आता इंग्रजी भाषेतून प्रकाशित होऊन आपल्या सीमा ओलांड़ून जगभर जाईल. हे पुस्तक म्हणजे अशक्यातून शक्य म्हणजे काय हे सांगणारा रोमांचकारी प्रवास आहे. प्रकाशक म्हणून अशा पुस्तकांवर काम करताना आनंदसमाधान व प्रोत्साहन मिळते. या पुस्तकाच्या माध्यमातून
आम्ही देखील एव्हरेस्ट अनुभवू शकलो याचे समाधान आहे.
” 

लेखक झिरपे म्हणाले, “एव्हरेस्टची मोहीम माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याची आहे. निधी उभारणी पासून ते शिखर चढण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास रोमहर्षक व भावनात्मक होता. इतके दिवस एव्हरेस्टची गोष्ट मराठीतून वाचकांपर्यंत

 पोहोचत होतीचआता इंग्रजी पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही अधिकाधिक व जगभरातील विविध लोकांपर्यंत पोहचू शकूयाचा अतीव आनंद आहे.” अनुवादक शिवदे म्हणाले, “एव्हरेस्ट मराठी पुस्तकामुळेया मोहिमेमुळेच मी गिर्यारोहक झालो. ज्या पुस्तकाने मला गिर्यारोहक होण्यास अधिक प्रोत्साहित केलेत्याच पुस्तकाचा अनुवाद करायला मिळणेहा आनंद शब्दातीत आहे. मूळ पुस्तकाचा आशयगाभा आणि भावना आहे तशाच स्वरूपात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. इंग्रजी वाचकांना हे पुस्तक नक्की आवडेलअसा मला विश्वास आहे.” 

कोव्हीड-१९ संक्रमणासंदर्भात शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून छोटेखानी स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून अनेकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



0 comments:

Post a Comment