पुणेः पुण्याच्या सुप्रसिद्ध येवले अमृततुल्याने २०१७ मध्ये व्यवसायात पाऊल टाकले, ज्यात संपूर्ण येवले कुटुंबाचा सहभाग होता. आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांतील आपल्या ३०० फ्रँचायझींसह त्यांनी प्रचंड यश आणि नावलौकिक मिळवले आहे. त्यांनी केवळ ३ वर्षांच्या काळात ही गरूडझेप घेतली आहे.
पुण्याच्या पुरंधर तालुक्यातील येवले कुटुंबीयांनी भरपूर संशोधन करून विकास आणि गुणवत्तेच्या कसोटीवर खरे उतरून एक योग्य आणि दर्जेदार चहाचे मिश्रण बनविले. एका फायदेशीर व्यवसायाद्वारे भारतातील लोकांना उत्कृष्ट चहाची सेवा देऊन ते आज अत्यंत समाधानी आहेत. आपल्या पत्रकार परिषदेत येवले ग्रुपने नवीन कॉर्पोरेट आयडेंटीटीची घोषणा केली आणि आपला नवीन लोगो आणि ओळखीचे अनावरण केले. याचसोबत त्यांनी आपल्या नवीन उत्पादनांसह भारतातील सामान्य माणसांसाठी दर्जेदार चहाची पेशकश केली. आपल्या या घोषणेच्या शुभारंभावेळी नवनाथ येवले, संस्थापक, एमडी येवले ग्रुप, यांच्यासह गणेश येवले, नीलेश येवले, मंगेश येवले आणि तेजस येवले, संचालक, येवले ग्रुप आदी उपस्थित होते.
समान मूल्य आणि चव जोपासणाऱ्या त्यांच्या उत्पादनांमध्ये स्पॉन्जी केक, बाकरवडी इकॉनॉमी आणि फॅमिली पॅक, क्रंची जेगेरी ओट्स, कुकीज यांचा समावेश आहे. मूड कोणताही असो, तुम्ही भारतातील कोणत्याही येवले अमृततुल्य आउटलेटवर या हिवाळ्यात एक कप गरम चहाचा आनंद घेऊ शकता. येवले ग्रुप ऑफ कंपनीला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की त्यांच्या भारतभर पसरलेल्या त्यांच्या सर्व आउटलेट द्वारे त्यांनी आजतगायत ५००० हून अधिक लोकांना व्यवसायाच्या संधी आणि रोजगार निर्माण करून दिला आहे. लोकल महाराष्ट्रीयन ग्रुप या नात्याने ते भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि कल्याणासाठी अल्प प्रमाणात का होईना, योगदान देत आहोत आणि दिवसेंदिवस घोडदौड करत आहोत, याचा त्यांना खूप आनंद होत आहे. "समृद्ध, समाधानी, बेरोजगारीमुक्त जग निर्माण करणे या दृष्टिकोनास ही कंपनी समर्थन देते.
चहाप्रेमींना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी त्यांच्या चहा व्यवसायात कॉर्पोरेट मूल्ये जोपासणारी आऊटलेट्स आहेत, जी सुपर हायजिनिक, स्वच्छ, प्रशिक्षित कर्मचार्यांनी युक्त आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना येवले ग्रुपचे संस्थापक आणि एमडी नवनाथ येवले म्हणाले, “मार्केटमध्ये नवीन कॉर्पोरेट ओळख आणि उत्पादने सादर करण्याचा विचार काही काळापासून आमच्या मनात होता. आम्ही आमच्या ब्रँडला जागतिक ओळख म्हणून स्थान देत आहोत आणि आम्ही विस्ताराच्या मार्गावर आहोत. लवकरच दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये जाण्याचा आमचा विचार आहे. दर्जेदार खाद्यपदार्थ आणि सेवांच्या क्षेत्रात जागतिक सर्वाधिक मान्यताप्राप्त ब्रँड बनणे हे आमचे ध्येय आहे आणि तरुण मेहनती व्यक्तींमधून उद्योजक तयार करणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी इतरांसाठी रोजगार निर्माण करणे हे देखील आमचे ध्येय आहे.”
नवीन उत्पादने बाजारात आणणे ही एक उद्योगातील एक सहाजीक बाब आहे कारण ही उत्पादने आमच्या चहा या उत्पादनाशी चांगली जुळतात. आमच्या ग्राहकांनी आमच्या सेवेचा आनंद घ्यावा आणि आणि चहा आणि स्नॅकसाठी एक वनस्टॉप शॉप बनावे, अशी आमची इच्छा आहे.” चहा तयार करणे ही देखील एक मोठी पाककला आहे आणि आम्ही आमच्या कारखान्यात आमचा अमृततुल्य मसाला तयार करण्यासाठी तितकेच प्रयत्न करतो, जेवढे एक एक्सपर्ट शेफ त्याची सिग्नेचर डिश तयार करण्यासाठी करतो. संपूर्ण कुटुंब या व्यवसायात गुंतलेले असल्याने, सर्वांवरच मोठ्या जबाबदार्या आहेत आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना दिल्या जाणार्या प्रत्येक कप चहाचा दर्जा आणि ताजेपणा टिकवून ठेवतो. आमचा सामाजिक दायित्वावर विश्वास आहे आणि आमच्याकडे एक विभाग आहे जो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) ची काळजी घेतो. ज्यावर आमच्या संचालकांचे बारकाईने लक्ष आहे. याद्वारे आम्ही तरुण आणि उद्योजकांना व्यावसायिक सल्लामसलत, व्यवसाय आणि वाढीची धोरणे तयार करण्यात मदत करतो आणि आरोग्य उद्योगातही योगदान देतो.
0 comments:
Post a Comment