Saturday, January 8, 2022

एमआयटी युनिव्हर्सिटीला एकाचवेळी मिळाली १९ पेटंट्स

८-१-२०२२

पुणेः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अभियांत्रिकीच्या विविध शाखेतील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन पेटंट ऑफिसकडून एकाचवेळी १९ पेटंट मिळाले आहेत. कदाचित हे भारतात पहिल्यांदाच एका विद्यापीठातील अभियांत्रिकी संशोधकांना मिळालेला बहुमान आहे. यात सिव्हील इंजिनियरींगला ३, मेकॅनिकल इंजिनियरिंगला ५, संगणकीय विभागाला ५, इलेक्ट्रॉनिक्स विभागाला ५ आणि मनुष्यबळ विभागाला १ असे एकूण १९ पेटेंट मिळाले आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डब्ल्यूपीयूचे प्रकुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. भरत चौधरी, प्रा.डॉ. अनिल हिवाळे आणि मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणेश काकांडीकर हे उपस्थित होते.

डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले,“विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नवनिर्मितीस चालना मिळावी, यासाठी आमचे विद्यापीठ वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात. कोणतेही संशोधन हे समाजोपयोगी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये समाजातील समस्या जाणून घेऊन ती सोडविणे व त्यावरील समाधान शोधणे हा महत्वाचा मुद्दा असतो. देशातील अन्य विद्यापीठे व शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापकांना या प्रकारचे स्वामित्व हक्क घेण्यासाठी आमच्या विद्यापीठातर्फे मार्गदर्शन करण्यात येईल.

डॉ. प्रसाद खांडेकर यांनी सांगितले की सिव्हील इंजिनिअरिंगला तीन पेटंट मिळाले आहेत.  त्यात प्रा. सुमंत शिंदे, प्रा. मृदुला कुलकर्णी आणि प्रा. प्रकाश माईनकर यांचे  ए थर्मल कंडक्टिव्हिटी मीटर फॉर डिटरमायनिंग थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ सिव्हील इंजिनियरिंग स्ट्रक्चरर्स’, प्रा. गणेश इंगळे व प्रा. सुधीर पाटील यांचे ए मोल्ड फॉर रिपेअरींग अ‍ॅडिटिव्हज फॉर स्टॅबिलायझेशन ऑफ सॉइल अ‍ॅण्ड अ‍ॅडिटिव्हज प्रिपेअर्ड देअर फ्रॉम’, प्रा. महेश सोनवणे यांचेएडिम क्लाइमेंट झोन ऑफ इंडियाः अ‍ॅसेसमेंन्ट ऑफ डे लाईट इल्यूमिशन्स इंन्टेनसिटीज अ‍ॅण्ड इस्टीमेशन फॉर मॉडोरेट क्लाइमेंट झोन ऑफ इंडियाआणि ए मेथेंड फॉर अ‍ॅसेसिंग क्लाइमेंट बेस्ड ऑन इल्यूमन्स लेव्हल ऑफ द प्लेसचा समावेश आहे.

मेकॅनिकल इंजिनियरिंगला एकूण ५ पेटंट मिळाल आहेत. त्यात प्रा. अनिता नेने व विद्यार्थी नभरून भट्टाचार्य, गौरव शेठी, विनित ओस्वाल यांनी कन्डक्टींग लिक्वीड व्होरटेक्स डिसी मोटर’. तसेच प्रा. अनिता नेने यांचे ए थर्मल सोलार एनर्जी कॉन्सट्रेटर सिस्टीम’, प्रा.डॉ.गणेश काकांडीकर, प्रा. अनिल माशाळकर व प्रा. ओंकार कुलकर्णी यांचे ए मायक्रो फॉरमिंग डिव्हाईसआणि याच ग्रूपचे विद्यार्थी अभिषेक जाधव सोबत फेक्झिबल डिप ड्राईंग अ‍ॅरेंजमेंन्टहे दोन पेटंट मिळालेले आहेत. प्रा. अमित जोमदे आणि प्रा. प्रशांत पटणे यांचे  ए व्हेरियबल फ्लो रेडियटर फॉर व्हेइकलचा समावेश आहे.

संगणकीय विभागाला ५ पेटेंट मिळाले आहेत. त्यात प्रा. बालासो जगदाळे, प्रा. शौनक सुगावे व प्रा. योगेश कुलकर्णी यांचे फेक न्यूज स्कॅनर सिस्टीम एम्बडेड इंन स्मार्ट वॉट आर्कीटेक्टचर’, प्रा.प्राची सरोदे यांचे मल्टीव्हेरिएट क्वेरी रिस्पॉन्स मेथेड फॉर डाट अ‍ॅग्रर्र्ीगेशन इंन वायरलेस सेंसर नेटवर्क’, प्रा. अनिकेत इंगवले आणि प्रा. विठ्ठल गुट्टे यांचे हर गांव में बिजलीः अ सिस्टीम अ‍ॅण्ड मेथड फॉर मॉनेटरिंग कम्यूनिकेटींग अ‍ॅण्ड अलर्टिंग पॉवर फ्येल्यूअर अ‍ॅण्ड थेप्ट’, प्रा. ललीत कुलकर्णी, प्रा. बालासो जगदाळे व प्रा. सुमेधा सिरसीकर यांचे अ सिस्टीम एम्लॉइज अ‍ॅन ओपॉरच्यूनिस्टीक नेटवर्क फॉर डिसिमिनेटींग इर्मजन्सी इन्फॉरमेशन इन व्हेइक्यूलर नेटवर्कव प्रा. डॉ. मिलिंद पांडे, प्रा. मंगेश बेडेकर, प्रा. विशाल पवार यांचे अ झोन स्पेसिफीक वेदर मॉनिटरींग सिस्टीमचा समावेश आहे.

इलेक्ट्रॉनिक्स विभागाला ५ पेटंट मिळाले आहेत. त्यात प्रा. आरती खापर्डे यांचे हायर ऑर्डर डिझाइन ऑफ डिजिटल सिआयएफबी सिग्मा डेल्टा मॉड्यूलेटर’, प्रा.डॉ.प्रसाद खांडेकर यांना दोन पेटंट मिळाले आहेत. त्यात अ बॉऊड्री सर्कीट फॉर इंटरफेसिंग अ‍ॅन अ‍ॅडियाबेटीक सर्कीट विथ अ सिमॉस सर्कीटआणि एफपीजीए कस्टम ओव्हरले फॉर कॉम्प्यूट इंन्टेनसिव्ह  ब्लॉक्स ऑफ जेपीईजी कम्प्रेशन’, प्रा. भावना टिपले व प्रा. मधुरा फाटक यांचे मेथेड फॉर प्रोव्हाइडिंग इन्फॉमेशन असोसिएट विथ प्रॉक्सिमल सराउंडिंग टू ए व्हिज्यूअली इम्पेरअर्ड इन्डज्यूव्ह’, प्रा. सुमेध सिरसीकर, प्रा. अभिषेक चुनावाले, प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर, प्रा. ललीत कुलकर्णी व प्रा. बालासो जगदाळे यांचे ए ब्रेन सिग्नल कंट्रोल्ड इंटेलिजेंट व्हिल चेअर विथ ऑगमेंटेड रियालिटीआणि मनुष्यबळ अभियांत्रिकी तून प्रा. स्वप्ना साओजी आणि प्रा.डॉ.मिलिंद पांडे यांचे ए सिस्टीम फॉर मॅनेजिंग अ‍ॅण्ड ऑटोमॅटिक अ‍ॅक्टिव्हिटीज परटेनिंग टू ह्यमून रिसोर्स मॅनेजमेंटचा समावेश आहे.

प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना अधिक वाव देण्यासाठी हॅक एमआयटी डब्ल्यूपीयूः२०२२या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यातून समोर येणार्‍या नवनवीन कल्पनांचे उत्पादनामध्ये रुपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ पुरविले जाईल. तसेच त्यांचेही स्वामित्व हक्क घेतले जातील.

0 comments:

Post a Comment