Friday, December 10, 2021

एमआयटीची आंतरराष्ट्रीय कायदा, शांतता परिषद १४ रोजी

१०/१२/२०२१

पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे पहिली ‘आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषद’ १४ डिसेंबर २०२१ ते  १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरुड, पुणे येथे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. ‘जगात शांतीे संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी कायद्याची भूमिका’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.

या परिषदेचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. १४ डिसेंबर सकाळी १०.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. अरिजित पसायत, सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. ललीत भसीन, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. भारतभूषण परसोन, केरळचे कायदे मंत्री पी. राजीव आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनीक सिस्टीम्स्चे अध्यक्ष नानीक रुपानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा कराड असतील, तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे
कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड हे उपस्थित राहतील.

या परिषदेचा समारोप शुक्रवार दि.१७ रोजी दुपारी ४.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी ज्येष्ठ कायदे तज्ञ व सरकारी वकील पद्मश्री डॉ.उज्ज्वल निकम,  यूएन इंटरनॅशनल लॉ कमिशनचे डॉ. अनिरुद्ध राजपूत, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. बिमल एन. पटेल, राज्य सभेचे खासदार सुजीत कुमार व सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ. ललित भसीन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

0 comments:

Post a Comment