Monday, November 22, 2021

सौरभ आमराळे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी मेळावा

पुणे: कर्तव्य फौंउंडेशन व सौरभ आमराळे यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांसाठी भव्य नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन गाडीखाना हॉस्पिटल शुक्रवार पेठ येथे करण्यात आले.

युवकांना नोकरी मिळून स्वतःच्या पायावर उभं राहावं हा प्रमुख उद्देश असून या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक व युवतींनी उपस्थिती लावली. या नोकरी मेळाव्यात 5 वी ते पदवीधर अशा  5 हजार युवकांना नोकरी नोकरी देण्याचा मानस आहे आणि त्यांना हा नोकरी देण्याचा मानस पूर्ण होईल, हा योगायोग वाढदिवसानिमित्त घडून येत आहे, याचा नक्कीच मला आनंद आहे, असे सौरभ आमराळे याप्रसंगी म्हणाले.  

मोदी भाषण देऊन नोकरी व राशन देत नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना नोकरीची आवश्यकता निर्माण झाली असल्याने आमचं नोकरी देण्यासाठी प्राधान्य राहील. येणाऱ्या काळात 20 हजार नोकरी देण्याचा संकल्प देखील अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाला रोहित टिळक,अविनाश बागवे, मोहन दादा जोशी, दीप्तीताई चौधरी, सोनम पटेल, सुनील पंडित, बाळासाहेब आमराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक विजय वाघचौरे यांनी केले. 

0 comments:

Post a Comment