Friday, November 12, 2021

नाट्यछटांच्या ई-बुकचे शनिवारी प्रकाशन

१२/११/२०२१

पुणे : ‘मराठीतील निवडक नाट्यछटा’ हा 25 नाट्यछटांचा संग्रह ई-बुकच्या माध्यमातून रसिकांच्या हाती येत आहे. नाविन्यपूर्ण लिखाण करणार्‍या  महाराष्ट्रातील आठ लेखकांच्या नाट्यछटांचा यात समावेश आहे. या नाट्यछटांच्या ई-बुक भाग एकचा प्रकाशन समारंभ शनिवार, दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे.


ई-बुकचा प्रकाशन समारंभ सकाळी 10:30 वाजता पत्रकार संघातील कमिन्स सभागृहात आयोजित केला असून बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पारखी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. नाट्यनिर्मात्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई, साहित्यिक शंतनू खेर, विस्तार अ‍ॅडर्व्हटायझिंगच्या संचालिका जान्हवी बोरावके यांची प्रमुख उपस्थिती असून या ई-बुकचे संपादन रंगकर्मी देवेंद्र भिडे यांनी केले आहे.

दरवर्षी होणार्‍या नाट्यछटा स्पर्धेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण भाग घेतात. लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा ऑनलाईन झाल्या पण नाट्यछटांच्या संहिता मिळणे अवघड झाले. स्पर्धकांना आणि वाचकांना नाट्यछटा सहजतेने उपलब्ध व्हाव्यात या हेतूने ई-बुक स्वरूपात नाट्यछटा प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे देवेंद्र भिडे यांनी सांगितले. अनेक वर्षे दर्जेदार लेखन करणार्‍या महाराष्ट्रातील आठ लेखकांच्या नाट्यछटांचा या ई-बुकच्या भाग एकमध्ये समावेश करण्यात आला आहे.

0 comments:

Post a Comment