Tuesday, October 12, 2021

रीतिका खटनानीला लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल किताब

१२/१०/२०२१

पुणे: पुण्याच्या रीतिका खटनानीने लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल 2021 किताब पटकावला. यापूर्वी चंदीगडच्या हरनाज सिंधूने लिवा मिस डीवा युनिव्हर्स 2021 हा किताब जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. मिस सुप्रानॅशनलमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. नुकतीच मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये एका सोहळ्यात विजेत्यांची नावे जाहीर झाली.

रितिका खटनानी एक आत्मविश्वासाने भरलेली, निर्भीड आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेली मुलगी असून सध्या ती मुंबईच्या जय हिंद कॉलेजातून मास मीडिया आणि कम्युनिकेशन शिकत आहे. तिसरीत असताना या सौंदर्यवतीची स्पेलिंग बी चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 15 उमेदवारांमध्ये निवड झाली होती. समाजात योगदान देणाऱ्या तिच्या मानवतावादी कार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने ग्लोबल यंग फेलोशिप अवॉर्ड देऊन सन्मान केला होता. तिने पुणे महानगरपालिका शाळेत शिकणाऱ्या वंचित मुलांना शिकवले आहे. एकट्या आईने वाढवलेली ही सुंदरी आता एक स्वतंत्र, महत्त्वाकांक्षी आणि आशावादी मुलगी झाली आहे. तिच्या आईला पहिल्यापासून एक मुलगीच हवी होती, म्हणून रितिकाला वाटते की ती देवाची कन्या आहे.

19-वर्षांची ही तरुणी उत्कृष्ट भरतनाट्यम डान्सर, अष्टपैलू कलाकार आणि एक उद्योजिका आहे. आपल्या जीवनात मनोरंजन, उद्योजकता आणि मानवता या क्षेत्रात विविध प्रकारची कामे करण्याची तिची इच्छा आहे. आपल्या NUE या ब्रॅंडच्या मदतीने प्रसिद्ध हस्ती आणि उद्योजिका होण्याचे तिचे स्वप्न आहे. आपल्याला मिळणार्याक प्रत्येक संधीचे सोने करून एक दिवस फोर्ब्स मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचे तिचे ध्येय आहे.


एका पत्रकार परिषदेत लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल 2021 हा किताब जिंकल्याच्या आपल्या यशाबाबत बोलताना रितिका म्हणाली, “हा किताब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ते माझे स्वप्न, ध्येय आणि व्हिजन आहे. मोठे होणे, एक सार्थ आणि उद्देशपूर्ण जीवन जगणे हे माझ्या लेखी फार महत्त्वाचे होते. हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या आईचेही आहे. विश्व ज्याची प्रतीक्षा करत आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा हा मंच आहे.आपली आई हा तिचा प्रेरणास्रोत आणि आधारस्तंभ आहे. तिच्यातील मूल्य जाणीव, आत्मविश्वास, निर्भीडपणा आणि दृढनिर्धार हे गुण तिला आईकडूनच वारशात मिळाले आहेत."

आपल्या भविष्याबद्दल ती म्हणते, “अत्यंत कृतज्ञ मनाने मी मला मिळणार्याच प्रत्येक संधीतील शक्यता शोधत आहे. मन मोकळे ठेवून, मनात महत्त्वाकांक्षा जपत या सुंदर प्रवासावर जाताना स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात निरंतर ध्यास आहे आणि जग जिंकण्याची आग आहे. माझ्या जीवनात आलेला हा समय पुन्हा कधीच परतून येणार नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला सामोरे जाताना, त्यातून उलगडणार्या  जादुई क्षणांचा मला आनंद घ्यायचा आहे.”

रितिका असे मानते की, मोठी स्वप्ने पाहण्याच्या तिच्या क्षमतेमुळे ती मिस डीवा मंचापर्यंत पोहोचू शकली आहे. आपली एक परंपरा निर्माण करण्याची आणि लोक कधीच विसरू शकणार नाहीत असे जीवन जगण्याची तिची आकांक्षा आहे. तिला वाटते की, संधी खूप कमी वेळा आपल्यासमोर येतात त्यामुळे त्या येतात तेव्हा त्यांचे सोने केले पाहिजे. वंचित आणि HIV पॉझिटिव्ह मुलांना शिकवून त्यांना प्रेमळ, कल्याणकारी आणि सामाजिक स्वीकाराचे वातावरण प्रदान करण्याची तिला इच्छा आहे तसेच, देशातील लैंगिक असमानता कमी करून महिलांना त्यांचे आर्थिक आणि सामाजिक स्थान उंचावण्यासाठीची साधने पुरविण्याचे तिचे लक्ष्य आहे.

मिस युनिव्हर्स 1994 सुश्मिता सेन पहिल्यापासून तिची आदर्श आहे. तिच्याबद्दल रितिका म्हणते, “सौंदर्य स्पर्धांच्या संदर्भात सांगायचे तर मला सुश्मिता सेन खूप आवडते. ती माझी सर्वात आवडती आहे. तिचा वावर, व्यक्तिमत्व आणि बोलण्याची पद्धत अगदी मंत्रमुग्ध करणारी आहे.”

ग्लॅमर आणि फॅशन उद्योगात आपले खास स्थान स्थापित करणार्या  युवा प्रतिभावंतांच्या जीवनाचा कायापालट करण्याची परंपरा मिस डीवा सौंदर्यस्पर्धेने आपल्या 9व्या आवृत्तीत देखील चालू ठेवली आहे. या सौंदर्य स्पर्धेचे व्हिजन भविष्यात आपल्या देशाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या नवीन पिढीला मनःपूर्वक समर्थन देते.

0 comments:

Post a Comment