Saturday, August 28, 2021

पुणे जिप, बजाज ग्रुपतर्फे ३१ ऑगस्टला महालसीकरण

२८/८/२०२१

पुणे: बजाज ग्रुपने पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी महा लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे, ग्रामीण पुण्याच्या १३ तालुक्यांत हे लसीकरण संपन्न होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश पुणे ग्रामीणमधील दुर्गम भागांतील रहिवाशांना कोविड-19 लस उपलब्ध करून देण्याचा आहे. कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी ही मोहीम हातात घेण्यात आली.

बजाज ग्रुप कंपन्या – बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स लिमिटेडने जिल्हा परिषदेसोबत मिळून कोव्हीशिल्डच्या १.५ लाख डोसचे वाटप केले. ही लसीकरण मोहीम पुण्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तिंचे लसीकरण यावेळी करण्यात येणार असून, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि व्याधिग्रस्त (को-मॉर्बिड) व्यक्तिंवर खास लक्ष असेल.

या उपक्रमाबद्दल बोलताना बजाज ग्रुपचे सीएसआर हेड पंकज बल्लभ म्हणाले की,“सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महासाथीत आपण सर्वांनी एकत्र येऊन देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा आणि जीवनाच्या अत्यावश्यक गरजांचा लाभ मिळतो आहे का याची खातरजमा करणे आवश्यक ठरते. मागील १३० वर्षांपासून बजाज ग्रुप समाज, सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या सोबतीनेसकारात्मक बदल घडविण्याकरिता ठामपणे उभा राहिला. कोविड-१९ च्या विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी प्रशासनाला साह्य करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.”

सध्या, पुण्यात रुग्णालय विलगीकरणात ४३११ सक्रीय केस तर गृहविलगीकरणात ४१८८ रुग्णांची नोंद आहे. २६ ऑगस्ट रोजी कोविड-१९ मुळे ६ व्यक्तींचा मृत्यू झाला.

यावर्षी पूर्वार्धात बजाज ग्रुपने १२ प्राणवायू प्रकल्पांची स्थापना  केली असून त्याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांतील रुग्णालयांत ५,००० एलपीएमहून अधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. त्याशिवाय कोविड-१९ रुग्णांच्या उपचाराकरिता त्यांना मदत म्हणून श्वसन साह्य साहित्य जसे की, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, वेंटीलेटर आणि बायपॅपचा पुरवठा केला.

बजाज ग्रुपने महासाथ सुरू झाल्यापासून कोविड-१९ च्या विरुद्ध लढा पुकारून रु. ३०० कोटींचे दान करत समाजाप्रती वचनबद्धता पाळली. या मदतनिधीचा वापर करून अस्तित्वात असलेल्या आव्हानांवर त्वरीत उपाययोजना राबविण्यात आल्या तसेच क्षमता आणि स्त्रोत निर्मिती करण्यात आली.

ग्रुपने सरकार, स्थानिक प्रशासन आणि २०० हून अधिक एनजीओ भागीदार संपर्कजाळ्यासमवेत काम केले असून विविध प्रकल्पांना साह्य केले. मदतीची गरज असणाऱ्याना साह्य आणि पाठबळ मिळत असल्याची खातरजमा देखील करण्यात आली. भटक्या स्थलांतरीतांकरिता भोजनाची सोय; शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची सुविधा; महत्त्वाच्या आरोग्य देखभाल उपकरणांची तरतूद;  आणि गावातून शहरांत परत आलेल्यांच्या रोजगाराची सोय लावण्याकरिता प्रयत्न करण्यात आले.

0 comments:

Post a Comment