Sunday, August 1, 2021

पूरग्रस्तांना आमदार सुनील टिंगरेंकडून मदतीचा हात

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 

20 ट्रक कोकणाकडे रवाना

//२०२१

पुणे: महापुराने संकटात सापडलेल्या कोकणवासीयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे आणि मित्र परिवार यांच्यावतीने साडेचार हजार कुटूंबाना किराणा सामानाचे किट आणि दोन हजार संसारउपयोगी भांड्याचे किट यांची मदत देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे साहित्य घेऊन जाणार्या 20 ट्रकला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून मदत मोहिमेची सुरवात केली.

कोकण, कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे आणि त्यांच्या मित्र परिवाराने तातडीची मदत गोळा केली. 

उपमुख्यमंत्री पवार यांनी या मदतीच्या उपक्रमाचे कौतुक केले, सर्वांनी अशाच पध्दतीने मदतीचा हातभार लावावा असे आवाहन केले.  यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह वडगाव शेरीचे माजी अध्यक्ष नाना नलावडे, नारायण गलांडे, शशिकांत टिंगरे, नवनाथ मोझे, अशोक खांदवे, बंडु खांदवे, राजेंद्र खांदवे, सुहास टिंगरे, सोमनाथ टिंगरे, बंटी म्हस्के, सुभाष काळभोर, नितीन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तातडीच्या साहित्याचा समावेश

पुरग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या साडेचार हजार अन्नधान्य किटमध्येकिलो तांदूळ, 10 किलो, गव्हाचे पीठ, 5 किलो, तूरडाळ, 1 किलो साखर, साबण 2, गोडेतेल, टुथपेस्ट, खोबरेल तेल, कांदा मसाला, हळद, लाल मिर्ची पावडर चहा पावडर, मीठ तसेच 2 हजार भाड्यांच्या किटमध्ये संसार उपयोगी 15 साहित्य पाठविण्यात ले,

0 comments:

Post a Comment