Wednesday, July 7, 2021

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींवरील पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई: भारतीय जनता पार्टी प्रदेश माध्यम विभागाने तयार केलेल्या डॉ . श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या चरित्रावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बुधवारी झाले. भाजपा प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. पूनम महाजन , माजी मंत्री आशीष शेलार, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस . देवयानी फरांदे, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुख्य प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.

देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या डॉ. मुखर्जी यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांची ओळख नव्या पिढीला होण्यासाठी अशा पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपा माध्यम विभागाचा हा उपक्रम अत्यंत स्त्युत्य असून या पुढेही असे उपक्रम राबवावेत असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. डॉ. मुखर्जी यांच्या चरित्रातील विविध पैलूंचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.

0 comments:

Post a Comment