पुणे
: पूरग्रस्त
भागातील बांधवांच्या मदतकार्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे मदतपथक रवाना होत असून सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात हे
पथक कार्यरत राहणार आहे. या परिसरातील मीर गाव अणि पंचक्रोशीत दरड कोसळून अनेक बांधव मृत्युमुखी पडले असून अनेक जण बेपत्ता
आहेत.
वाचलेल्या बांधवाना कोयनानगर येथील शाळेत तात्पुरत्या निवासात ठेवले आहे. अचानक आलेल्या या
संकटाचा सामना करताना येथील बांधवाना भावनिक, मानसिक आधार देण्यासाठी तसेच त्यांना वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत
करण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानमार्फतचे वैद्यकीय मदत पथक मंगळवार 27 जुलै रोजी कोयनानगरला
जाणार आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ टीम
यांच्या समन्वयातून हे पथक कार्यरत राहणार असून
या आपत्तीग्रस्त बांधवांचे अश्रु पुसण्यासाठी पुणेकरांनी
जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, असे आवाहन या टीमचे प्रमुख आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी
केले आहे.
(आवश्यक वस्तू : कपडे, कोरडे खाद्यपदार्थ, साबण, टूथपेस्ट,
तेल, सॅनिटरी पॅड्स, पिण्याचे पाणी, औषधे,
ड्रेसिंग साहित्य, रेनकोट, छत्री, टॉर्च.)
मदतीसाठी संपर्क : 9822621556,
99215754499,9923406981,9850992233, 9822042600, 8087995662
0 comments:
Post a Comment