Friday, July 23, 2021

सूसला अमोल बालवडकरांचा टँकरने पाणीपुरवठा

२४//२०२१

पुणे: माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सूस म्हाळुंगे या दोन गावांमध्ये माझ्या वतीने रोज लक्ष लिटर म्हणजेच रोज २० टँकर पिण्याच्या कॉर्पोरेशनच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा मी संकल्प केला असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी येथे केले. या निमित्ताने काल सुसगाव येथे जलपूजन शुभारंभाचा कार्यक्रम महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पडला.

सुसगावाला सर्वाधिक सतावणारी कोणती समस्या असेल तर ती पाण्याची समस्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गावातील पाण्याची समस्या सोडवायची असेल तर पायाभूत सुविधा उभ्या करण्याची प्रामुख्याने गरज आहे. सूस, म्हाळुंगेसहित नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा २४x या योजनेमध्ये समावेश करण्यात यावा आणि पाइपलाईनचे पाण्याच्या टाक्यांचे काम व्हावे यासाठी जातीनं लक्ष घालून सदर काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन, असेही  यावेळी बालवडकर म्हणाले. महापौरांनीही नव्याने समाविष्ट गावांचा २४/ पाणी पुरवठा योजनेत समावेश करण्याचे आश्वासन दिले.

महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, नगरसेवक किरण दगडे पाटील, राहुलजी कोकाटे, सरपंच सौ. अपूर्वाताई निकाळजे, उपसरपंच सौ. दिशाताई ससार, मा. चेअरमन दत्तोबा चांदेरे, सरपंच सौ. मिराताई देवकर, सरपंच नारायण चांदेरे, चेअरमन अंकुशराव गाडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास चांदेरे, रासप अध्यक्ष  अप्पासाहेब सुतार, उपसरपंच वि.ग्रा.. गजानन चांदेरे, उपसरपंच वि.ग्रा.. गणेश साळुंके, ग्रा.. अमोल चांदेरे, व्हाईस चेअरमन सोपान चांदेरे, वसंत मामा चांदेरे, संपत साळुंके, सोमनाथ कोडेकर, समीर पारखी, अनंता चांदेरे, सतीश चांदेरे, मच्छिन्द्र चांदेरे, हरिभाऊ चांदेरे, अंकुश ससार, विठ्ठल शेवाळे, महेंद्र ससार, महेश सुतार, सरचिटणीस भा.यु.मो.पु. शरद भोते, युवा नेते अनिल बापू ससार, शंकर चांदेरे, मंदार राराविकर, ॲड. अशिष ताम्हाणे, प्रकाश तपकीर, नितीन रनवरे, सौ. प्राजक्ता रनवरे,  सौ रिमा सोमय्या, सुसगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी सभासद यावेळी उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment