Tuesday, July 6, 2021

लवकरच कलाकारांसाठी मोफत लसीकरण केंद्र: धुमाळ

पुणे: आठवड्यातून दोन दिवस कमला नेहरू हाॅस्पिटलमध्ये पुणे शहरातील सर्व कलाकारांसाठी मोफत लसीकरण केंद्र  सुरू करणार असल्याचे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी येथे केले

पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, विजय पटवर्धन फाऊंडेशन राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या समितीने महानगरपालिकेच्या उपायुक्त रुबल अग्रवाल यांना पुणे शहरातील सर्व कलाकारांसाठी महानगरपालिकेच्या वतीने मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन दिले.

या प्रसंगी अभिनेते विजय पटवर्धन, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मा. नगरसेवक बाबा धुमाळ,अभिनेते राजू बावडेकर, अभिनेते योगेश सुपेकर, प्रसाद कुलकर्णी, गणेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते

 



0 comments:

Post a Comment