Monday, July 5, 2021

समाविष्ट गावांच्या समन्वयासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी

पुणे: पुणे शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने ३० जून रोजी घेतला आहे. या गावांच्या महापालिकेत समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, या निर्णयामुळे या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आले आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत. परंतु, महानगरपालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार आहेत्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात येत आहे.

२३ गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. दैनंदिन कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, आदरणीय खासदार सौ. वंदनाताई चव्हाण, खासदार डॉ. अमोलजी कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतनजी तुपे, आमदार सुनीलजी टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभासदांना या २३ गावांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे.

येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या हे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत. नव्याने महानगरपालिकेत समावेश झालेल्या या २३ गावांतील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असून, नागरिकांनी या पदाधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास आम्ही पक्षातर्फे देत आहोत.

0 comments:

Post a Comment