Wednesday, June 9, 2021

अॅड. समीर शेख यांना शरद रत्न पुरस्कार


9/6/2021

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा शरद रत्न पुरस्कार अॅड. समीर शेख यांना जाहीर झाला  आहे. पक्षाच्या पुणे शहर अल्पसंख्याक विभागातर्फे अझीम गुडाकूवाला यांनी ही माहिती दिली.

आझम कॅम्पस येथे १० जून रोजी सकाळी ११ वाजता पुरस्काराचे वितरण  अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे.विधी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार अॅड. समीर शेख यांना देण्यात येत आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांना, कँटोन्मेंट अध्यक्षांना, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

0 comments:

Post a Comment