Tuesday, June 8, 2021

तृतीयपंथीयांकडून गाडी अडवून हायवेवर लुटमार

पिंपरी चिंचवड, दि. जून : वाहनांना अडवून लुटमार करण्यात तृतीयपंथीयही आता मागे राहिलेले नाहीत. एका कारचालकास जुन्या मुंबई-पुणे हायवेवर तृतीयपंथीयांकडून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तळेगाव दाभाडे पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे.

बालिका आबादास भोगे (वय-३३ वर्षे) ) दिया बाबुराव शर्मा (वय-२७ वर्षे) ) राहुल कैलास गायकवाड (वय-२२ वर्षे, सर्व रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत रुबेन विल्यम ओहोळ (वय-४५, रा. मस्करनिस कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुबेन ओहोळ हे त्यांच्या चारचाकी गाडीतून रात्री .३० वा. च्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे हायवेने तळेगावकडून भोसरीकडे जात होते. त्यावेळी एमरोल्ड हॉटेलच्या समोरील खिंडीमधून जात असताना वरील आरोपींनी त्यांची अडविली. रुबेन यांना गाडीतून खाली उतरवून हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील ३५,०००/- रु. किमतीचा सोन्याचा गोफ ५००/- रु. ची नोट असा एकूण ३५,५००/- रु. चा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. वरील आरोपींविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मतकर
करीत आहेत.

0 comments:

Post a Comment