Tuesday, June 8, 2021

व्हिडीओ व्हायरलची धमकी; तरुणीवर सामूहिक बलात्कार

 

पिंपरी चिंचवड, दि. ८ जून : एका तरुणीबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना जानेवारी २०२१ पासून ते ३१ मे २०२१ या कालावधीमध्ये देहूरोड परिसरामध्ये घडली आहे. या प्रकरणी एकूण सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक केली आहे.

१) नोमान उर्फ अरबाज जावेद खान (वय-१९, रा. शितळानगर, मामुर्डी, देगुरोड, पुणे) २) सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद (वय-३२) ३) रियाज उर्फ मन्नन जावेद खान (वय-१९) ४) सोहेल शेरअली पिरजादे (वय-२१, रा. आंबेडकरनगर, मामुर्डी, देहूरोड, पुणे) ५) बिट्टू उर्फ हमिद जावेद खान ६) झायेद उर्फ सोन्या रशीद खान अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नोमान याने फिर्यादी मुलगी व आरोपी नोमान यांच्यामध्ये झालेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ काढला. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर इतर आरोपींनीदेखील फिर्यादी मुलीला शिवीगाळ व दमदाटी करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वेळोवेळी बलात्कार केला. आरोपींनी फिर्यादी मुलीबरोबर अनैसर्गिक संबंधही प्रस्थापित केले. तसेच आरोपी नोमान याने मुलीला मारहाण करून तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशनचे सपोआ नाईक पाटील करीत आहेत.

 

0 comments:

Post a Comment