Tuesday, June 8, 2021

पेट्रोल भाववाढीवर सरकारचे नियंत्रण नाही - पारगे

८/६/२०२१

पुणे : पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले असून शेतकरी आणि मध्यमवर्गीय नागरीकांना भाववाढीची प्रचंड झळ सोसावी लागत आहे. करोना प्रादुर्भावाने सामान्य माणसं बेरोजगारीचे संकट असताना भाववाढ म्हणजे पिळवणूक आहे, असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पारगे व्यक्त करत निषेध नोंदवला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विशाल भालेराव व युवक अध्यक्ष संघदीप शेलार यांनी पेट्रोल, डीझेल, गॅसच्या भाववाढी विरोधात निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी निषेध करताना बाळासाहेब पारगे बोलत होते.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे नियम पाळून मोजकेच ग्रामस्थ आणि पदाधीकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण विभागाचे  जिल्हाध्यक्ष  त्र्यंबक मोकाशी, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, प्रदेश सरचिटणीस आनंद मते,  सररचिटणीस रुपेश मते, विकी भालेराव , ओंकार यादव, सुधाकर गायकवाड, महेश दिवार,सौरभ कांबळे,शेखर पारगे, संभाजी वाल्हेकर आदी उपस्थित होते.

करोना प्रादुर्भावाने अनेक नागरीक बेरोजगार झाले आहेत.लागण झालेल्या नागरीकांचे दवाखान्याचे अवास्तव बिलाने कंबरडे मोडले आहे.  असे स्पष्ट करून पारगे सरकारचा निषेध करत म्हणाले की आता पेट्रोलने शंभरी पार केली. एकंदरीत केंद्र सरकार भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. आगामी काळात सामान्य जनताच अशा सरकारला उघडे पाडील असा सांगून  केंद्र सरकारच्या विरोधात   मोकाशी यांनी घोषणा दिल्या.


0 comments:

Post a Comment