Friday, June 18, 2021

जनतेला काँग्रेसच खरा आधार - आबा बागुल

काँग्रेसतर्फे १० हजार नागरिकांना मोफत छत्री वाटप

१८//२०२१

पुणे : काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेवर सदैव विकासाचे आणि आधाराचे छत्र धरले आहे. काँग्रेसचे युवानेते खासदार मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १० हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये तीच भावना आहे. समाजातील उपेक्षित,गोरगरिबांच्या विकासासाठी प्रत्येक संकट काळी काँग्रेस पक्ष मदतीला धावून येत असतो. त्यामुळे काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केले.

प्रभागातील १० हजार नागरिकांना मोफत  छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आज प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न झाला यावेळी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

बागुल म्हणाले की, काँग्रेस आपल्या दारी या माध्यमातून काँग्रेसचे छत्र असलेली छत्री वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून काँग्रेस गांधी परिवाराची सदैव जनतेला मदत करण्याची भूमिका असून त्याच भूमिकेतून पक्षाच्या माध्यमातून १० हजार छत्र्या वाटपाचा संकल्प केला असून प्रभागातील नागरिकांना घरोघरी छत्री वाटप करण्यात येणार आहे. या काळात नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

याप्रसंगी बोलताना रमेश बागवे म्हणाले की , काँग्रेस पक्ष हा सदैव जनतेशी जोडलेला पक्ष असून गोरगरिबांच्या मध्यम वर्गीयांच्या अडीअडचणींची जाण असलेला पक्ष आहे. त्यामुळे पक्ष जनतेच्या प्रशांसाठी सदैव कार्यरत राहिलेला आहे. आबा बागुलांसारख्या कर्तबगार नगरसेवकाने एक लाख लोकांसाठी भोजन व्यवस्था असो अथवा १० हजार नागरिकांना छत्र्या वाटण्याचा कार्यक्रम असो कोरोना काळात त्यांनी केलेले काम असो अनुकरणीय आहे. आणि त्याकरिताच आबा बागुल हे जनतेच्या मनात स्थान निर्माण करून आहेत अश्या शब्दात त्यांनी आबा बागुलांचा गौरव केला उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय सोशिअल फाउंडेशन मधील वंचित घटकातील मुलांचा हस्ते केक कापण्यात आला तसेच या संस्थेला रोख स्वरूपात आर्थिक साहाय्य करण्यात आले. तसेच सुमारे १०० नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात छत्रीचे वाटप करण्यात आले पुढील छत्र्यांचे वाटप नागरिकांना घरोघरी जाऊन करण्यात येईल असे  पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल सांगितले.

कोरोनाचे सर्व नियम पळून हा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित नागरिकांनी छत्री वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सेवादलचे अध्यक्ष दीपक पवार, वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य पोळेकर,ब्लॉक अध्यक्ष सतीश पवार रमेश सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस इंदिरा आहिरे, ताई कसबे, नंदा ढावरे, विश्वास दिघे,अकबर मणियार, विक्रम खन्ना, राजू शेख, प्रकाश आरने, संतोष गेळे, इमाम हन्नूर, केतन जाधव, दीपक ओव्हाळ, आनंद बाफना, नंदकुमार बानगुडे, सागर आरोळे, धनंजय कांबळे, सुरेश गायकवाड, अशोक शिंदे, इम्तियाज तांबोळी, संतोष पवार, ओंकार उपाध्ये, महेश ढवळे  पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment