Wednesday, June 9, 2021

पोस्ट कोरोना क्लिनिक सुरु करा - आबा बागुल

//२०२१

पुणे : गेली दीड वर्ष कोरोना विषाणूच्या पहिल्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे आपले आरोग्य आणि अर्थ व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. लाखो कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले तरीही आता पोस्ट कोविडचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या औषधातून स्टिरॉइड जास्त झाल्याने विशेषतः ब्लॅक फंगस, रक्ताच्या गाठी होणे, हृदयविकार, मेंदूचे विकार तसेच अन्य काही आजारांची लागण झाल्याचे मोठ्या प्रमाणात ऐकू यायला लागले आहे.

त्याचा अभ्यास करणे जगभर चालू असले तरी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची पुढील किमान सहा महिने तपासणी करणे हे आता अनिवार्य बनले आहे. त्यासाठीच पुणे महानगरपालिकेने तसेच खासगी हॉस्पिटलने देखील आता पोस्ट कोरोना क्लीनिक सुरु करण्याची गरज आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केले.

बागुल म्हणाले की , कोरोना झाल्यानंतर शरीराच्या विविध भागात झालेले दुष्परिणाम आता हळूहळू निदर्शनास येऊ लागले आहेत. डॉक्टरांच्या मते सर्व वयोगटातील तरुण वृद्धांना कोरोनातून बरे झाल्यानंतर जर अशी लक्षणे आढळत असतील तर त्यावर त्वरित उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना होऊन बरे झालेल्या नागरिकांनी देखील आपली तपासणी त्या दृष्टीने ओपीडी, हॉस्पिटल अथवा पुणे महानगरपालिकेच्या पोस्ट कोरोना क्लीनिक मधून करून घ्यावी.

आता लॉन्ग कोरोना अशी संकल्पना तज्ज्ञ डॉक्टरांकडून चर्चेत येते. लॉन्ग कोरोना म्हणजे कोरोनातून बरे झाल्यानंतर बरेच काळ दिसणारी लक्षणे की ती भले जीवघेणी नसली तरी अपायकारकच आहे हे लक्षात घेऊन आता पोस्ट कोरोना क्लीनिकची आवश्यकता केवळ पुण्यातच नाही तर साऱ्या देशात असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने  महानगरपालिकेचे हॉस्पिटल सर्व खासगी  हॉस्पिटलला पोस्ट कोरोना क्लिनिक सुरु करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी पुणे महानगपालिकेच्या आयुक्ताना पत्रकाद्वारे करण्यात आली असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले

0 comments:

Post a Comment