Friday, January 22, 2021

पुणे पीपल्स बँकेचा व्यवसाय १९०० कोटी पार; ठेवी १२०० कोटी

संजय जगताप, अ‍ॅड.सुभाष मोहिते, सीए जर्नादन रणदिवे, डॉ.रमेश सोनवणे

पुणे : मागील चार वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल, नोटबंदी, त्यानंतर बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी एकूणच उद्योग व्यवसायात आलेल्या अडचणी तसेच जागतिक अस्थिरतेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर  झालेले परिणाम या सगळ्या अडचणींच्या काळातही पुणे पीपल्स सहकारी बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

सन २०२०-२०२१ आर्थिक वर्षात बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए जर्नादन रणदिवे यांनी दिली. पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष डॉ.रमेश सोनवणे, संचालक ॅड.सुभाष मोहिते, मिलींद वाणी, प्रभारी सरव्यवस्थापक संजय जगताप यांसह संचालक उपस्थित होते. बँकेची सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक 24 जानेवारी रोजी महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे सकाळी वाजता होणार आहे. त्यास सभासदांनी हजर राहावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात मंदीमुळे झालेल्या घडामोडीत इतर बँकांच्या तुलनेत पुणे पीपल्स सहकारी बँकेने अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे.

सीए जर्नादन रणदिवे म्हणाले, की ठेवींच्या व्याजदरात मोठया प्रमाणात घसरण झाल्यावरही इतर बँकांच्या तुलनेत पुणे पीपल्स सहकारी बँकेच्या ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. कर्ज व्याजदरामध्ये असलेली तीव्र स्पर्धा इतकी जीवघेणी आहे की कि चांगले कर्जदार टिकवणे खूपच कठीण आहे. परंतु अशाही परिस्थितीत बँकेने कर्जदारांना चांगली सेवा आकर्षक व्याज दर देऊन कर्जवाटपामध्ये वाढ केलेली आहे.

कोविडच्या काळात रिझर्व्ह बँकेने ºयाच मार्गदर्शक सूचना केल्या, त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन पुणे पीपल्स सहकारी बँकेने केले आहे. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांबाबत घेतलेल्या काही निर्णयांचा परिणाम बँकांच्या प्रगतीवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने  सहकारी बँकांचे एक्सपोजर लिमिट कमी केल्यामुळे अनेक उत्तम व्यवसाय असणाऱ्या मोठ्या खातेदारांना सहकारी बँका त्यांना आवश्यक कर्जपुरवठा करू शकणार नाहीत, याचा परिणाम असे उत्तम कर्जदार सहकारी बँकांपासून दुरावण्याची शक्यता आहे. तथापि पुणे पीपल्स सहकारी बँकेने याबाबतही नियोजनबद्ध विचार करून तसे धोरण ठरविले आहे.

रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना त्यांच्या एकूण कर्जाच्या ५०% कर्जही रु. २५ लाखाचे आत ठेवण्याचे बंधन टाकले आहे. परंतु अडचणीच्या काळातही पुणे पीपल्स सहकारी बँकेने त्याचे प्रमाण ५०% राहील याची काळजी घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकांचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण हे % चे वर असणे आवश्यक असतानां बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण हे मागील कित्येक वर्ष १२% च्या पुढे राखले आहे आणि ही खूप मोठी बाब आहे. इतर बँकांचा एकूण व्यवसाय कमी होत असताना पुणे पीपल्स बँकेने अडचणीच्या काळातील उल्लेखनीय कामगिरी पुढील काळात मोठी कामगिरी करायला उद्युक्त करते.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकांचे नेट एनपीएचे प्रमाण % चे आत आवश्यक असताना पुणे पीपल्स सहकारी बँकेने मागील तीन  वर्ष हे प्रमाण % च्या आत राखले आहे. चालू आर्थिक वर्षात पुणे पीपल्स बँकेचे नेट एनपीएचे प्रमाण हे % असेल या बाबत आम्हाला खात्री आहे. इतर बँकांचे ढोबळ एनपीएचे प्रमाण हे १०% चे वर असताना पुणे पीपल्स बँकेने सदरचे प्रमाण % राखण्यात यश मिळवले आहे. इतर बँकांचे तुलनेत पुणे पीपल्स बँकेची सेवक उत्पादकता (इतर बँकांची सरासरी ते कोटी ) जास्त असून मार्च २१ ला ते प्रमाण कोटी असेल. 

*३१ मार्च २०२१ चे बँकेचे उद्दिष्टय  :-

-बँकेचा एकूण व्यवसाय रु. २००० कोटी पेक्षा जास्त

-ठेवी रु. १२५० कोटी

-कर्ज रु. ८०० कोटी

-भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण १२% पेक्षा जास्त

-निव्वळ नफा रु. १५ कोटी पेक्षा जास्त

-ढोबळ एनपीए चे प्रमाण % चे खाली

-नेट एनपीए चे प्रमाण % चे खाली

मागील आर्थिक वर्षात पुणे पीपल्स को आॅप बँकेने मिळवलेल्या नफ्यातून १२% लाभांश देणेबाबत रिझर्व्ह बँकेला परवानगी मागितली होती. परंतु रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविडच्या पार्श्वभूमीवर बँकांना लाभांश देण्यास मनाई केली आहे. परंतु चालू आर्थिक वषार्ची बँकेची प्रगती बघता रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली तर पुढील वर्षी पुणे पीपल्स बँक कमीत कमी १२% लाभांश देऊ शकेल. पुणे पीपल्स बँकेचे रिजर्व फंड खूप चांगले असून बँकेचे नेट वर्थ जवळपास १०० कोटी आहे.

चालू वर्षात  कोविड मुळे सहा ते सात महिने उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे कोणत्याही बँकेला व्यवसायात वाढ करता आलेली नाही, या काळातसुद्धा पुणे पीपल्स बँकेने उल्लेखनीय कामगिरी पार पडली आहे. या सगळ्याचा अर्थ पुणे पीपल्स बँक अतिशय भक्कम पणे चांगल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत आहे. आम्हा सर्व संचालक मंडळाला विश्वास आहे की, वरील उद्दिष्टे गाठण्यात संचालक मंडळ सेवकांच्या सामुदायिक प्रयत्नामुळे सभासद ठेवीदार यांच्या सहकार्याने कोणतीही अडचण येणार नाही.

1 comments:

 1. Its really good blog and very information, we are tempo traveller rental company in Gurgaon providing tempo traveller in gurgaon for local and outstation, we have luxury tempo traveller in gurgaon you can rent 12 seater, 17 seater , 20 seater , 26 seater Tempo traveller gurgaon to outstation tours ~ JBL Tempo Traveller Rentals Delhi NCR ~ 9560075009

  Our location :

  F28, 1A, DLF Phase 3, Sector 24, Gurugram, Haryana 122002


  tempo traveller in noida
  tempo traveller in Ghaziabad
  tempo traveller in faridabad
  tempo traveller in faridabad
  tempo traveller in delhi

  ReplyDelete