Saturday, October 3, 2020

भाजपआयोजित आत्मनिर्भर भारत संवाद अभियान संपन्न

पुणे: देशातील पुरवठा साखळी सुधारली पाहिजे, घरेलू उत्पन्न संपूर्ण जगात निर्यात केले गेले पाहिजे. जो वारसा आपल्याला पूर्वजांनी दिलेला आहे तो आपण आत्मनिर्भर बनून पुढे नेला पाहिजे. महामारीच्या संकटामध्ये मानसिक, आर्थिक आणि सामाजिक ताणतणावाला कसे सामोरे जावे, कोणत्याही संकटाचे संधीमध्ये कसे रूपांतर करावे, शेतीविषयक समस्यांवर काम करुन शेतीआधारित उद्योगव्यवसाय वाढीस लागले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच शेतकरी, शेतमजूर, कामगार, उद्योजक, व्यवसायिककांचा सर्व बाबींचा विचार करुन आत्मनिर्भर भारत अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वकल्याणासाठी चालविलेला हा वैश्विक संकल्प असल्याचे मत विवेक देशपांडे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश आयोजित आत्मनिर्भर भारत संवाद अभियान वेबिनारच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक व भाजप प्रदेश उद्योग आघाडीचे कार्यकारिणी सदस्य व सेवा उद्योगप्रमुख डॉ. मिलिंद संपगावकर यांनी आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सहसंयोजक संजय पाचंगे यांनी प्रस्तावना केली तर निखिल काळकुटे यांनी आभार मानले.

डॉ. मिलिंद संपगांवकर म्हणाले कि, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत भाजप तर्फे राबविण्यात येणाऱ्या आत्मनिर्भर भारत अभियान संवादात भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी तर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड करीता संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद अभियानाचा मुख्य हेतू मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाची संकल्पना सोप्या भाषेत समजवून त्याचा जास्तीत जास्त फायदा उद्योजकांना व्हावा या उद्देशाने हे संवाद अभियान सुरु करण्यात आले असल्याचे डॉ. मिलिंद संपगांवकर यांनी सांगितले.

विवेक देशपांडे हे उद्योग क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आहे. त्यांना उद्योगरत्न ऑफ इंडीया या पुरस्कारानेदेखील सन्मानीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये मोदींनी विविध क्षेत्रात जाहीर केलेल्या पॅकेजचा सारांश विवेक देशपांडे यांनी खूप सोप्या भाषेत सांगितला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

0 comments:

Post a Comment